बालकांचे आरोग्य

लहान मुलांच्या उलटया

लहान मुलांच्या उलटयांची कारणे अगदी साधी ते खूप गंभीर आजारांपर्यंत असतात.

  • 3-4 महिन्यापर्यंत ढेकर न काढल्यामुळे, आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ आणि जास्त वेळा पाजणे यामुळे बरीच बाळे उलटी करतात.;
उलटी साधी असेल असे कशावरून समजते ?
  • पाजून झाल्यानंतर लगेच उलटी होणे, दही किंवा दुधासारखी पांढरी उलटी होणे, बाळाचे वजन कमी न होणे, किंबहुना नेहमीप्रमाणे वाढते राहणे, बाळ खेळकर व आनंदी दिसत असणे , ही लक्षणे बहुधा साधी उलटी असल्याचे दाखवतात. अशा वेळी कुठलेही औषध लागत नाही. फक्त दूध पाजण्याचे प्रमाण, कालावधी आणि पाजताना ठेवायची शरीराची विशिष्ट बैठक या योग्य पद्धतीने कराव्यात.बाळाची ढेकर नीट काढावी.
उलटीचेकारण गंभीर असेल का ?
  • उलटी खूप जोरात होते. टाळू फुगते, ताप येतो – अशी उलटी बहुधा मेंदूच्या जंतूसंसर्गात होते.
  • उलटीचा रंग हिरवट, पोट फुगते, संडास नीट होत नाही, किंवा लालसर रंगाची अगदी थोडी होते व बाळ किंचाळून रडते – अशा वेळी  बहुधा आतडयातील आजार असतो. उदा. आतडी एकात एक  अडकणे, आतड्यास पीळ पडणे, ऍपेंडिक्स सूज इत्यादी.
  • उलटीबरोबर ताप असेल तर आतडयातील जंतुदोष, कानदुखी, घसादुखी, लिव्हरचे आजार, कावीळ, इ. असू शकेल.
  • उलटीसोबत वजन घटणे, वाढ नीट नसणे या गोष्टी असतील तर किडनीचे आजार असू शकतात.
  • उलटीसोबत जुलाब असतील तर हा जुलाब उलटयांचा आजार असू शकतो.
  • काही औषधांमुळे उलटया होतात.
  • प्रवास (गाडी लागणे) यासारखी कारणेही लहान मुलांमध्ये असू शकतात.

उलटीबरोबर खालील गोष्टी असतील तर गंभीर आजार असू शकेल. याबाळांनालवकरपुढीलउपचारांसाठीपाठवा.

  • परतपरत उलटया
  • उलटयांसोबत गुंगी येणे, दूध न मागणे,
  • पोट फुगणे या गोष्टी गंभीर जंतुसंसर्ग दर्शवतात.
  • पोटावरून आतडयांची हालचाल दिसणे, पोटात गाठ लागणे, हे देखील ताबडतोब तपासण्या करून इलाज करण्याची लक्षणे असतात.
प्रथमोपचार
  • डॉम्पेरिडोन हे औषध 0.2 मि.ग्रॅ./प्रति कि.ग्रॅ पाजावे. त्यानंतर अर्धा तास काही देऊ नये. नंतर खायला किंवा प्यायला द्यावे
  • जलसंजीवनी देत रहा .

मध्यकर्ण सूज

पाच वर्षाच्या आतील बालकांना कानदुखीचा त्रास होऊ शकतो या आजारात मुख्यतः मध्यकर्ण संसर्ग दूषित होऊन तिथे सूज येते व त्यात होऊ शकतो आणि कान फुटू शकतो. बालकाला थोडाही ताप असेल आणि कान दुखत असेल तर ते सारखे कानाकडे हात नेते आणि दुखताना रडते.  या कान सुजेच्या खाणाखुणा  आहेत. बालकांमध्ये कानामध्ये संसर्ग होण्याची अनेक कारणे आहेत. कोणत्याही बाह्य श्वसन संस्थेच्या आजारात संसर्ग  मध्य कर्णामध्ये जाऊ शकतो. या आजाराला वेळीच उपचार करायला पाहिजे.  अमोक्सीसिलिन हे प्रतिजैवी औषध यावर उपयोगी आहे मात्र कानाच्या डॉक्टरला दाखवायला हवे. कानाच्या पडद्याला सूज येत असेल तर तो फुटू नये म्हणून वेळीच उपचार करायला हवे. सहा महिन्यात दोन-तीन वेळा सुजत असेल तर विशेष काळजी घ्यायला हवी. कानामध्ये वारंवार सूज येत असेल तर कानाच्या पडद्याला बारीक छिद्र करून ग्रोमेट नावाचीबारीक गल्ली का तिथे बसविली जाते. यामुळे आपला बाहेर येत राहतो आणि कान लवकर बरा होतो. 

