
हा वृध्दापकाळाचा आजार आहे. 60 वर्ष वयापुढच्या 7% व्यक्तींना हा आजार होतो. हा आजार लकवा म्हणूनही ओळखला जातो. वृध्दापकाळात येणारा हा आजार लगेच ओळखू येतो. हाताच्या मनगटाची आणि बोटांची न थांबणारी हालचाल (जपमाळ ओढल्यासारखी) ही याची खूण आहे. हाताने काही करायला गेले की तात्पुरती ही हालचाल थांबते, पण काम संपले की लगेचच हालचाल चालू होते. हाताबरोबरच मान, डोके यांचीही हालचाल असू शकते. थरकाप/कंप नसतो तेव्हा स्नायूंना ताठरपणा असतो.
हा वृध्दापकाळाचा आजार आहे. 60 वर्ष वयापुढच्या 7% व्यक्तींना हा आजार होतो. हा आजार लकवा म्हणूनही ओळखला जातो. वृध्दापकाळात येणारा हा आजार लगेच ओळखू येतो.
हाताच्या मनगटाची आणि बोटांची न थांबणारी हालचाल (जपमाळ ओढल्यासारखी) ही याची खूण आहे. हाताने काही करायला गेले की तात्पुरती ही हालचाल थांबते, पण काम संपले की लगेचच हालचाल चालू होते. हाताबरोबरच मान, डोके यांचीही हालचाल असू शकते. थरकाप/कंप नसतो तेव्हा स्नायूंना ताठरपणा असतो.
सुरवातीस या आजारात चेहरा भावहीन मुखवटयासारखा असतो. एकूण हालचाल मंद असते. कपडे घालणे, खाणे, चालणे व इतर दैनंदिन व्यवहार खूपच सावकाश होतात. हस्ताक्षर लहान लहान होत जाते आणि ओळखू येईनासे होते. हातांच्या हालचाली परत परत त्याच त्याच क्रमाने होत राहतात. आवाज घोगरा, एकसुरी, अडखळत होतो. मात्र बोलणे नेहमीपेक्षा वेगाने चालते. घाम थोडा जास्तच येतो. चेहरा जास्त तेलकट-मेणचट दिसतो. मान-चेहरा पुढे जास्त सुकलेले असतात आणि पाठीला कुबड असल्याप्रमाणे दिसते. हातांचे कोपरे आणि मनगट नेहमी वाकलेले दिसतात. शर्टची पॅन्टची बटणे किंवा नाडी बांधणे अवघड होते. कुलूपात किल्ली घालून फिरवणे हेही अवघड होते.
आजाराच्या उशिरच्या अवस्थेत: बसल्या जागी उठताना जड जाते, यात बराच प्रयत्न करावा लागतो. चाल थोडी मंद आणि दुडकी असते आणि थोडी लंगडताना दिसते. पाय जमिनीवरून लवकर उचलत नाहीत. झोपल्यावर कूस बदले जड जाते. पुढे पुढे गिळणे अवघड होते.
कामे पूर्ण होत नाहीत, स्मरण राहत नाही, बुद्धीचा ऱ्हास होत जातो, उठल्यावर रक्तदाब कमी पडतो (अंधारी येते), बद्धकोष्ठ, आपसूक लघवी होऊन जाणे, लैंगिक क्रिया थांबणे, निद्रानाश, दिवसा झोपाळूपणा/पेंगणे, पाय हालत राहणे, वेदना, बधीरता, थकवा, वास न येणे इत्यादि
उपचार
तज्ञसल्ला महत्वाचा. माहीत-जाणीव, समुपदेशन, मार्गदर्शन, कुटुंबास कल्पना देऊन सहाय करणे ही मुख्य सूत्रे आहेत. आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी लेवोडोपा इत्यादि औषधे आहेत. तरी हळूहळू आजार वाढत जातो आणि मृत्यू लवकर येतो. काही प्रकारात मेंदूवरील शस्त्रक्रियेचा उपयोग होईल, त्यासाठी तज्ञ सल्ला घ्यावा.
