आधुनिक औषधविज्ञान

औषधांची वर्गवारी

1. पचनसंस्थेवर परिणाम करणारी औषधे

आम्लविरोधी, अन्नमार्गाचे चलनवलन आणि कळ कमी करणारी. जठरव्रण बरा करणारी, विष्ठा सैल करणारी – जुलाब घडवणारी. मूळव्याध, भगेंद्र यांवरची मलमे. जुलाब कमी करणारी-थांबवणारी. स्वादुपिंड व यकृतासंबंधी औषधे. पाचक संयुगे, इत्यादी.

2. हृदय व रक्ताभिसरणावर परिणाम करणारी औषधे

रक्तदाब कमी करणारी. हृदयविकार, वेदना यांवरची. रक्तवाहिन्यांचे जाळे सैलावणारी. रक्तवाहिन्यांचे जाळे आकुंचित करणारी (उदा. अर्धशिशीवरची अर्गोमिन गोळी, ऍड्रेनलिन इंजेक्शन). रक्तस्त्राव थांबणारी. रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारी. इतर.

3. मेंदूवर परिणाम करणारी औषधे

वेदनाशामक, तापशामक (वेदना, ताप, उलटी यांचे नियंत्रण मेंदूमार्फत होते.) उदा. अस्पिरिन, पॅमाल, झोप आणणारी. गुंगी आणणारी, शांत करणारी, नैराश्यविरोधी, उलटी-विरोधी, झटके थांबवणारी, उत्तेजित करणारी.

4. स्नायू, अस्थिसंस्थेवर परिणाम करणारी औषधे

‘दाह’-विरोधी औषधे (उदा. इब्युप्रोफेन, ऍस्पिरिन). स्नायू सैलावणारी. लचक. इत्यादींवर लावायची औषधे. चेतापेशी-स्नायुपेशी संबंधावर परिणाम करणारी औषधे (उदा. नाग, मण्यार विषबाधेवर वापरावयाचे निओस्टिग्मीन इंजेक्शन).

5. संप्रेरके

स्त्रीसंप्रेरके, पुरुषसंप्रेरके, इतर स्टेरॉईड संप्रेरके. रक्तातील साखर कमी करणारी संप्रेरके (उदा. इन्शुलिन). स्त्रीबीजसंप्रेरके (उदा. क्लोमीफेन ). गलग्रंथी संप्रेरके, इत्यादी औषधे.

6. मूत्रसंस्थेवर परिणाम करणारी औषधे

लघवी वाढवणारी. मूत्रसंस्थेतली वेदना कमी करणारी (उदा. फेनझोपायरिडीन)

7. जननसंस्थेवर परिणाम करणारी औषधे

गर्भाशयाचे स्नायू आकुंचित करण्यासाठी (अर्गोमेट्रिनची गोळी व इंजेक्शन). बाळंतपणाच्या कळा वाढवणारे (ऑक्सिटो-सीन). गर्भारपणात गर्भाशयाचे स्नायू शिथिल-शांत करणारे. गर्भपातासाठी. शुक्रपेशीमारक गर्भनिरोधक मलम, गर्भनिरोधक गोळया, इत्यादी.

8. जंतुविरोधी औषधे

प्रतिजैविक औषधे (पेनिसिलीन, ऍंपी, इमासीन, टेट्रा, इ.) सल्फा औषधे. बुरशीविरोधी (उदा. नायटा मलम). अमीबा-जिआर्डियाविरोधी. हिवताप जंतुविरोधी (उदा. क्लोरोक्वीन). जंतविरोधी (उदा. बेंडॅझोल). निरनिराळया लसी (उदा. त्रिगुणी, पोलिओ, इ.) जंतुविषविरोधी (उदा. धनुर्वात, इ.)

9. पोषणविषयक औषधे

टॉनिके. क्षुधाप्रेरक औषधे. लोहयुक्त औषधे. इतर क्षार (कॅल्शियम, इ.) जीवनजल पावडर. शिरेतून देण्याची ‘सलाईन’, ग्लुकोज सलाईन’, जीवनसत्त्वे. इतर.

10 श्वसनसंस्थेवरची औषधे

श्वासनलिकांचे जाळे सैल-रुंद करणारी, दमाविरोधी, खोकला दाबणारी (कोडीन), निरनिराळया खोकल्याची औषधे-बेडका सैल करणारी. श्वसनाला चालना देणारी (तातडीच्या वेळी वापरण्याची) औषधे.

11. नाक, कान, घसा

चोंदलेले नाक मोकळे करणारी औषधे, कानाचे निरनिराळे थेंब-जंतुनाशक, बुरशीनाशक, मळ सैलावणारी, इ.

12 डोळयावरची औषधे

जंतुदोषविरोधी थेंब, मलमे, दाह कमी करणारी, डोळयाची बाहुली आकुंचित किंवा मोठी करणारी, इतर.

13 अलर्जी वावडेविरोधी औषधे

उदा. सी.पी.एम. गोळी, स्टेरॉईड औषधे, इ.

