सिंड्रोमिक म्हणजे लक्षणगट पद्धतीत रुग्णाच्या लक्षणांवर आधारित उपचार केले जातात. यातून रक्त-तपासणीच्या रीपोर्टची वाट न पाहता त्वरित उपचार सुरू करता येतात.
प्रमुख लक्षणगट सिंड्रोम
| लक्षणगट (Condition) | उपचार (Treatment) |
| 1. मूत्रमार्गातून स्त्राव (Urethral Discharge) संशय: गोनोरिया + क्लॅमिडिया | Ceftriaxone 500 mg IM – एकदाच Azithromycin 1 g – एकदाच पर्याय: Doxycycline 100 mg BD × 7 दिवस |
| 2. योनीतून स्त्राव (Vaginal Discharge) | Metronidazole 400 mg BD × 7 दिवस Fluconazole 150 mg – एकदाच |
| 3. जननेंद्रिय जखम (Genital Ulcer) – सिफिलिस | Benzathine Penicillin 2.4 million units IM – एकदाच Allergy असल्यास: Doxycycline 100 mg BD × 14 दिवस |
| 3. जननेंद्रिय जखम (Genital Ulcer) – हर्पिस | Acyclovir 400 mg TDS × 7 दिवस |
| 4. स्त्रिया: ओटीपोटात वेदना (PID) | Ceftriaxone 500 mg IM Doxycycline 100 mg BD × 14 दिवस Metronidazole 400 mg BD × 14 दिवस |
| 5. अंडकोश सूज (Scrotal Swelling) | Ceftriaxone 500 mg IM Doxycycline 100 mg BD × 10–14 दिवस |
| 6. जननेंद्रिय वॉर्ट्स (Genital Warts) | Podophyllin स्थानिक वापर TCA / क्रायोथेरपी |
| 7. स्कॅबीज-खरूज आणि उवा (Scabies / Lice) | Permethrin 5% लोशन 7 दिवसांनी पुनर्वापर |
| 8. ट्रायकोमोनायसिस (Trichomoniasis)-हिरवट स्त्राव | Metronidazole 2 g single dose किंवा 400 mg BD × 7 दिवस |
✔️ लैंगिक जोडीदाराला देखील उपचार
दोन्ही जोडीदारांना उपचार देणे आवश्यक, नाहीतर आजार एकमेकात फिरत राहील.
✔️ लैंगिक संबंध टाळा
उपचार पूर्ण होईपर्यंत लैंगिक संबंध टाळावे
✔️ HIV तपासणी
सर्व STI रुग्णांसाठी आवश्यक: एचआयव्ही हा लपून राहणारा व उशिरा उमटणारा घातक आजार आहे, त्यामुळे ही तपासणी अनिवार्य आहे.
✔️ पुनर्तपासणी
लिंगसांसर्गिक आजारावर उपचार केल्यावर सात दिवसांनी पुनर्तपासणी करावी

1. सुरक्षित लैंगिक संबंध – निरोध/कंडोमचा वापर
2. एकनिष्ठ संबंध – एकाच जोडीदारासोबत संबंध
3. नियमित तपासणी – जास्त धोका असलेल्या गटांसाठी
4. लसीकरण आवश्यक
आरोग्य सेवकाची भूमिका
मर्यादा