लिंगसांसर्गिक आजार आणि एड्स

This webpage will be updated

दुखराव्रण (Chancroid)

दुखराव्रण (Chancroid) Haemophilus ducreyi या जीवाणूमुळे होतो.

रोगनिर्मिती (Pathology):
हा जीवाणू जननेंद्रिय-त्वचेतील सूक्ष्म जखमांमधून शरीरात प्रवेश करतो. संक्रमणामुळे स्थानिक दाह, अंतरत्वचेला जखमा (ulceration) आणि पू निर्माण होतो. पुढे हा संसर्ग लसीका ग्रंथींमध्ये पसरून दुखरया गा-अवधाण  (सुजलेले, वेदनादायक लिम्फ नोड्स) होते, हे नंतर  फुटून पू येतो.

लक्षणे (Symptoms):
दुखराव्रण मध्ये, जननेंद्रियावर वेदनादायक मऊ व्रण (सॉफ्ट-ulcer) दिसतात. या व्रणातून पूयुक्त रक्तस्त्राव होतो. जांघेतील लसीका ग्रंथी सुजणे, वेदना व ताप दिसू शकतो. हे व्रण सिफिलिसमधील व्रणांपेक्षा मऊ पण वेदनादायक असतात, हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

रोगनिदान (Diagnostics):
निदान मुख्यतः लक्षणांवर (सिंड्रोमिक पद्धत) आधारित केले जाते. इतर STI जसे सिफिलिस व HIV साठी तपासणी करणे आवश्यक आहे.

उपचार (Treatment):
दुखराव्रण आजारासाठी एक डोस अझीथरोमायसीन (Azithromycin) किंवा Ceftriaxone दिले जाते. काही प्रकरणांमध्ये एरिथ्रोमायसीन 7  दिवस देतात. पू झालेली गाठ असल्यास पू काढून टाकणे आवश्यक असते. रुग्णाच्या लैंगिक जोडीदाराचा उपचार करणे महत्त्वाचे आहे.

एलजीव्ही व्रण विकार

व्रणविकार एलजीव्ही (Lymphogranuloma Venereum – LGV) हा एक लैंगिक संसर्गजन्य आजार (STI) असून तो Chlamydia trachomatis (L1, L2, L3 प्रकार) या जीवाणूमुळे होतो. हा आजार असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरतो आणि विशेषतः उच्च-जोखमीच्या गटांमध्ये आढळतो. आरोग्य कार्यकर्त्यांनी याची लक्षणे, निदान व उपचार यांची माहिती ठेवणे आवश्यक आहे.

रोगनिर्मिती (Pathology):
हा जीवाणू त्वचा किंवा श्लेष्मल त्वचेतील सूक्ष्म जखमांमधून शरीरात प्रवेश करतो. सुरुवातीला स्थानिक संसर्ग होऊन नंतर तो लसीका वाहिन्या (lymphatics) व लसीका ग्रंथींमध्ये पसरतो. यामुळे तीव्र दाह, सूज आणि “बुबो” (सुजलेल्या, वेदनादायक अवधाण लिम्फ नोड्स) तयार होतात.

लक्षणे (Symptoms):
प्रारंभी लहान, वेदनारहित जखम (ulcer) दिसू शकते, जी अनेकदा दुर्लक्षित राहते. नंतर कंबर किंवा जांघेत लसीका ग्रंथी सुजणे, वेदना, ताप दिसतो. काही वेळा या ग्रंथी फुटून पू बाहेर येतो. गुदमार्गाचा संसर्ग झाल्यास वेदना, स्त्राव, रक्तस्राव आणि शौचास त्रास होऊ शकतो (proctocolitis). उपचार न केल्यास दीर्घकालीन सूज व विकृती (fibrosis) होऊ शकते.

निदान (Diagnostics):
निदान मुख्यतः लक्षणांवर (सिंड्रोमिक पद्धत) आधारित केले जाते. NAAT (Nucleic Acid Amplification Test) ही सर्वात अचूक चाचणी आहे, परंतु सर्वत्र उपलब्ध नसते. इतर STI (जसे HIV, सिफिलिस) साठी तपासणी करणेही आवश्यक आहे.