गालगुंड

गालगुंड हा विषाणुजन्य आजार सहसा लहान मुलांमध्ये (पाच-सहा वर्षे) येतो. या वयात हा एक तसा निरुपद्रवी आजार असतो. हा आजार लहान वयात आला नाही तर मोठया वयात येण्याची शक्यता असते. असे झाले तर स्त्रीबीजांड- पुरुषबीजांडामध्ये हा आजार शिरून वंध्यत्व येण्याची दाट शक्यता असते हे त्याचे वैशिष्टय आहे. म्हणून गालगुंड टाळण्यासाठी लस दिली जाते.

हा आजार मुलांमध्ये श्वसनामार्फत पसरतो. थोडा ताप, लाळग्रंथी (गालातील) सुजणे, दुखणे ही त्यांपैकी मुख्य लक्षणे. पाच-सात दिवसांत हा आजार बरा होतो.

प्रौढ व्यक्तींना मात्र या ‘गालफुगी’ बरोबर वृषण (पुरुष) किंवा ओटीपोटात (स्त्रिया) दुखल्यास बीजांडापर्यंत आजार पोचल्याची ही खूण असते. यामुळे कायमचे वंध्यत्व येण्याची शक्यता असते. तरुण-मोठया माणसांमधील गालफुगी म्हणूनच गंभीर असते. लहान मुलांना नुसते पॅमाल औषध पुरते.

प्रतिबंधक उपाय

गालगुंडांसाठी प्रतिबंधक लस आहे, पण ती महाग असल्याने अजून तरी सार्वत्रिक वापरात नाही. गालगुंडाची प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते.

हातापायातील शक्ति अचानक  जाणे (AFP)

मुलांमधीलतीव्रशिथिलपक्षाघात(Acute Flaccid Paralysis – AFP)

तीव्र शिथिल पक्षाघात (Acute Flaccid Paralysis – AFP) म्हणजे मुलांमध्ये अचानक सुरू होणारा स्नायूंचा अशक्तपणा किंवा पक्षाघात होणे. या स्थितीत हात किंवा पाय अचानक सैल (flaccid) होतात आणि हालचाल करणे कठीण होते. १५ वर्षांखालील मुलांमध्ये दिसणारा कोणताही अचानक पक्षाघात AFP म्हणून नोंदवला जातो, कारण तो पोलिओ या आजाराशी संबंधित असू शकतो.

AFP होण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये पोलिओ विषाणू, गिलेनबार्रे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome), काही इतर विषाणूजन्य संसर्ग, तसेच मज्जासंस्थेवरील इजा यांचा समावेश होतो. त्यामुळे AFP हा स्वतः एक रोग नसून विविध आजारांमुळे होणारी एक लक्षणांची अवस्था आहे.

या स्थितीची लक्षणे अचानक दिसू लागतात. मुलाला चालताना अडचण येणे, पायात किंवा हातात अशक्तपणा जाणवणे, पाय सैल पडणे, चालताना पडणे किंवा हालचाल न होणे अशी लक्षणे दिसतात. काही मुलांमध्ये तापानंतर अचानक पक्षाघात सुरू होऊ शकतो. बहुतेक वेळा यात वेदना कमी असतात, पण स्नायूंची शक्ती कमी होते.

AFP हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण पोलिओ निर्मूलन कार्यक्रमात प्रत्येक AFP प्रकरणाची नोंद करणे आवश्यक असते. अशा मुलांची त्वरित तपासणी करून दोन मलनमुने (stool samples) प्रयोगशाळेत पाठवले जातात.

उपचार कारणावर अवलंबून असतात. काही प्रकरणांमध्ये औषधोपचार, फिजिओथेरपी आणि पुनर्वसनाची गरज असते. तसेच मुलाला योग्य पोषण आणि काळजी देणे महत्त्वाचे असते.

पोलिओविरुद्ध लसीकरण हे AFP टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे सर्व मुलांना वेळेवर पोलिओ लस देणे अत्यंत आवश्यक आहे.