स्त्री-पुरुषसंप्रेरके ही स्टेरॉईड जातीची विशिष्ट उदाहरणे आहेत. स्टेरॉईडचे इतर अनेक प्रकार मूत्रपिंडावरच्या ऍड्रेनल ग्रंथीतून तयार होतात. सिनेमातली मारामारी पाहताना आपलेही रक्त उसळते, त्याचे कारण ऍड्रेनॅलिन नावाचे हार्मोन आहे. या संप्रेरकांच्या शरीरातील परिणामांची व कामांची यादी मोठी आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवणे, हृदयाची गती व दाब वाढवणे, शरीरात पाणी व मीठ यांचा साठा करणे, रोगप्रतिकारशक्ती कमी करणे, वावडयाची प्रक्रिया थांबवणे, इत्यादी.
या गुणधर्मामुळे या औषधांचा अतिशय गैरवापर होतो. या औषधांचे दुष्परिणामही असतात आणि ते अश्राप रुग्णांना काही अडाणी डॉक्टरांमुळे भोगावे लागतात. अनेक अप्रशिक्षित डॉक्टर्स सर्रास स्टेरॉईड संप्रेरके देतात. अडाणी डॉक्टरांकडून मिळालेल्या तीन-साडेतीन गोळयांच्या पुडीत स्टेरॉईडची गोळी न चुकता आढळते. या गोळीने बहुतेक रोगप्रक्रियांना तात्पुरता म्हणजे एक-दोन दिवस आराम पडतो, पण नंतर रोग उसळू शकतो. हे कसे होते हे आपण थोडक्यात पाहू या.
स्टेरॉईड औषधांमुळे दाह प्रक्रियेला आळा बसतो. दाहामुळे होणारी वेदना, नुकसान त्यामुळे कमी होते. पण दाह ही स्वतः रोगाला आळा घालणारी प्रक्रिया असल्याने ‘दाह’ कमी झाला, की रोग पसरण्याची शक्यता असते. स्टेरॉईड संप्रेरक हे परिणामकारक पण दुधारी हत्यार आहे. त्याचा वापर तज्ज्ञानेच केला पाहिजे.
वैद्यकीय सल्ल्याशिवाय किंवा जास्त प्रमाणात स्टेरॉइड्स (विशेषतः ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स किंवा कॉर्टिकोस्टेरॉइड्स) वापरल्यास शरीरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम औषधाचा प्रकार, मात्रा आणि वापराचा कालावधी यावर अवलंबून असतात.
पुरुषांमध्ये
स्त्रियांमध्ये
मुलांमध्ये व किशोरवयीन मुलांमध्ये
मानसिक व वर्तनात्मक परिणाम
गंभीर दीर्घकालीन दुष्परिणाम
दीर्घकाळ स्टेरॉइड्स घेतल्यानंतर औषध अचानक बंद केल्यास ॲड्रिनल अपुरेपणा (Adrenal Insufficiency) निर्माण होऊ शकतो. यामध्ये:
प्रतिबंध
स्टेरॉइड्स योग्य वैद्यकीय कारणासाठी आणि योग्य देखरेखीखाली वापरल्यास अत्यंत उपयुक्त औषधे आहेत; परंतु त्यांचा अतिरेकी किंवा चुकीचा वापर गंभीर आणि कधीकधी कायमस्वरूपी दुष्परिणाम निर्माण करू शकतो. स्टेरॉइड औषधे अत्यावश्यक औषध यादीचा भाग आहेत.(essential drug list)