आपत्कालीन/तातडीक वैद्यकशास्त्र आणि अतिदक्षता विभाग (ICU) हे दोन्ही गंभीर रुग्णांच्या उपचारांशी संबंधित असले तरी त्यांची भूमिका, उद्दिष्टे आणि काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
आपत्कालीन वैद्यकशास्त्र म्हणजे अचानक उद्भवलेल्या आजार किंवा अपघाताच्या स्थितीत त्वरित निदान व प्राथमिक उपचार देण्याची शाखा. रुग्ण प्रथम रुग्णालयात आल्यावर त्याचे परीक्षण, तातडीचे जीवरक्षक उपचार आणि पुढील उपचारासाठी योग्य विभागात पाठविणे हे या शाखेचे मुख्य कार्य आहे. अनेक हॉस्पिटल्स मध्ये इमरजन्सी रूम असते ती याचसाठी. हृदयविकाराचा झटका, अपघात, विषबाधा, श्वसनाचा त्रास, फिट्स, भाजणे अशा अनेक तातडीक समस्यांसाठी हा कक्ष प्राथमिक काम करतो.
आपत्कालीन/तातडीक वैद्यकसेवा: प्रमुख वैशष्ट्ये
ट्रायाज म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत किंवा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात आलेल्या रुग्णांची त्यांच्या आजाराच्या गंभीरतेनुसार वर्गीकरण करून उपचारांना प्राधान्यक्रम देण्याची पद्धत. “Triage” हा शब्द फ्रेंच भाषेतील “trier” या शब्दापासून आला असून त्याचा अर्थ “निवड करणे” असा आहे.
एखाद्या आपत्तीत जेव्हा एकाच वेळी जास्त रुग्ण येतात आणि उपलब्ध डॉक्टर, परिचारिका, बेड किंवा साधने मर्यादित असतात, तेव्हा कोणत्या रुग्णाला सर्वप्रथम उपचार द्यायचे हे ट्रायाजद्वारे ठरवले जाते. यामुळे सर्वाधिक गंभीर आणि जीवघेण्या अवस्थेतील रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होते. रुग्णाला हाताला किंवा पायल रिबिन बांधली जाते, यासाठी ट्रायाजमध्ये सामान्यतः पाच रंग-कोड वापरले जातात:
ट्रायाज ही प्रक्रिया प्रशिक्षित डॉक्टर किंवा परिचारिका करतात. रुग्णाचे श्वसन, नाडी, रक्तदाब, बेशुद्धीची पातळी आणि मुख्य तक्रारी यांचे जलद मूल्यमापन केले जाते.
आपत्ती व्यवस्थापन, युद्ध, अपघात, साथीचे रोग आणि रुग्णालयातील गर्दीच्या वेळी ट्रायाज अत्यंत उपयुक्त ठरते. ही पद्धत मर्यादित साधनांचा सर्वोत्तम उपयोग करून जास्तीत जास्त जीव वाचविण्यास मदत करते.
ER मध्ये रुग्णाची तातडी आणि गंभीरता ठरवण्यासाठी ट्रायेज केले जाते. खालील क्लिनिकल निकषांवर आधारित रुग्णाला प्राधान्य दिले जाते.
| ट्रायेज स्तर | रंग | क्लिनिकल निकष |
| तात्काळ (Immediate) | � लाल | श्वसनमार्ग बंद किंवा धोक्यात, श्वसनगती >30/मिनिट किंवा <8/मिनिट, SpO₂ <90%, सिस्टोलिक BP <90 mmHg, तीव्र रक्तस्त्राव, शॉक, बेशुद्धावस्था (GCS ≤8), झटके, तीव्र छातीत दुखणे, स्ट्रोकची लक्षणे, मोठी भाजणी किंवा अनेक गंभीर दुखापती |
| अत्यावश्यक (Urgent) | � नारिंगी / � पिवळा | मध्यम श्वसनत्रास, तीव्र वेदना (Pain score >7/10), तापासह गंभीर संसर्ग, हाडांचे फ्रॅक्चर, निर्जलीकरण, मध्यम रक्तस्त्राव, GCS 9–13, गंभीर पोटदुखी, विषबाधा पण स्थिर जीवनचिन्हे |
| कमी तातडीचे (Less Urgent) | � हिरवा | स्थिर जीवनचिन्हे, किरकोळ जखम, साधे फ्रॅक्चर, किरकोळ भाजणी, सौम्य ताप, सौम्य वेदना, किरकोळ अॅलर्जिक प्रतिक्रिया, जुन्या तक्रारींचे तीव्र न होणे |
| मृत / पुनर्जीवन अशक्य | ⚫ काळा | श्वसन नाही, नाडी नाही, पुनर्जीवनाचे प्रयत्न निष्फळ, जीवनाशी विसंगत दुखापती |
| निकष | धोक्याची चिन्हे |
| Airway (श्वसनमार्ग) | अडथळा, घरघर, गुदमरल्यासारखे होणे |
| Breathing (श्वसन) | RR <8 किंवा >30/मिनिट, SpO₂ <90% |
| Circulation (रक्ताभिसरण) | SBP <90 mmHg, नाडी >130/मिनिट, तीव्र रक्तस्त्राव |
| Disability (मेंदूचे कार्य) | GCS <13, गोंधळ, झटके, बेशुद्धपणा |
| Exposure (संपूर्ण तपासणी) | मोठ्या भाजण्या, अनेक दुखापती, तीव्र अॅलर्जी, विषबाधा |
| मापदंड | लाल (तात्काळ) |
| श्वसनगती | <8 किंवा >30/मिनिट |
| नाडी | >130/मिनिट किंवा खूप मंद |
| सिस्टोलिक BP | <90 mmHg |
| ऑक्सिजन संतृप्ती | <90% |
| GCS | ≤13 |
| तापमान | >40°C किंवा <35°C व अस्थिर स्थिती |
ER ट्रायेजचा मुख्य उद्देश “सर्वात गंभीर रुग्णाला सर्वप्रथम योग्य उपचार मिळणे” हा असतो. ABCDE (Airway, Breathing, Circulation, Disability, Exposure) मूल्यांकन हे प्रत्येक ट्रायेजचे मूलभूत तत्त्व मानले जाते.