उपचार (Treatment):
व्रणविकार एलजीव्हीसाठी मुख्य औषध म्हणजे Doxycycline, जे साधारणतः 21 दिवस दिले जाते. पर्याय म्हणून Erythromycin वापरले जाऊ शकते. बुबो असल्यास पू काढणे (pus drainage) आवश्यक असू शकते. रुग्ण व त्याच्या/तिच्या लैंगिक जोडीदाराचा उपचार करणे अत्यावश्यक आहे.

प्रतिबंध:
सुरक्षित लैंगिक संबंध (निरोध-कंडोम वापर), लवकर निदान व पूर्ण उपचार हे मुख्य प्रतिबंधक उपाय आहेत. आरोग्य कार्यकर्त्यांनी उच्च-जोखमीच्या गटांमध्ये जनजागृती करणे आणि STI क्लिनिकमध्ये योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पॅपीलोमा 

पॅपिलोमा (Papilloma) म्हणजे मानवी पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे होणारा एक सामान्य लैंगिक संसर्गजन्य आजार (STI) आहे. या आजारामुळे त्वचेवर किंवा जननेंद्रियांवर लहान गाठी/मांसल वाढी (warts) तयार होतात. काही प्रकारचे HPV कर्करोगाशी (विशेषतः गर्भाशय मुखाचा कर्करोग) संबंधित असतात. आरोग्य सेवकानी याबाबत योग्य माहिती देणे आवश्यक

रोगनिर्मिती (Pathology):
HPV हा विषाणू त्वचा व श्लेष्मल त्वचेच्या पेशींमध्ये प्रवेश करून त्यांची अनियंत्रित वाढ घडवतो. त्यामुळे त्वचेवर पॅपिलोमा किंवा वॉर्ट्स तयार होतात. काही उच्च-जोखमीचे प्रकार (high-risk types) दीर्घकाळ राहिल्यास पेशींमध्ये बदल होऊन कर्करोगाची शक्यता वाढते.

लक्षणे (Symptoms):
जननेंद्रियांवर मऊ, फुलकोबीसारख्या दिसणाऱ्या लहान गाठी (genital warts) दिसतात. या गाठी एकट्या किंवा समूहाने असू शकतात. कधी कधी खाज, जळजळ किंवा सौम्य वेदना जाणवते. अनेक वेळा संसर्ग लक्षणांशिवायही असू शकतो. स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखात (cervix) बदल होऊ शकतात, जे बाहेरून दिसत नाहीत.

निदान (Diagnostics):
रोगनिदान मुख्यतः पाहून तपासणीवर आधारित असते. स्त्रियांमध्ये पॅप स्मिअर (Pap smear) तपासणी करून गर्भाशय मुखातील बदल ओळखता येतात. स्क्रीनिंग साठी VIA ही टेस्ट केली जाते, आणि पुढे आवश्यक असल्या HPV DNA टेस्ट ही अधिक अचूक पद्धत आहे. संशयास्पद वाढ असल्यास बायोप्सी करतात. 

उपचार (Treatment):
HPV पूर्णपणे नष्ट करणारे औषध नाही, पण वॉर्ट्स काढण्यासाठी उपचार केले जातात. यामध्ये स्थानिक औषधे जसे Imiquimod किंवा Podophyllin वापरली जातात. तसेच क्रायोथेरपी (अति-थंड करून काढणे), इलेक्ट्रोकॉटरी किंवा शस्त्रक्रिया करून गाठी काढल्या जातात. पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते.

प्रतिबंध:
HPV लस (vaccination) हा सर्वात प्रभावी प्रतिबंधक उपाय आहे. सुरक्षित लैंगिक संबंध (कंडोम/निरोध वापर), नियमित तपासणी (विशेषतः पॅप स्मिअर) आणि जनजागृती आवश्यक आहे. आरोग्य कार्यकर्त्यांनी लसीकरणाबद्दल जागरूकता वाढवावी आणि स्त्रियांना नियमित तपासणीसाठी प्रोत्साहित करावे.