
हृदयातील झडपा (Heart valves) रक्तप्रवाह एकाच दिशेने राहावा यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. हृदयात चार झडपा असतात—मायट्रल, ट्रायकसपिड, एओर्टिक आणि पल्मोनरी. या झडपा उघडणे व बंद होणे यामुळे रक्त योग्य दिशेने पुढे जाते आणि परत मागे येत नाही. झडपांमध्ये बिघाड झाल्यास (उदा. संकोच किंवा गळती) हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे श्वास लागणे, थकवा, सूज यांसारखी लक्षणे दिसू शकतात. वेळेवर निदान आणि उपचार (औषधे किंवा शस्त्रक्रिया) केल्यास रुग्णाचे आरोग्य सुधारू शकते.
जंतूदोषांमुळे हृदयाच्या झडपांचा आजार होऊन त्या बिघडतात. झडपांच्या आजाराचे व बिघाडाचे सांधेहृदयताप हे सर्वात प्रमुख कारण आहे. याशिवाय झडपांचे काही आजार जन्मजात असतात.
जन्मजात आजारांपैकी काही आजारांत झडपांत दोष (किंवा) हृदयाच्या कप्प्यांमधील पडद्यात भोके असतात. या भोकांमुळे रक्तप्रवाहात उलटसुलट गती निर्माण होते.तसेच शुध्द -अशुध्द रक्ताची सरमिसळ झाल्यामुळे हृदयाची कार्यक्षमता (शुध्द रक्ताचा सर्वत्र पुरवठा करणे आणि अशुद्ध रक्त गोळा करून परत हृदयाकडे घेऊन येणे) कमी होते.
दम लागणे हे लक्षण झडपांच्या वा पडद्यांच्या दोषामुळे येणारे प्रमुख लक्षण असते. या आजारांमुळे लहान मुलांमध्ये खेळण्याची प्रवृत्ती कमी होऊन मुले बसून राहतात. पुन्हा पुन्हा कफ/ खोकला व दम येतो. आजाराची तीव्रता जास्त असेल तर जीभ, नखे, इत्यादींवर निळसर झाक दिसते. याचा अर्थ रक्ताच्या शुध्दीकरणाचे म्हणजे प्राणवायूचे प्रमाण कमी आहे. मुलाच्या छातीवर हात ठेवला तर दर ठोक्यागणिक थरथर जाणवते. अनेक मुलांची या आजाराने वाढ खुंटते व वजन कमी राहते.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार व शस्त्रक्रिया करणे योग्य ठरेल. काही झडपांच्या व पडद्यांच्या दोषावर शस्त्रक्रियेचा अगदी चांगला फायदा होतो.

काही जणांच्या पायावरच्या नीला (शिरा) सुजलेल्या दिसतात. निरोगी अवस्थेत नीला फुगल्या तरी सरळ असतात. निलावृध्दीच्या त्रासामध्ये त्या वेड्यावाकड्या/नागमोडी दिसतात .नीला शरीरातील अशुद्ध रक्त गोळा करून हृदयाकडे परत आणण्याचे काम करतात. नीलांमध्ये रक्त उलटून येऊ नये आणि ते नीट वर चढत जावे यासाठी झडपा असतात. झडपा निकामी झाल्या, की रक्त वर चढत नाही. रक्त पायांमध्ये साठून राहते आणि नीलांना सूज आणि वळणे येतात. ज्यांना सतत उभे राहून काम करावे लागते (उदा. चौकातला वाहतूक पोलीस) अशांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. गर्भारपणातही काही स्त्रीयांना हा त्रास होतो.
नीलावृध्दीच्या पहिल्या अवस्थेत पाय जडावणे, मंद दुखणे, इत्यादी लक्षणे दिसतात. नंतर रक्त साकळून जखमा तयार होतात व या जखमा लवकर ब-या होत नाहीत.
नीलावृध्दी हा चिवट आजार आहे. पहिल्या अवस्थेत उपचार केले तर तो आटोक्यात राहू शकतो.

आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, फेरम फॉस, लॅकेसिस, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर.