साधारण 12 ते 18 या वयात मुले मानसिक आणि शारीरिक दृष्टया नाजूक काळातून जात असतात. अठरा वर्षांनंतर त्यांना सज्ञान मानले जाते. या वयात त्यांच्यामध्ये लैंगिकदृष्टया बरेच बदल होत असतात. हीच मुले उद्याचे पालक आणि आपल्या देशाचे भावी नागरिक होणार. किशोरवयीन गर्भारपण आणि गर्भपात ही एक कठीण समस्या आहे.

वाढत्या वयात शरीराला जास्त अन्नाची गरज असते. योग्य पोषण मिळाले तर मुलामुलींची योग्य वाढ होऊन अपेक्षित उंची- वजन आणि स्नायूंची शक्ती प्राप्त होते. अनुकूलता मिळाली तर एका पिढीत हा फरक दिसून येतो. हल्ली पालकांपेक्षा त्यांची मुले जास्त उंच आणि वजनदार होतात. याचे कारण पूर्वीपेक्षा हल्ली जास्त पोषक अन्न मिळते.
स्त्रियांना समाजात असलेल्या दुय्यम स्थानामुळे मुलींना कुपोषणाचा धोका जास्त असतो. त्यांना कमी आणि हलके अन्न दिले जाते. त्याच्याकडून काम मात्र जास्त करून घेतले जाते. त्यात दर महिन्याला पाळीच्या रक्तस्रावामुळे त्यांना रक्तपांढरी होण्याची शक्यता असते. (तसेच मुलांनादेखील रक्तपांढरी होऊ शकते.) वजन, उंची आणि आरोग्याचे तेज ही चांगल्या आरोग्याची लक्षणे आहेत. या वयात सकस अन्न मिळणे, जरूर पडल्यास लोहाच्या पूरक गोळया देणे महत्त्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या लाडांमुळे या वयात ब-याचदा बाजारातील निकृष्ट जिन्नस खाण्याची सवय काही मुलांना लागते. पण लहान मुलांइतकेच या वयातही सकस अन्नाला महत्त्व आहे.
या वयातल्या मुलांचा रोजचा खेळ आणि व्यायाम असला पाहिजे. यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि आरोग्य सुधारते. मैदानी खेळ आणि मुख्य म्हणजे गटाने खेळण्याचे खेळ महत्त्वाचे आहेत. मुले खेळ लवकर शिकतात आणि त्यामध्ये प्रावीण्यही मिळवतात. योगासनांचादेखील पुढच्या आयुष्यावर चांगलाच परिणाम होतो. खेळ आणि व्यायामामुळे त्यांना पुढील आयुष्यातले ताणतणाव सहन करण्याची ताकद येते.

कुपोषण व रक्तपांढरी : कुपोषण आणि जास्त काम यांमुळे मुलींमध्ये रक्तपांढरी आढळते.
अपु-या माहितीमुळे एच.आय.व्ही. आणि एड्सची लागण होण्याचा धोका या गटाला अधिक आहे. किशोरवयीन मुलांनादेखील लिंग सांसर्गिक रोगांची लागण होऊ शकते.
लहान वयात लग्न झाल्यामुळे आई आणि मूल दोघांच्याही आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. आई अधिक अशक्त होते, रक्तपांढरीचा त्रास सुरु होतो आणि लहान वयात लैंगिक संबंध आल्यामुळे, लैंगिक आजार होण्याचा धोकाही वाढतो. बाळालाही रक्तपांढरी होते, ते कमी वजनाचे होते आणि बालमृत्यूचे प्रमाणही वाढते.
लहान वयातल्या लग्नामुळे मुलीला मानसिक आणि सामाजिक त्रासही सोसावा लागतो.
आपल्या लैंगिकतेचा शोध घेण्याची इच्छा या वयात जास्त असते. मात्र समाजात किशोरवयीन मुलांना लैंगिकतेबद्दल बोलणेदेखील अवघड होते. हे बदलले पाहिजे. कारण एका बाजूने लहान वयात लग्न करायचे दडपण मुलींवर आणले जाते. पण मुलींनी लैंगिकतेविषयी थोडी जरी उत्सुकता दाखविली तर मात्र ते अतिशय लाजिरवाणे आणि वाईट समजले जाते.
पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की स्वतःच्या लैंगिकतेचा शोध घेण्याचे काही मार्ग धोकादायक ठरू शकतात. उदाहरणार्थ, वेश्येबरोबर लैंगिक संबंध, तेही निरोध न वापरता ठेवणे धोकादायक असते. मुलींनी प्रौढ माणसाबरोबर लैंगिक संबंध ठेवले तर संसर्ग होण्याची आणि गरोदर राहण्याची जास्त भीती असते. ही भीती मुलांबरोबर संबंध ठेवले तरी काही प्रमाणात असतेच. असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होणारे आजार आपण पुढील घटकात पाहणार आहोत. निरोधचा योग्य वापर केल्यास हे आजार टाळता येतात.
आपल्या समाजात, गावांमध्ये अजूनही कमी वयात विवाहाची रीत आहे. मुलीचे संरक्षण करण्यासाठी आणि कुटुंबाचे नाव वाईट होऊ नये म्हणून पूर्वी समाजाने ही पध्दत मान्य केली होती. पण बालविवाह हे या समस्यांचे उत्तर नाही. या पध्दतीमुळे मुलींचे बालपण हिरावून घेतले जाते. त्यांच्यावर न झेपणा-या वैवाहिक जबाबदा-या पडतात, गरोदरपण, शारीरिक इजा व इतर घातक अनुभवांना सामोरे जावे लागते. तिची पुरेशी शारीरिक, मानसिक तयारी नसतानाच तिला बाई म्हणून कामाला लावतात.
शिक्षण, विकास, गर्भप्रतिबंधक साधने व सुरक्षित गर्भपात या सर्वांमुळे बालविवाह पूर्णपणे गैरलागू झाले आहेत. ही घातक सामाजिक कुप्रथा तत्काळ थांबवली पाहिजे.
मुलींवर (आणि कधीकधी मुलांवरही) लैंगिक अत्याचार होत असतात. अत्याचार करणारी व्यक्ती कधी कुटुंबातली असते तर कधी बाहेरची असते. चिडवण्यापासून ते बलात्कार व खून अशा लैंगिक अत्याचारांच्या अनेक पातळया आहेत. लैंगिक शोषण हा एक गुन्हा आहे आणि आपण याविरुध्द आवाज उठवला पाहिजे.
हा अत्याचार वैयक्तिक आणि सामाजिक मानसिकतेला हानीकारक असतो. त्यामुळे पुढच्या आयुष्यातील लैंगिक जीवनावर दुष्परिणाम होतो, चुकीचा दृष्टिकोन तयार होतो आणि समाजातदेखील हिंसकता वाढते.
कोणत्याही स्त्रीच्या मनाविरुध्द लैंगिक जबरदस्ती करणे गुन्हा आहे. अगदी ती लग्नाची बायको असली तरी हा मुद्दा लागू पडतो.
तसेच अठरा वर्षांखालील कोणत्याही स्त्रीशी, तिची संमती असली तरी, लैंगिक संबंध ठेवणे हा एक गुन्हा आहे. पण हा कायदा क्वचितच वापरला जातो.
मुलांशी योग्यवेळी बोलून त्यांना याची माहिती देणे, याच्या विरुध्द जागृती करणे आणि धीटपणे न्याय मागणे हे आपण त्यांना शिकवू शकतो. यात महिला गट आणि तरुणांच्या गटांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. यासंबंधी मुलामुलींना फोनवर मदत मागण्यासाठी प्रत्येक शहरात (Child helpline 1098) काही फोन नंबर्स उपलब्ध आहेत.
प्रस्तावना
बालकांचे लैंगिक शोषण ही भारतातील एक गंभीर सामाजिक समस्या आहे. यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारत सरकारने POCSO कायदा, 2012 लागू केला. या कायद्याचा उद्देश 18 वर्षांखालील मुलांना व कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणापासून कायदेशीर संरक्षण देणे हा आहे.
मुलाची जबाब न घेता (Statement) पोलीसांनी साध्या कपड्यांत घ्यावी.
मुलाला त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाते.
मुलाचे नाव, ओळख व माहिती गोपनीय ठेवली जाते.
प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन केली जातात.
मुलांवर होणारे मानसिक परिणाम कमी करण्यासाठी त्वरीत सुनावणी होते.
कुणीही नागरिक (पालक, शिक्षक, नातेवाईक, शेजारी किंवा कोणताही व्यक्ती) गुन्ह्याची माहिती पोलीसांना देऊ शकतो. तक्रार नोंदवणे ही प्रत्येकाची कायदेशीर जबाबदारी आहे.


या वयात जे काही बरे-वाईट अनुभव येतात त्यामुळे मुलांचे वय व व्यक्तिमत्त्व घडत असते. म्हणून या वेळेला कुटुंब, शाळा आणि समाज यांनी मुलांमधील चांगल्या गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. एखादी छोटीशी मदतदेखील बरेच काही साध्य करू शकते.
उदाहरणार्थ, एका मंडळाने एका गावात मुलींसाठी दोन सायकली दिल्या. त्यांनी आळीपाळीने या वापरायच्या होत्या. प्रत्येक गावातल्या मुली दोन महिने सायकल चालवायला शिकायच्या आणि मग त्या दुस-या गावात पाठवून द्यायच्या. या एवढयाशा मदतीने त्या गावातल्या पुष्कळ मुली सायकल चालवायला तर शिकल्याच पण त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वासही वाढला. त्या एकेकटया फिरायला शिकल्या. मग त्यांनी गट करुन पैसे जमवून एक सायकल घ्यायची ठरवली. काही मुलींनी जवळच्या गावी मोठया शाळेत पुढच्या शिक्षणाला जाण्याचे ठरवले. एवढया एका गोष्टीने त्यांच्या जीवनात किती फरक पडू शकतो हे बघायलाच पाहिजे. आताअनेक राज्यांमध्ये त्याच्या राज्य शासनाने मुलींना सायकलींचे वाटप केले आहे यांनी त्यांच्या सामाजिक आणि मानसिक परिस्थितीत चांगला फरक पडलेला आहे.
स्त्रीजननसंस्थेच्या अनेक आजारांमध्ये आयुर्वेद उपयुक्त ठरतो. विशेषतः योनिदाह, श्वेतप्रदर, गर्भाशयमुखाची सूज, गर्भाशय बाहेर पडणे (प्रारंभीची अवस्था) या आजारांमध्ये आयुर्वेदिक उपचाराने चांगला गुण येतो असा अनुभव आहे.

आयुर्वेदातल्या त्रिदोष विचारपध्दतीचा वापर करून आजार नीट समजावून घेतले तर उपचार अधिक अचूक ठरतात. म्हणून जिथे सहज शक्य आहे तिथे आपण कफ-वात-पित्त दोषांचाही विचार करू.
स्त्रियांच्या विशेष आजारांपैकी इथे आपण योनिदाह, गर्भाशयमुखाची सूज, गर्भाशय उतरणे, लघवीस जळजळ, पाळी जास्त जाणे, इत्यादी आजारांचा विचार करीत आहोत.
आजारांवर उपचार करताना योनिधावन, स्नेहपिचू (तेलबोळा) या स्थानिक उपचारांबरोबरच पोटातून काही औषध देणे उपकारक असते. शक्य असेल तेव्हा पोटातून औषधे देण्यास विसरू नये. पण केवळ स्थानिक उपचारांनीही बराच फायदा होतो. योनिधावन व स्नेहपिचू या उपचारपध्दतीची प्रथम माहिती करून घेऊ या.
