
टाईप २ मधुमेहामध्ये इन्सुलिन हे महत्त्वाचे औषध आहे. सुरुवातीला अनेक रुग्णांमध्ये आहार नियंत्रण, व्यायाम आणि गोळ्यांनी साखर नियंत्रणात राहते; परंतु काही वर्षांनी स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्मिती कमी होत जाते. अशावेळी इन्सुलिन देण्याची गरज पडते. रक्तातील साखर खूप जास्त असणे, वजन झपाट्याने कमी होणे, वारंवार संसर्ग होणे, गर्भधारणा, शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजार अशा परिस्थितीतही इन्सुलिन उपयोगी ठरते.
इन्सुलिन त्वचेखाली इंजेक्शनद्वारे दिले जाते. आजकाल इन्सुलिन पेन वापरणे सोपे व कमी वेदनादायक असते. इन्सुलिनचे प्रकार जलद परिणाम करणारे, मध्यम कालावधीचे आणि दीर्घकालीन असे असतात. डॉक्टर रुग्णाच्या साखरेच्या पातळीप्रमाणे योग्य प्रकार व डोस ठरवतात. इन्सुलिन घेताना नियमित जेवण, व्यायाम आणि रक्तातील साखरेचे परीक्षण आवश्यक असते.
इन्सुलिनमुळे मधुमेहाच्या गुंतागुंती आणि दुष्परिणाम (मूत्रपिंड विकार, डोळ्यांचे आजार, नसांचे नुकसान आणि हृदयरोग) यांचा धोका कमी होतो. योग्य पद्धतीने व नियमित वापरल्यास इन्सुलिन सुरक्षित आणि प्रभावी उपचार ठरतो.
इन्क्रेटिन्स ही आतड्यांमधून अन्न सेवनानंतर स्रवणारी नैसर्गिक हार्मोन्स आहेत. मुख्यतः GLP-1 आणि GIP ही दोन इन्क्रेटिन हार्मोन्स महत्त्वाची मानली जातात. ही हार्मोन्स स्वादुपिंडातून इन्सुलिन स्राव वाढवतात व ग्लुकागॉन कमी करतात, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. इन्क्रेटिन्समुळे पोट रिकामे होण्याचा वेग कमी होतो व भूकही कमी लागते. टाईप २ मधुमेहात या प्रणालीचे कार्य कमी झाल्यामुळे रक्तातील साखर वाढते. त्यामुळे इन्क्रेटिनवर आधारित औषधे, जसे GLP-1 ॲनालॉग्स आणि DPP-4 inhibitors, उपचारात वापरली जातात. ही औषधे साखर नियंत्रण सुधारण्याबरोबरच काही रुग्णांमध्ये वजन कमी करण्यासही मदत करतात.
GLP-1 ॲनालॉग्स ही टाईप २ मधुमेहाच्या उपचारासाठी वापरली जाणारी आधुनिक औषधे आहेत. ही औषधे शरीरातील इन्सुलिन स्राव वाढवतात, ग्लुकागॉन कमी करतात आणि अन्न पोटातून हळूहळू पुढे सरकवतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते व भूक कमी लागते. अनेक रुग्णांमध्ये वजन कमी होण्यासही मदत होते. लिराग्लुटाइड, सेमाग्लुटाइड आणि ड्युलाग्लुटाइड ही यातील प्रमुख औषधे आहेत. काही औषधे आठवड्यातून एकदाच इंजेक्शनद्वारे दिली जातात. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही यांचा फायदा दिसून आला आहे. मात्र मळमळ, उलटी, पोटफुगी यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही औषधे वापरावीत.
नियमित निरीक्षणामुळे उपचारांचा परिणाम समजतो आणि गुंतागुंत टाळता येते.
१. स्वयं रक्तशर्करा तपासणी (SMBG)
ग्लुकोमीटरच्या साहाय्याने घरी रक्तशर्करा तपासता येते.
उद्देश :
२. HbA1c तपासणी
मागील २–३ महिन्यांतील सरासरी रक्तशर्करा दर्शवते.
३. वजन व रक्तदाब तपासणी
४. लिपिड प्रोफाइल
१. डोळ्यांची तपासणी
मधुमेही रेटिनोपॅथी लवकर ओळखण्यासाठी:
२. मूत्रपिंड तपासणी
मूत्रातील अल्ब्युमिन
सीरम क्रिएटिनिन व eGFR
३. न्युरोपॅथी तपासणी
४. पायांची तपासणी
प्रत्येक भेटीत –
यांची तपासणी करावी.
रुग्णाने दररोज स्वतःच्या पायांची पाहणी करावी.
५. हृदयविकार तपासणी
यांचे निरीक्षण करावे.
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये औषधे चालू असताना रक्तातील साखर खूप कमी होणे याला “हायपोग्लायसेमिया” असे म्हणतात. साधारणपणे रक्तातील साखर 70 mg/dL पेक्षा कमी झाल्यास “हायपोग्लायसेमिया” मानली जाते, याबरोबर सहसा लक्षणे असतात. इन्सुलिन किंवा मधुमेहावरील काही गोळ्या घेत असलेल्या रुग्णांमध्ये हा त्रास अधिक दिसतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास ही अवस्था गंभीर ठरू शकते.
हायपोग्लायसेमियाची मुख्य कारणे म्हणजे जेवण उशिरा घेणे किंवा टाळणे, औषधांचा जास्त डोस, अतिव्यायाम, उपाशीपोटी मद्यपान, उलटी-जुलाबामुळे अन्न कमी जाणे किंवा मूत्रपिंड व यकृताचे आजार. वृद्ध व्यक्तींमध्ये तसेच अनियमित जीवनशैली असणाऱ्यांमध्ये हा धोका अधिक असतो.
या अवस्थेत सुरुवातीला घाम येणे, हातपाय थरथरणे, भूक लागणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, अशक्तपणा, डोकेदुखी व बेचैनी अशी लक्षणे दिसतात. रक्तातील साखर आणखी कमी झाल्यास गोंधळ, अस्पष्ट बोलणे, दृष्टी धूसर होणे, झटके येणे किंवा बेशुद्धावस्था येऊ शकते.
हायपोग्लायसेमियाचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. वारंवार साखर कमी झाल्यास मेंदूवर परिणाम होऊ शकतो, अपघात होण्याचा धोका वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. रात्री झोपेत साखर कमी होणे विशेष धोकादायक असते.
प्रथमोपचार म्हणून रुग्ण शुद्धीत असल्यास त्वरित 3-4 चमचे साखर (१५ ग्राम) पाण्यात मिसळून द्यावी किंवा ग्लुकोज, गोड सरबत, फळांचा रस किंवा साखरयुक्त गोळ्या द्याव्यात. 15 मिनिटांनी पुन्हा साखर तपासावी. रुग्ण बेशुद्ध असल्यास तोंडात काहीही देऊ नये व त्वरित रुग्णालयात न्यावे.
प्रतिबंधासाठी औषधे वेळेवर व योग्य प्रमाणात घ्यावीत, जेवण चुकवू नये, नियमित साखर तपासणी करावी, व्यायामापूर्वी योग्य आहार घ्यावा आणि नेहमी जवळ ग्लुकोज किंवा साखर ठेवावी. मधुमेहाचे योग्य शिक्षण व काळजी घेतल्यास हायपोग्लायसेमिया टाळता येतो.