गृहाधारित नवजात शिशु काळजी (HBNC – Home Based Newborn Care) हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवला जाणारा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश नवजात बाळांचे आरोग्य सुधारणा करणे आणि नवजात मृत्यूदर कमी करणे हा आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या ४२ दिवसांत आशा कार्यकर्ती नवजात बाळ आणि आईला घरी भेट देऊन आवश्यक आरोग्य सेवा देते.
या भेटीत बाळाचे वजन, शरीराचे तापमान, श्वासोच्छ्वास, स्तनपानाची स्थिती आणि संसर्गाची लक्षणे तपासली जातात. आईला बाळाला योग्य प्रकारे स्तनपान कसे द्यावे, बाळाला उबदार कसे ठेवावे, स्वच्छता कशी राखावी आणि लसीकरणाचे महत्त्व याबद्दल माहिती दिली जाते. तसेच नाळेची स्वच्छता, त्वचेची काळजी आणि बाळाच्या योग्य वाढीवर लक्ष ठेवले जाते.
HBNC अंतर्गत आशा कार्यकर्ती ठराविक दिवसांवर (उदा. जन्मानंतर ३, ७, १४, २१, २८ आणि ४२ वा दिवस) घरभेटी देते. या भेटींमध्ये बाळामध्ये ताप, श्वास घ्यायला त्रास, दूध न पिणे, आकडी येणे किंवा सुस्ती यांसारखी धोक्याची लक्षणे आढळल्यास बाळाला तात्काळ आरोग्य केंद्रात पाठवले जाते.
या कार्यक्रमामुळे आई-बाळाची योग्य काळजी घेतली जाते आणि नवजात बाळांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होते.
काही बाळे जन्मताच वजनाने किंवा दिवसाने कमी असतात अशा बाळांना कामगार संघटनाचा उपयोग होतो असे दिसून आले आहे. कांगारू संगोपनाबद्दल त्या रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि परिचारिका मदत करू शकतील. अशा बाळांना केवळ काचेच्या पेटीत ठेवण्यापेक्षा आई आणि बाळ दोघांसाठी असलेल्या संगोपन विभागात ठेवता येते. बाळ दोन ते अडीच किलोच्या मध्ये असेल तर या संगोपन तंत्राचा नक्की उपयोग होतो. आई मधून मधून बाळाला छातीवर स्तनांच्या मध्ये झोपवून घेते, त्यामुळे बाळाला आईच्या अंगाची उब मिळते आणि श्वसनाच्या हालचालीमुळे सुरक्षित वाटते. आई व बाळामध्ये स्नेहबंध वाढायला मदत होते. या संगोपनामध्ये आई बाळाला अंगावर पाजू पण शकते.
नवजात बाळाला सामान्यपणे 24 ते 72 तास या काळामध्ये सौम्य कावीळ दिसून येते .त्यात आजार असा नसतो. मात्र कावीळ 24 तासाच्या आधी दिसत असेल किंवा असलेली कावीळ तिन आठवड्यापर्यंत टिकत असेल, बाळाला पांढरट शी होत असेल तर वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. बाळाच्या रक्तातील बिले रुबीन द्रव्य १२ mg/dl पेक्षा जास्ती असेल तर काळजी घ्यावी लागते.तज्ञ डॉक्टरचा सल्ला जरुरी. बिलिरुबेन चे प्रमाण एका विशेष उपकरणाने तपासता येते.
अशा बाळांना अल्ट्राव्हायोलेट म्हणजे अतिनील किरणांचा उपचार(फोटोथेरपी) केला जातो. बाळाचे वजन कमी असेल किंवा दिवस कमी भरले असतील तर अशा काविळीचा धोका थोडा जास्तच असतो .अधिक तीव्र काविळीमध्ये NICUमधे रक्त बदलण्याचा उपचारही लागू शकतो

जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासात आईचे दूध मिळणे हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे बाळाचे पोषण तर होतेच पण त्याचबरोबर त्याची रोगप्रतिबंधक शक्तीही वाढते. मातेचे पोट लवकर कमी होते आणि तिच्या अंगावर जाणे लवकर कमी होते. जास्त वेळा अंगावर पाजल्याने आईच्या दुधाचे प्रमाण वाढते. अंगावर पिताना आईच्या कुशीची बाळाला उबही मिळते. लवकर स्तनपानाचा सल्ला प्रत्येक मातेला द्यायलाच हवा.
आईचे दूध हे तिच्या शरीरात गरोदरपणातच तयार होते. बाळंतीण झाल्यानंतर 2-3 दिवस ते चिकासारखे घट्ट असते. बाळाला हे पहिले चिकाचे दूध मिळणे अत्यंत गरजेचं आहे कारण यातूनच बाळाला पहिली रोगप्रतिबंधक शक्ती मिळते.
आईच्या दुधात आवश्यक ती सर्व सत्त्वे असतात. त्यात बाळाला आवश्यक तेवढे पाणीदेखील असते. जास्त वेळा पाजल्याने जास्त दूध निर्माण होते. जुलाब आणि न्यूमोनियासारख्या रोगांपासून यामुळे बाळाचे सहज संरक्षण होते. अंगावर पिणारी बाळे चोवीस तासात साधारण आठ वेळा दूध पितात. ज्यांना दूध पोटभर मिळतं ती बाळे सलग दोन तीन तास झोपतात. त्यांचे वजनही नियमितपणे वाढते. मुलींनादेखील अंगावर वेळोवेळी पाजले जात आहे याची खात्री करावी.
अंगावर पाजल्यामुळे बाईची मासिक पाळी लांबते. अप्रत्यक्ष रित्या स्तनपानाने पाळणा लांबवायला मदत होते. पण संतती नियमनाचा हा खात्रीचा मार्ग नाही. या घटकात आपण संतती नियोजनामध्ये स्तनपानाचे महत्त्व काय ते देखील शिकणार आहोत.
सहा महिन्यापर्यंत आईच्या अंगावरचे दूध बाळाला पुरते .त्यानंतर पूरक अन्न लागते . अंगावर पाजणे काही आयांना जमत नाही. त्याची विविध कारणे असू शकतात. बोंड चिराळलेले असणे किंवा आत ओढलेले असणे, स्तनांतील दूध तुंबणे, यापैकी काहीही समस्या असू शकते काही माता अंगावर पुरेसे दूध नाही असे सांगतात. याची खात्री करावी लागते बाळ जर पिऊन दोन-तीन तास झोपत असेल आणि दर चार ते सहा तासांनी लघवी होत असेल तर दूध पुरेसे आहे असा निष्कर्ष काढता येईल. आईला मनावर ताण असणे चिंता असणे किंवा काही आजार असणे ही पण कारणे असू शकतात. कारण दूर होत नसेल आणि दूध पुरतच नसेल किंवा येतच नसेल तर मानवी दुधाचा पर्यायी मार्ग शोधावा लागेल यासाठी उपलब्ध असल्यास जवळची कोणी स्तनदा माता मदतीला येऊ शकेल. काही शहरांमध्ये मानवी दुग्ध पेढी सुरू झाली आहे. याचा शोध घेऊन तिथे नाव नोंदणी करून तिथून दूध मिळवता येईल. तीन महिन्यानंतर नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या मातांना, घरी नसताना अर्थातच अंगावर पाजता येणार नाही त्यासाठी दूध काढून घेऊन निर्जंतुक बाटलीत ठेवून नंतर ते बाळाला पाजण्याची व्यवस्था करता येते. मात्र यात बरीच काळजी घ्यावी लागते बाटल्या बूच वगैरे पूर्ण स्वच्छ करावे लागते आणि निर्जंतुक करावे लागते. या सर्व बाटल्या फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात. तसेच दूध फ्रिज मधून काढून पाजताना थोडे कोमट करावे लागते. यासाठी योग्य तंत्र शिकावे लागते आणि घरात मदत पण लागते.
1. आईला स्तनपान देण्यास मदत करा. पहिलटकरणीला तर मदत लागतेच.
2. पाजण्याआधी प्रत्येक वेळी बोंडे कोमट पाण्याने स्वच्छ केली पाहिजेत.
3. बाळाला मांडीवर आडवं ठेवावं. जर आई कुशीवर झोपली असेल तर बाळाला तिच्या बाजूला कुशीत ठेवावे.
4. बोंडांचा मुळापासूनचा भाग धरून तो बाळाच्या तोंडात द्यावा. अशा त-हेने संपूर्ण बोंड बाळाच्या तोंडात जाईल.
5. बाळाचे तोंड आणि संपूर्ण शरीर आईच्या छातीकडे वळलेले असावे. बाळ वेडेवाकडे धरु नये याची काळजी घेतली पाहिजे.
सहा महिन्यापर्यंत आईच्या अंगावरचे दूध बाळाला पुरते .त्यानंतर पूरक अन्न लागते . अंगावर पाजणे काही आयांना जमत नाही. त्याची विविध कारणे असू शकतात. बोंड चिराळलेले असणे किंवा आत ओढलेले असणे, स्तनांतील दूध तुंबणे, यापैकी काहीही समस्या असू शकते काही माता अंगावर पुरेसे दूध नाही असे सांगतात. याची खात्री करावी लागते बाळ जर पिऊन दोन-तीन तास झोपत असेल आणि दर चार ते सहा तासांनी लघवी होत असेल तर दूध पुरेसे आहे असा निष्कर्ष काढता येईल. आईला मनावर ताण असणे चिंता असणे किंवा काही आजार असणे ही पण कारणे असू शकतात. कारण दूर होत नसेल आणि दूध पुरतच नसेल किंवा येतच नसेल तर मानवी दुधाचा पर्यायी मार्ग शोधावा लागेल.
यासाठी उपलब्ध असल्यास जवळची कोणी स्तनदा माता मदतीला येऊ शकेल. काही शहरांमध्ये मानवी दुग्ध पेढी सुरू झाली आहे. याचा शोध घेऊन तिथे नाव नोंदणी करून तिथून दूध मिळवता येईल. तीन महिन्यानंतर नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या मातांना, घरी नसताना अर्थातच अंगावर पाजता येणार नाही त्यासाठी दूध काढून घेऊन निर्जंतुक बाटलीत ठेवून नंतर ते बाळाला पाजण्याची व्यवस्था करता येते .मात्र यात बरीच काळजी घ्यावी लागते बाटल्या बूच वगैरे पूर्ण स्वच्छ करावे लागते आणि निर्जंतुक करावे लागते. या सर्व बाटल्या फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात. तसेच दूध फ्रिज मधून काढून पाजताना थोडे कोमट करावे लागते. यासाठी योग्य तंत्र शिकावे लागते आणि घरात मदत पण लागते.

ब्रेस्ट पंपचा उपयोग स्तनांमधून दूध काढून ते नंतरच्या वापरासाठी, साठवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे बाळाला अंगावरचे दुध पाजता येते आणि बाळापासून दूर असताना दुधाचा पुरवठा कायम राखता येतो. तसेच, स्तनांमधील सूज कमी करण्यासाठी, बंद झालेल्या दुग्धवाहिन्यांवर उपचार करण्यासाठी, दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि बाळाला स्तनपान करण्यास मदत व्हावी म्हणून चपटे किंवा आत गेलेले स्तनाग्र सरळ करण्यासाठीही ते उपयोगी आहेत.

मुंबईतील Lokmanya Tilak Municipal General Hospital येथे आशियातील पहिली ह्यूमन मिल्क बँक (Breast Milk Bank) १९८९ साली सुरू करण्यात आली. ही संकल्पना बालरोगतज्ज्ञ Armida Fernandez यांनी सुरू केली.
ह्यूमन मिल्क बँक ही अशी व्यवस्था आहे जिथे स्तनपान करणाऱ्या मातांकडून अधिक दूध संकलित करून ते तपासून, पाश्चराइज करून सुरक्षितपणे साठवले जाते आणि गरज असलेल्या नवजात बाळांना दिले जाते.
ही दूध बँक विशेषतः खालील बाळांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते:
मुंबईतील सायन रुग्णालयातील या बँकेमुळे हजारो नवजात बाळांचे प्राण वाचले आहेत. गेल्या काही वर्षांत हजारो मातांनी दूधदान केले असून हजारो नवजातांना त्याचा लाभ झाला आहे.
त्यामुळे ह्यूमन मिल्क बँक ही नवजात बालकांच्या जीव वाचविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक आरोग्य सेवा मानली जाते.