योनिधावन म्हणजे योनिमार्ग धुणे. धुण्यासाठी औषधी काढे तयार करून घ्यावे लागतात. सोसवेल तितका गरम काढा गाळून घेऊन एनिमाच्या पध्दतीनुसार योनिद्वारातून योनिमार्गात सोडून धावन केले जाते. धावनाने स्वेदन होते, योनिमार्गाची स्वच्छता होते व शेकाने आराम वाटतो. योनिधावन आठवडयातून एक-दोन वेळा करावे व नंतर स्नेहपिचू (बोळा) बसवावा. योनिधावनासाठी लागणारे काढे निरनिराळया वृक्षांच्या आंतरसाली किंवा इतर काही वनस्पतींचा वापर करून बनवायचे असतात. निरनिराळया आजारांसाठी निरनिराळया वृक्ष-वनस्पती सुचविल्या आहेत.
स्नेह म्हणजे तेल, आणि पिचू म्हणजे बोळा. स्वच्छ कापसाचा किंवा स्वच्छ मऊ फडक्याचा बोळा घेऊन तो तेलात पूर्णपणे भिजल्यावर आत ठेवावा. बोळा आत ठेवताना हात स्वच्छ धुतलेले असावेत. कापूस व तेलही बंद बाटलीतील असावे. तिळाचे तेल उत्तम. बलातेल किंवा सहचरतेलासारखे औषधी तेल असल्यास उत्तम. पण हे नसल्यास शेंगदाणा, मोहरी, सोयाबीन, खोबरेल कोणतेही तेल चालेल. उघडया भांडयात ठेवलेले तेल वापरु नये. बोळा लघवीनंतर ठेवावा. साधारण दोन ते तीन तास म्हणजे पुन्हा लघवी होईपर्यंत ठेवावा. त्यानंतर काढून फेकून द्यावा.
ओटीपोटाच्या अनेक दुखण्यांसाठी गुदाशयात तैलबस्ती उपयोगी पडते. गर्भाशय बाहेर पडण्याची प्रवृत्ती, पाळी न येणे, पाळीच्या अनेक तक्रारी, गर्भाशय मागे झुकल्यामुळे होणारा त्रास, इ. अनेक दुखण्यांमध्ये बस्तीचा चांगला उपयोग होतो. यासाठी बला तेल किंवा सहचर तेल किंवा तीळ तेल 25-50 मि.लि. दिले जाते. बाळंतपणाआधी महिनाभर तैलबस्ती दिल्यास बाळंतपण सोपे होते असा अनुभव आहे.
योनिदाहाच्या लक्षणांप्रमाणे आयुर्वेदात प्रकार पाडलेले आहेत. वातज, पित्तज, कफज या प्रत्येक प्रकारासाठी वेगळे उपचार तक्त्यात दिले आहेत. योनिदाहाच्या तीव्रतेप्रमाणे योनिधावन व स्नेहपिचू रोज किंवा आठवडयातून एक-दोन वेळा करावे. पोटातून औषधे आठवडा किंवा पंधरा दिवसपर्यंत रोज घ्यावीत.
धावन (स्थानिक चिकित्सा)
ज्येष्ठमध+अनंतमूळ दोन्ही प्रत्येकी दोन ग्रॅम जाडसर पूड घेऊन काढा करावा. याऐवजी जांभूळ+ आंबा+उंबर यांच्या आंतरसालीचा एकत्र काढाही चालेल. या काढयाने धावन करावे. आठवडयातून एकदा याप्रमाणे दहा आठवडे उपचार करावेत. प्रत्येक धावनानंतर (तीळ तेल + एरंड तेल, असल्यास बला तेल, सहचर तेल) स्नेहन करावे. याबरोबर पोटातून ज्येष्ठमध, अनंतमूळ, मंजिष्ठा वंगमिश्रण यांची प्रत्येकी एक गुंज एकत्र केलेली पूड वापरावी. ही पूड दिवसातून तीन वेळा (प्रत्येक वेळी चार गुंजा) रोज याप्रमाणे महिनाभर द्यावी. हे मिश्रण दुधाबरोबर द्यावे.
बला तेलामध्ये मुख्यतः बला (म्हणजे चिकणामूळ) ही वनस्पती असते. बला तेल तयार करणे जरा जिकिरीचे काम आहे पण ते शिकता येईल. पण हे शक्य नसल्यास चिकणमूळाची एक काडी-(ओली किंवा वाळलेली) उकळून काढा पोटातून द्यावा किंवा ज्येष्ठमधाबरोबर धावनासाठी वापरावा.
स्नेहनासाठी तीळ तेल + एरंड तेल समभाग घेऊन बोळा ठेवावा. पोटातून औषध घेण्याबरोबर स्थानिक (म्हणजे योनिमार्गाची) चिकित्सा आवश्यक असते.
1. शतावरी + अनंतमूळ + गोखरू चूर्ण (प्रत्येकी अर्धा चमचा पावडर) किंवा
2. गुळवेल सत्त्व + प्रवाळभस्म दूधसाखरेबरोबर (अर्धा चमचा प्रत्येकी) किंवा
3. ज्येष्ठमध व अनंतमूळ पावडर दोन चमचे प्रत्येकी (दूधसाखरेबरोबर) किंवा
4. तीन कप उकळत्या पाण्यात ज्येष्ठमध, शतावरी, अनंतमूळ पावडर टाकून झाकून ठेवावी, पाच-सात मिनिटांनी वरील निवळ पाणी दिवसभर थोडेथोडे घ्यावे.
या आजाराच्या सुरुवातीची अवस्था (पहिली अवस्था किंवा तरुण वय असेल तर दुसरी अवस्थाही) उपचाराने बरी होऊ शकते. यापेक्षा जास्त आजार असेल तर शस्त्रक्रिया हाच उपाय असतो.
औषधी धावन, स्नेहन, आसने, व्यायाम व पोटातून औषधे असे एकत्रित करून अनेक स्त्रियांना आराम मिळतो असा अनुभव आहे.
धावनासाठी जांभूळसाल + उंबरसाल (आतली साल) वापरावी. गर्भाशय जास्त खाली उतरले असल्यास लोध्र व हळद प्रत्येकी तीन गुंज वस्त्रगाळ पावडर करावी. ही पूड स्वच्छ सुती फडक्यात बांधून तीळ-तेलात बुडवून योनिमार्गात बोळा ठेवावा. हा बोळा झोपताना ठेवावा व सकाळी काढून टाकण्यास सांगावा. याप्रमाणे 15 दिवस ते एक महिना रोज करावे.
या आजारावर दोन आसने उपयुक्त आहेत. एक (अवनतशिरस्कासन) म्हणजे कोपरे व गुढगे यावर टेकून कमरेचा भाग वर उचलून या स्थितीत दोन मिनिटे राहण्यास सांगावे. रोज सकाळी व सायंकाळी हे आसन नियमित आणि कायम केल्यास फायदा होतो. यानंतर वज्रासन करून गुदभाग आवळण्याचा व्यायाम सांगावा.
1. पोटातून अशोकाच्या आंतरसालीचा काढा व निकाढा सकाळ-सायंकाळ याप्रमाणे दोन महिने रोज द्यावा. किंवा
2. पोटातून जांभूळसालचूर्ण + लोध्रचूर्ण सकाळ-दुपार-संध्याकाळ द्यावे किंवा
3. आंबा, वड, जांभूळ, पिंपळ यांच्या आंतरसालीचे चूर्ण किंवा पानाचे चूर्ण करून द्यावे.
1. वाळा, चंदन, नागरमोथा यांचे पाणी उकळून द्यावे.
2. जिरे उकळून (चहाप्रमाणे) ते पाणी साखर घालून थोडे थोडे घ्यायला सांगावे.
3. दुर्वांचा रस, एक चमचा खडीसाखर किंवा तूप टाकून द्यावा.
4. गोखरूचे कुटलेले काटे 5 ग्रॅम + पुनर्नवा (पूर्ण वनस्पती) पाच ग्रॅम एकत्र 6 कप पाण्यात उकळून अर्धा कप पाणी उरवावे. हा काढा सकाळी उठल्यावर द्यावा चोथा टाकून न देता संध्याकाळी उकळावा (निकाढा) व रात्री झोपताना द्यावा. याप्रमाणे 15 दिवस रोज करावे.
5. तांदुळाचे धुवण साखर घालून द्यावे.
6. अनंतमूळ, आवळकाठी, उसाची किंवा भाताची मुळे यांचा काढा साखर घालून द्यावा.