
शरीरात रक्तवाहिन्यांच्या (रोहिण्यांच्या) जाळयामार्फत सर्वत्र रक्तपुरवठा होतो, हे आपण पाहिले आहे. रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दाब असणे आवश्यक आहे. रक्तदाब जास्त होतो त्याला अतिरक्तदाब म्हणतात.
अतिरक्तदाबाचे दुष्परिणाम हृदय, डोळा (नेत्रपटल), मूत्रपिंड, मेंदू इत्यादी अनेक अवयवांवर होतो.
विशीवरच्या लोकांचा म्हणजे प्रौढ व्यक्तींचा रक्तदाब तपासला तर सर्वसाधारणपणे 20 टक्के लोकांमध्ये ‘अतिरक्तदाब’ आढळतो. अतिरक्तदाबाच्या व्यक्ती शोधण्यासाठी सर्वांचाच रक्तदाब तपासण्याची मोहीम घ्यावी लागते.
१) रुग्णाची तयारी
रुग्णाला किमान ५ मिनिटे शांत बसू द्या, चहा, कॉफी, धूम्रपान ३० मिनिटे आधी टाळावे
आधी लघवी करून यायला सांगावे. बीपी मापनाच्या वेळी बोलणे टाळावे
२) योग्य बसण्याची स्थिती
पाठ खुर्चीला टेकलेली असावी, पाय जमिनीवर सरळ ठेवावेत (पाय क्रॉस करू नयेत), हात टेबलवर हृदयाच्या पातळीवर ठेवावा
३) कफ (पट्टा) लावणे
योग्य आकाराचा कफ निवडा, कफ वरच्या बाहूवर घट्ट पण आरामदायक लावा, कफचा खालचा कडा कोपराच्या २–३ से.मी. वर असावा, कफ हृदयाच्या पातळीवर असावा (चित्र पहा)
४) मापनाची प्रक्रिया (Digital Machine)
डिजिटल BP मशीन सुरू करा, “Start” बटण दाबा, मशीन आपोआप कफमध्ये हवा भरेल व सोडेल, मापन चालू असताना रुग्णाने हालचाल करू नये किंवा बोलू नये. सेल बसायला सांगा.
५) वाचन (Reading) आणि नोंद करा.
स्क्रीनवर दिसणारे: सिस्टोलिक दाब (SYS), डायस्टोलिक दाब (DIA), नाडी दर (Pulse) उदाहरण: 120/80 mmHg, Pulse 72/min
६) पुनर्मापन (Repeat)
किमान २ वेळा मोजायची पद्धत ठेवा, त्यात १–२ मिनिटे अंतर ठेवा
दोन्हीची सरासरी काढा (काही मशीनमद्धे आपोआप सरासरी येते.) अन्यथा दुसरे निरीक्षण ग्राह्य धरा.
७) नोंद (Documentation)
डायरीत बीपी (उदा. 130/85 mmHg) लिहा, कोणत्या हातावर मोजले ते आणि, तारीख व वेळ लिहा
पहिल्यांदा दोन्ही हातात BP मोजून जास्त असलेला हात पुढे वापरा. चुकीचा कफ आकार वापरल्यास चुकीचे मोजमाप होते. (जाड्या दंडाच्या माणसाला अरुंद पत्ता वापरला तर जास्त आकडा दिसेल-ते चुकीचे असेल). रुग्ण हालचाल/बोलत असल्यास रीडिंग चुकीचे येते
मशीनची बॅटरी व कॅलिब्रेशन योग्य आहे याची खात्री करा
रक्तदाब आठवड्यातून दोन तीन वेळा तपासावा आणि 2-3 आठवडे सतत जास्त आढळला तर अतिरक्तदाब आहे असे ठरवावे. केवळ एखाद्या मोजणीत लगेच निष्कर्ष काढू नये. मात्र एखादे निरीक्षण जास्त रक्तदाबचे असेल तर दुर्लक्ष करू नये.
| प्रकार | सिस्टोलिक (वरचा दाब mmHg) | डायस्टोलिक (खालचा दाब mmHg) | |
| सामान्य (Normal)/योग्य | < 120 | आणि | < 80 |
| जास्त (Elevated) | 130 – 139 | आणि | 80 – 89 |
| अतिरक्तदाब स्टेज 1 | 140-159 | आणि | 90-99 |
| अतिरक्तदाब स्टेज 2 | 160-180 | किंवा | 100-109 |
| गंभीर अतरक्तदाब स्टेज 3 | 180 आणि यापुढे | आणि | 110 आणि पुढे |
सिस्टोलिक दाब: हृदय आकुंचन पावताना होणारा दाब : डायस्टोलिक दाब: हृदय शिथिल होताना होणारा दाब
120/80 mmHg यापर्यंत योग्य रक्तदाब मानला जातो. खालचा किंवा वरचा दाब मर्यादेपेक्षा जास्त असेल तर अति-रक्तदाब मानावा.
रक्तदाब वाढण्यामागे अनेक कारणे किंवा पूरक बाबी असतात. आनुवंशिकता, स्थूलता, किडनीचे (मूत्रपिंडाचे) आजार, वाढते वय, तंबाखू दारूचे व्यसन, धमनी काठिन्य, (atherosclerosis), काही संप्रेरक विकार (उदा. थायरॉइडचे आजार), काही औषधांचा दीर्घकाळ वापर (उदा. पाळणा लांबवण्याच्या गोळया, सांधेदुखीची औषधे, स्टेरॉइडची औषधे, इ.). रक्ताच्या नात्यात अतिरक्तदाब असला तर संबंधित व्यक्तीलाही अतिरक्तदाब असण्याची शक्यता असते. काही व्यक्तिना मात्र कारण दिसून येत नाही.
उपचार न केल्यास वाढलेल्या रक्तदाबामुळे अनेक आजार उद्भवू शकतात.
या आजारात पूर्ण विश्रांती, पेनिसिलीन इंजेक्शन, ऍस्पिरिन, इत्यादी औषधोपचारांची गरज असते.
महत्त्वाचे म्हणजे पुढे घसासूज-सांधेदुखी येऊ नये म्हणून दर महिन्यास पेनिसिलीनचे एक इंजेक्शन द्यावे लागते. यामुळे झडपांचे नुकसान टळू शकते. सांधेहृदय तापामुळे झडपांचे नुकसान टाळण्यासाठी दर महिन्याला पेनिसिलीनचे इंजेक्शन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
पण सांधेहृदयतापाचे समाजातले प्रमाण कमी होण्यासाठी राहणीमान सुधारणे हाच सर्वात परिणामकारक उपाय आहे.
याबद्दल सर्वसाधारण माहिती आवश्यक आहे.
अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी दरमहा एकदा तरी रक्तदाब तपासून घ्यावा.
निफेडिपीन ही गोळी (कॅप्सूल) रक्तदाब खात्रीने कमी करायला अगदी उपयुक्त आहे. रक्तदाब 200/120 आकडयांवर गेला असेल तर तो लवकरात लवकर कमी करणे आवश्यक असते. अशा वेळी ही कॅप्सूल (5मि.ग्रॅ.) फोडून जिभेखाली धरली की काही सेकंदात रक्तदाब उतरायला सुरुवात होते. मात्र या गोळीच्या वापरात धोकेही आहेत. प्रथमोपचार म्हणून ही गोळी ठीक आहे. पुढचे उपचार होण्यासाठी डॉक्टरकडेच जावे लागते