
स्त्रियांच्या बाबतीत ओटीपोट म्हणजे गर्भाशय, गर्भनलिका, स्त्रीबीजांडे व आजूबाजूचा भाग (स्नायू, इत्यादी). ओटीपोटात सूज हा तसा दुर्लक्षित आजार आहे.
या आजारांमध्ये आकस्मिक म्हणजे नवे/नुकतेच झालेले जंतुदोष आणि जुनाट जंतुदोष असे दोन गट करता येतील. पहिल्या प्रकारात वेळीच नीट उपचार न झाल्याने दुसरा प्रकार उद्भवतो. या जंतुदोषाची पुढील कारणे आहेत.
या आजाराचे मुख्य दोन प्रकार पाडता येतील: तीव्र आकस्मिक किंवा नवा जंतुदोष (दाह) व दीर्घ म्हणजे जुनाट जंतुदोष (दाह):
हा प्रकार बहुधा बाळंतपण, गर्भपात, शस्त्रक्रिया, लिंगसांसर्गिक आजार या घटनांनंतर येतो. यात अचानक ताप, ओटीपोटात खूप वेदना, दुखरेपणा ही मुख्य लक्षणे असतात. हा प्रकार अगदी त्रासदायक आणि गंभीर असतो. यावरचे उपचार रुग्णालयातच करता येतील. अर्धवट उपचार झाल्यास जंतुदोष ओटीपोटात टिकून राहतो. यातून खाली दिलेला दुसरा प्रकार संभवतो.
ह्या आजाराची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात. ओटीपोटात मंद दुखते, दुखरेपणा, म्हणजे आतून तपासताना किंवा लैंगिक संबंधाच्या वेळी दुखते. याबरोबरच, पाळीच्या वेळी दुखणे, कंबरदुखी, अशक्तपणा, बारीक ताप, अंगावरून पाणी जाणे (कधी यास दुर्गंधी असते.), इत्यादी लक्षणे आढळतात. वर सांगितल्याप्रमाणे हा प्रकार बहुधा तीव्र जंतुदोषातून सुरु होतो. पण काही वेळा याची सुरुवात नकळत होते. क्षयरोग हेही याचे एक कारण आहे. हा संथपणे चालणारा आजार आहे.
आतून तपासताना किंवा लैंगिक संबंधात दुखरेपणा ही ओटीपोटात सूज असल्याची नक्की खूण आहे. ओटीपोटात सूज आहे ही शंका घेऊन वेळीच तज्ज्ञाकडे पाठवणे फार महत्त्वाचे आहे.
सतत दुखरेपणा असणे हा मुख्य त्रास असतो. यामुळे लैंगिक संबंध त्रासदायक होतो. त्याचबरोबर वंध्यत्व व अस्थानी गर्भ राहणे हे महत्त्वाचे दुष्परिणाम आहेत. गर्भनलिका सुजून बंद झाल्यामुळे वंध्यत्व येते. गर्भनलिका अंशतः बंद झाल्यास स्त्रीबीज गर्भनलिकेत अडकून पडते व अस्थानी गर्भ राहतो. हे दोन्ही दुष्परिणाम गंभीर आहेत.
जननेंद्रिय हर्पिस (Genital Herpes) हा एक सामान्य लैंगिक संसर्गजन्य आजार (STI) असून तो Herpes simplex virus (HSV-2 मुख्यतः, कधी HSV-1) या विषाणूमुळे होतो. हा आजार असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरतो आणि एकदा झाल्यावर विषाणू शरीरात सुप्त (latent) अवस्थेत राहतो व पुन्हा पुन्हा उद्रेक (recurrence) होऊ शकतो. आरोग्य कार्यकर्त्यांनी याची लक्षणे, निदान व उपचार यांची माहिती ठेवणे आवश्यक आहे.
HSV त्वचा किंवा श्लेष्मल त्वचेतील सूक्ष्म जखमांमधून शरीरात प्रवेश करतो. सुरुवातीला स्थानिक पेशींमध्ये वाढ होऊन पाण्याने भरलेल्या फोड (vesicles) तयार होतात. त्यानंतर विषाणू मज्जातंतूंमधील गाठींमध्ये (nerve ganglia) सुप्त अवस्थेत राहतो. प्रतिकारशक्ती कमी झाल्यास किंवा ताण, ताप इत्यादी कारणांनी पुन्हा सक्रिय होतो.

प्राथमिक संसर्गात जननेंद्रियांवर लहान, वेदनादायक पाण्याचे फोड दिसतात, जे नंतर फुटून व्रण (ulcers) तयार होतात. यासोबत जळजळ, खाज, लघवी करताना वेदना, ताप व अंगदुखी दिसू शकते. पुनरावृत्तीच्या वेळेस लक्षणे तुलनेने सौम्य असतात. काही रुग्णांमध्ये लक्षणे नसतानाही विषाणूचा प्रसार होऊ शकतो (asymptomatic shedding).
निदान मुख्यतः क्लिनिकल (लक्षणांवर) केले जाते. फोडातील द्रवातून PCR चाचणी करून HSV ओळखता येतो. काही वेळा रक्तातील अँटीबॉडी तपासणी उपयोगी ठरते. इतर STI (उदा. सिफिलिस, HIV) साठी तपासणी करणे आवश्यक आहे.
जननेंद्रिय हर्पिस हा आजार पूर्णपणे बरा करणारे औषध नाही, पण लक्षणे कमी करण्यासाठी प्रतिव्हायरल (विषाणू-विरोधी) औषधे दिली जातात. यासाठी असायक्लोव्हीर Acyclovir हे मुख्य औषध असून, Valacyclovir किंवा Famciclovir पर्याय म्हणून वापरले जातात. वारंवार उद्रेक होत असल्यास दीर्घकालीन औषधयोजना करावी लागते.
सुरक्षित लैंगिक संबंध (कंडोम/निरोध वापर), चालू जखमा-पुरळ असताना लैंगिक संबंध टाळणे आणि लवकर उपचार हे महत्त्वाचे उपाय आहेत. रुग्ण व त्याच्या/तिच्या जोडीदाराला योग्य समुपदेशन देणे आवश्यक आहे. आरोग्य कार्यकर्त्यांनी पुनरावृत्तीची शक्यता व संसर्गाचा धोका याबद्दल जनजागृती करावी.Top of FormBottom of Form
ओटीपोटात सूज असण्याचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम पाहून वेळीच रोगनिदान करणे महत्त्वाचे आहे. बाळंतरोग, दूषित गर्भपात व लिंगसांसर्गिक आजारांचा प्रतिबंध केल्यास ओटीपोटात सूज येण्याचे प्रमाण खूप कमी होईल. लक्षणगट उपचार पद्धत यासाठी फार उपयोगी आहे.