14. त्त्वचेसंबंधी औषधे

दाहशामक औषधे (उदा. कॅलमिन द्राव). बुरशीनाशक, जंतुदोषनाशक, इ.

15. शस्त्रक्रिया व भूल या संबंधाची औषधे

उदा. भूल देण्याचे ईथर, इ. शस्त्रक्रियेसाठी जंतुनाशक द्राव, इ.

16. कर्करोगविरोधी औषधे
17. प्रतिकारशक्तीसंबंधी औषधे

शरीराच्या संरक्षण व्यवस्थेचा उपद्रव होत असेल तर तो दाबणारी औषधे (उदा. स्टेरॉईड औषधे)

18. व्यसनमुक्ततेसाठी मदत करणारी औषधे

उदा. दारूच्या व्यसनातून सोडवण्यासाठी डायसल्फिराम.

19. विषबाधेवरचे उतारे

सर्प विषउतारा (ए.एस.व्ही.), हेपारिन निओस्टिग्मीन. कीटकनाशकांवरचे उतारे (उदा. ऍट्रापिन, पाम, इ.)

20. रक्त व रक्तपेशी, रक्तद्राव, इ.

शस्त्रक्रियेच्या वेळी. रक्तस्त्राव भरून काढण्यासाठी. तीव्र रक्तपांढरी झाली असेल त्यावेळी वापरण्यासाठी.

प्राथमिक आरोग्य सेवेसाठी योग्य औषधांची निवड

इथे दिलेली औषधांची यादी आयुष्मान आरोग्य मंदिर साठी बनवलेली आहे. हे करताना खालील पाच कसोटया लावल्या गेल्या आहेत. निरनिराळया औषधांचा अभ्यास करून जास्तीत जास्त योग्य औषध निवडले आहे.

  • समाजात संबंधित रोगांचे प्रमाण व महत्त्व.
  • परिणामकारकता (रोग हटवण्याची शक्ती)
  • निर्धोकपणा (कमीत कमी दुष्परिणाम असणे)
  • स्वस्त किंमत
  • सुलभता व औषध देण्याची पध्दत सोपी असणे (उदा. इंजेक्शनऐवजी औषध तोंडाने घेणे वगैरे)

