लिंगसांसर्गिक आजार आणि एड्स

This webpage will be updated

लिंगसांसर्गिक आजारांचे दुष्परिणाम

  • स्त्री-पुरुष जननेंद्रिय सुजून नंतर वंध्यत्व (Infertility)
  • गर्भधारणेतील गुंतागुंत -गर्भाला संक्रमण आणि आजार
  • नवजात बाळावर परिणाम-जन्मजात आजार किंवा व्यंग  
  • इतर लिंगसांसर्गिक आजार असताना एचआयव्ही संसर्गाचा धोका वाढतो 
  • दीर्घकालीन सूज आणि वेदना 
प्राथमिक आरोग्य पातळीवरील निदान – सिंड्रोमिक म्हणजे लक्षणगट पद्धत

सिंड्रोमिक म्हणजे लक्षणगट पद्धतीत रुग्णाच्या लक्षणांवर आधारित उपचार केले जातात. यातून रक्त-तपासणीच्या रीपोर्टची वाट न पाहता त्वरित उपचार सुरू करता येतात.

प्रमुख लक्षणगट सिंड्रोम

  • मूत्रमार्गातून स्त्राव 
  • योनीतून स्त्राव 
  • जननेंद्रिय जखम (सामान्यपणे पुरुष जननेंद्रियावर सहज कळून येते) 
  • स्त्रियांमध्ये खालच्या ओटीपोटात वेदना 
  • अंडकोश सूज 
प्राथमिक उपचार (Dose व Duration सहित) : माहितीसाठी – वैद्यकीय सल्ला घेऊनच पुढील उपचार व्हावेत.
लक्षणगट  (Condition)उपचार (Treatment)
1. मूत्रमार्गातून स्त्राव (Urethral Discharge)
संशय: गोनोरिया + क्लॅमिडिया
Ceftriaxone 500 mg IM – एकदाच
Azithromycin 1 g – एकदाच
पर्याय: Doxycycline 100 mg BD × 7 दिवस
2. योनीतून स्त्राव (Vaginal Discharge)Metronidazole 400 mg BD × 7 दिवस
Fluconazole 150 mg – एकदाच
3. जननेंद्रिय जखम (Genital Ulcer) – सिफिलिसBenzathine Penicillin 2.4 million units IM – एकदाच
Allergy असल्यास: Doxycycline 100 mg BD × 14 दिवस
3. जननेंद्रिय जखम (Genital Ulcer) – हर्पिसAcyclovir 400 mg TDS × 7 दिवस
4. स्त्रिया: ओटीपोटात वेदना (PID)Ceftriaxone 500 mg IM
Doxycycline 100 mg BD × 14 दिवस
Metronidazole 400 mg BD × 14 दिवस
5. अंडकोश सूज (Scrotal Swelling)Ceftriaxone 500 mg IM
Doxycycline 100 mg BD × 10–14 दिवस
6. जननेंद्रिय वॉर्ट्स (Genital Warts)Podophyllin स्थानिक वापर
TCA / क्रायोथेरपी
7. स्कॅबीज-खरूज  आणि  उवा (Scabies / Lice)Permethrin 5% लोशन
7 दिवसांनी पुनर्वापर
8. ट्रायकोमोनायसिस (Trichomoniasis)-हिरवट स्त्रावMetronidazole 2 g single dose
किंवा 400 mg BD × 7 दिवस
उपचार करताना महत्त्वाचे मुद्दे

✔️ लैंगिक जोडीदाराला देखील उपचार

दोन्ही जोडीदारांना उपचार देणे आवश्यक, नाहीतर आजार एकमेकात फिरत राहील.

✔️ लैंगिक संबंध टाळा

उपचार पूर्ण होईपर्यंत लैंगिक संबंध टाळावे

✔️ HIV तपासणी

सर्व STI रुग्णांसाठी आवश्यक:  एचआयव्ही हा लपून राहणारा व उशिरा उमटणारा घातक आजार आहे, त्यामुळे ही तपासणी अनिवार्य आहे.

✔️ पुनर्तपासणी

लिंगसांसर्गिक आजारावर उपचार केल्यावर सात  दिवसांनी पुनर्तपासणी करावी

गर्भवती महिलांमध्ये STI असल्यास
  • सिफिलिससाठी  → Penicillin सुरक्षित  आहे
  • उपचारात Doxycycline टाळावे 
  • नवजात बाळावर परिणाम टाळण्यासाठी एचआयव्ही वऱ उपचार आवश्यक 
प्रतिबंधात्मक उपाय

1. सुरक्षित लैंगिक संबंध – निरोध/कंडोमचा वापर

2. एकनिष्ठ संबंध – एकाच जोडीदारासोबत संबंध

3. नियमित तपासणी – जास्त धोका असलेल्या गटांसाठी

4. लसीकरण आवश्यक

  • HPV -ह्यूमन पॅपीलोमा लस
  • Hepatitis B – हेपटायटिस बी लस (जन्मानंतर दिली जाते, तसेच सर्व वैद्यकीय कर्मचारी आणि लैंगिक व्यवसाय कामगार यांनी प्रतिबंधक म्हणून घेणे आवश्यक
समुपदेशनाचे महत्त्व
  • सुरक्षित लैंगिक सवयी-मर्यादित जोडीदार्, बाजारू व स्वैर संबंध टाळणे  
  • लिंगसांसर्गिक आजारावर उपचार घेताना औषधे पूर्ण घेणे, तरच संसर्ग पूर्ण बरा होऊ शकतो.  
  • जोडीदारावर देखील उपचार आवश्यक

आरोग्य सेवकाची भूमिका

  • आवश्यक तिथे रुग्णाचा इतिहास/माहिती घेणे (पण व्यक्तीगत प्रतिष्ठा सांभाळून) 
  • गोपनीयता राखणे 
  • योग्य उपचार देणे 
  • जनजागृती 
सिंड्रोमिक लक्षणगट पद्धतीचे फायदे
  • तज्ञ डॉक्टरी तपासणीची गरज नाही, प्रशिक्षित आरोग्य कर्मचार्यांकडून गावात देखील उपचार उपलब्ध.
  • त्वरित उपचार शक्य (लॅब रिपोर्टसाठी थांबायला लागत नाही) 
  • सोपी व व्यवहार्य 
  • कमी खर्च 

मर्यादा

  • अचूक निदान नाही 
  • गरजेपेक्षा जास्त औषधोपचार होण्याची शक्यता