या आजारासाठी औषधोचाराबरोबरच हलके व्यायामोपचार करावे लागतात. औषधांचे दुष्परिणामही होउ शकतात.. रुग्णाला मानसिक/कौटुंबिक आधाराची गरज असते. या आजारावर चांगली औषधे उपलब्ध आहेत. गोळया दीर्घकाल घ्याव्या लागतात.
हायपरकायनेटिक विकार म्हणजे शरीरात अनियंत्रित, जास्त किंवा अनावश्यक हालचाली होणारे चेतासंस्थेचे विकार. हे विकार मेंदूतील हालचाली नियंत्रित करणाऱ्या भागांमध्ये (विशेषतः बेसल गॅन्ग्लिया) झालेल्या बिघाडामुळे निर्माण होतात. अशा विकारांमुळे रुग्णाच्या दैनंदिन कामांवर, बोलण्यावर आणि चालण्यावर परिणाम होतो.
हायपरकायनेटिक विकार पूर्णपणे बरे होणे नेहमी शक्य नसते, पण योग्य उपचारांनी लक्षणे नियंत्रित करता येतात.
मणक्याच्या चेतारज्जू चे (Spinal Cord) आजार हे आरोग्य कार्यकर्त्यांसाठी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यांचा परिणाम रुग्णाच्या हालचाली, संवेदना आणि मूत्र-विसर्जन नियंत्रणावर होतो. चेतारज्जू ही मेंदूपासून शरीराच्या सर्व भागांना संदेश पोहोचवणारी मुख्य नाडी आहे. त्यामुळे यामध्ये झालेला कोणताही आजार गंभीर परिणाम घडवू शकतो.

चेतारज्जू (Spinal cord) ही केंद्रीय मज्जासंस्थेचा (Central nervous system) महत्त्वाचा भाग असून ती मेंदूचा खालचा विस्तार आहे. ती मणक्यांच्या कण्यातील (vertebral canal) नलिकेमध्ये सुरक्षितपणे असते आणि मेंदूपासून शरीराच्या सर्व भागांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे काम करते. प्रौढ व्यक्तीत तिची लांबी सुमारे ४५ सेमी असते.
रचनेच्या दृष्टीने चेतारज्जूच्या मध्यभागी ग्रे मॅटर (राखाडी भाग) असतो, जो ‘H’ आकाराचा दिसतो, आणि बाहेरील भागात व्हाईट मॅटर (पांढरा भाग) असतो. ग्रे मॅटरमध्ये न्यूरॉन पेशींची केंद्रे असतात, तर व्हाईट मॅटरमध्ये मज्जातंतूंचे तंतू (nerve Fibers) असतात जे संदेश वाहून नेतात. चेतारज्जूपासून ३१ जोड्या स्पायनल नर्व्ह्स बाहेर पडतात, ज्या शरीराच्या विविध भागांना पुरवठा करतात.
चेतारज्जूचे मुख्य कार्य दोन प्रकारचे आहे: (१) संदेश वहन (conduction) आणि (२) रिफ्लेक्स क्रिया (reflex action). संवेदन तंतू (sensory nerves) शरीरातील वेदना, तापमान, स्पर्श यांची माहिती मेंदूपर्यंत पोहोचवतात, तर मोटर तंतू (motor nerves) मेंदूपासून आलेले आदेश स्नायूंना पोहोचवतात, ज्यामुळे हालचाल होते. रिफ्लेक्स क्रिया ही चेतारज्जूची महत्त्वाची क्षमता आहे. उदा., गरम वस्तूला स्पर्श झाल्यास हात त्वरित मागे घेणे—ही क्रिया मेंदूचा विलंब न लावता चेतारज्जूद्वारे नियंत्रित होते.
याशिवाय, चेतारज्जू शरीराचा समतोल, स्नायूंचा टोन आणि काही स्वायत्त क्रिया सांभाळतात.