आयुष्मान आरोग्य मंदिरात असलेल्या औषधांची यादी व माहिती 

NoMedicine (English + Marathi)StrengthDoseIndicationSide effects
1Paracetamol (पॅरासिटामॉल)500 mg500–650 mg 6–8 तासांनीताप, वेदनामळमळ
2Ibuprofen (आयबुप्रोफेन)400 mgदिवसातून 2–3 वेळावेदना, सूजअ‍ॅसिडिटी
3Diclofenac (डायक्लोफेनॅक)50 mgदिवसातून 2 वेळासांधेदुखीपोटदुखी
4Aspirin (ॲस्पिरिन)75 mgदिवसातून 1 वेळाहृदय संरक्षणपोट जळजळ
5Amoxicillin (अमॉक्सिसिलिन)500 mgदिवसातून 3 वेळाबॅक्टेरियल संसर्गअ‍ॅलर्जी
6Azithromycin (अ‍ॅझिथ्रोमायसिन)500 mgदिवसातून 1 वेळाश्वसन संक्रमणमळमळ
7Cotrimoxazole (कोट्रिमोक्साझोल)480 mgदिवसातून 2 वेळाUTIपुरळ
8Doxycycline (डॉक्सीसायक्लिन)100 mgदिवसातून 2 वेळासंसर्गफोटोसेंसिटिव्हिटी
9Cephalexin (सेफॅलेक्सिन)500 mgदिवसातून 2–3 वेळात्वचा संक्रमणजुलाब
10Metronidazole (मेट्रोनिडाझोल)400 mgदिवसातून 3 वेळाआंत्र संक्रमणधातूसारखी चव
11Cetirizine (सेटिरीझिन)10 mgदिवसातून 1 वेळाअ‍ॅलर्जीझोप
12Chlorpheniramine (क्लोरफेनिरामीन)4 mgदिवसातून 2–3 वेळाअ‍ॅलर्जीझोप
13Levocetirizine (लेव्होसेटिरीझिन)5 mgदिवसातून 1 वेळाअ‍ॅलर्जीथकवा
14Omeprazole (ओमेप्राझोल)20 mgदिवसातून 1 वेळाअ‍ॅसिडिटीडोकेदुखी
15Pantoprazole (पँटोप्राझोल)40 mgदिवसातून 1 वेळाअ‍ॅसिडिटीपोटदुखी
16Antacid syrup (अँटासिड)Syrup2 चमचेअ‍ॅसिडिटीबद्धकोष्ठता
17Domperidone (डॉम्पेरिडोन)10 mgदिवसातून 2–3 वेळाउलटीडोकेदुखी
18Ondansetron (ओन्डॅन्सेट्रॉन)4 mgदिवसातून 2 वेळाउलटीबद्धकोष्ठता
19ORS (ओआरएस)Sachet1 लिटर पाणीडिहायड्रेशनक्वचित उलटी
20Zinc (झिंक)20 mgदिवसातून 1 वेळाबाल जुलाबमळमळ
21Loperamide (लोपेरामाइड)2 mgगरजेनुसारजुलाबबद्धकोष्ठता
22Albendazole (अल्बेंडाझोल)400 mgएकदाजंतपोटदुखी
23Mebendazole (मेबेंडाझोल)100 mgदिवसातून 2 वेळाजंतपोटदुखी
24Clotrimazole (क्लोट्रिमाझोल)1% creamदिवसातून 2 वेळाबुरशीजळजळ
25Ketoconazole (केटोकोनाझोल)2% creamदिवसातून 2 वेळाबुरशीत्वचा लाल
26Permethrin (पर्मेथ्रीन)5% lotionएकदाखाजजळजळ
27Povidone iodine (पोविडोन आयोडीन)Solutionस्थानिकजखमirritation
28Silver sulphadiazine (सिल्व्हर सल्फाडायाझिन)1% creamदिवसातून 2 वेळाभाजणेirritation
29Salbutamol tablet (साल्बुटामोल)2 mgदिवसातून 2–3 वेळादमाथरथर
30Salbutamol inhaler (साल्बुटामोल इनहेलर)100 mcgगरजेनुसारदमाधडधड
31Beclomethasone inhaler (बेक्लोमेथासोन)Inhaler2 puffदमाघसा खवखव
32Dextromethorphan (डेक्स्ट्रोमेथॉर्फन)Syrupदिवसातून 2–3 वेळाखोकलाझोप
33Metformin (मेटफॉर्मिन)500 mgदिवसातून 2 वेळामधुमेहजुलाब
34Glibenclamide (ग्लायबेनक्लामाइड)5 mgदिवसातून 1 वेळामधुमेहहायपोग्लायसेमिया
35Glimepiride (ग्लायमिपिराइड)1 mgदिवसातून 1 वेळामधुमेहहायपोग्लायसेमिया
36Amlodipine (अम्लोडिपीन)5 mgदिवसातून 1 वेळाBPसूज
37Atenolol (अटेनोंलॉल)50 mgदिवसातून 1 वेळाBPथकवा
38Losartan (लॉसार्टन)50 mgदिवसातून 1 वेळाBPगरगर
39Enalapril (एनालाप्रिल)5 mgदिवसातून 1 वेळाBPकोरडा खोकला
40Hydrochlorothiazide (हायड्रोक्लोरोथायाझाइड)12.5 mgदिवसातून 1 वेळाBPमूत्र जास्त
41Iron + Folic acid (आयर्न फॉलिक अ‍ॅसिड)60 mg + 500 mcgदिवसातून 1 वेळाअ‍ॅनिमियापोटदुखी
42Folic acid (फॉलिक अ‍ॅसिड)5 mgदिवसातून 1 वेळाअ‍ॅनिमियामळमळ
43Vitamin B complex (व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स)Tabletदिवसातून 1 वेळापोषणमळमळ
44Vitamin C (व्हिटॅमिन C)500 mgदिवसातून 1 वेळाप्रतिरोधकताअ‍ॅसिडिटी
45Calcium (कॅल्शियम)500 mgदिवसातून 1–2 वेळाहाडेबद्धकोष्ठता
46Oral contraceptive pills (गर्भनिरोधक गोळ्या)Tabletदैनिककुटुंब नियोजनमळमळ
47Medroxyprogesterone (मेड्रॉक्सीप्रोजेस्टेरॉन)Injection3 महिनेगर्भनिरोधवजन वाढ
48Misoprostol (मिसोप्रोस्टॉल)200 mcgगरजेनुसारPPHपोटदुखी
49Adrenaline (अ‍ॅड्रेनालिन)1 mg/mlआपत्कालीनअ‍ॅनाफिलॅक्सिसधडधड
50Atropine (अ‍ॅट्रोपीन)0.6 mgआपत्कालीनब्रॅडिकार्डियातोंड कोरडे
51Diazepam (डायझेपाम)5 mgगरजेनुसारझटकेझोप
52Dextrose (डेक्स्ट्रोज)25%IVहायपोग्लायसेमियाirritation
53Normal saline (नॉर्मल सलाईन)IV fluidIVडिहायड्रेशनसूज
54Ringer lactate (रिंगर लॅक्टेट)IV fluidIVशॉकसूज
55Lignocaine (लिग्नोकेन)2%स्थानिकअ‍ॅनेस्थेसियागरगर
56Potassium permanganate (पोटॅशियम परमॅंगनेट)Solutionस्थानिकजखमirritation
57Hydrogen peroxide (हायड्रोजन पेरॉक्साइड)3%स्थानिकजखम स्वच्छजळजळ
58Gentamicin eye drops (जेंटामायसिन आय ड्रॉप)0.3%दिवसातून 2–3 वेळाडोळा संक्रमणजळजळ
59Tetracycline eye ointment (टेट्रासायक्लिन आय मलम)1%दिवसातून 2 वेळाडोळा संक्रमणजळजळ
60Multivitamin syrup (मल्टिव्हिटॅमिन सिरप)Syrupदैनिकपोषणमळमळ