

जठर-आतडी या वरील दुपदरी आवरणात जंतुदोष होऊन दाह-सूज-पू होणे म्हणजेच उदरसूज किंवा पोटसूज. हा एक आकस्मिक आणि गंभीर आजार आहे. वेळीच उपचार न झाल्यास रुग्ण काही तासांत देखील दगावू शकतो. याची मुख्य कारणे याप्रमाणे-
पोटसुजेचे प्रमुख लक्षण म्हणजे सतत वाढत जाणारी पोटदुखी, पोटावर सर्वत्र दुखरेपणा, कडकपणा व रोगी अंथरुणाला खिळून राहणे. कोणत्याही तीव्र पोटदुखीवर कोणीही उपचार करताना ‘पोटसूज’ नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
काही जणांना गुदद्वारापाशी एक जखम होते. नेहमी कुंथावे लागल्यामुळे किंवा मळाला खडे झाल्यामुळे बहुधा ही जखम होते. दिसायला अगदी लहान असलेली ही जखम खूपच दुखणारी असते. शौचानंतर अर्धा एक तास दुखत व जळजळ करीत राहते. काही वेळ खाज सुटते. रक्ताचा थेंब/रेघ मळाच्या खड्याबरोबर बरोबर आढळतो. मोड (मूळव्याध) व ही गुदद्वार जखम ब-याच वेळा एकत्र आढळतात.
प्रथम कुंथण्याचे कारण म्हणजे बध्दकोष्ठ बरे करणे महत्त्वाचे. या जखमेवर मूळव्याधीमलम लावून तात्पुरता आराम मिळू शकतो. मूळव्याध व गुदद्वारव्रण दोन्हीमध्ये समान उपचार याप्रमाणे

मूळव्याध (मोड किंवा पाईल्स) म्हणजे गुदद्वाराच्या तोंडाशी असलेल्या नीलांना सूज येऊन रक्त साठून राहणे. ही सूज कमीजास्त असेल त्याप्रमाणे मोड अथवा कोंब येतात. मधूनमधून या मोडांना इजा होऊन वेदनेशिवायच रक्त बाहेर येते. या सूज येण्यामुळे तिथला भाग नाजूक होऊन शौचाच्या वेळेस आग होणे, दुखणे वगैरे तक्रारी निर्माण होतात. साधे मोड बोटाने आत ढकलता येतात, परंतु वाढलेले मोड आत जात नाहीत..
मूळव्याध हा बहुधा मध्यमवयानंतर येणारा आजार आहे. गरोदरपणातदेखील असे मोड येतात, पण बाळंतपणानंतर ते बरे होतात. पुढील काही कारणाने मूळव्याध संभवतो: बऱ्याच वेळ उभा राहण्याचा व्यवसाय/काम, काही प्रमाणात आनुवंशिकता, कोंडा/तंतु नसेलेले भोजन घेण्याची सवय, इतर काही आजार असेल तरी मूळव्याध होऊ शकतो: उदा गुदद्वारव्रण, आतडयाचा कर्करोग, ज्यांना कायम बध्दकोष्ठ असेल त्यांना कुंथण्यामुळे रक्तवाहिन्या दाबल्या जाऊन मूळव्याध होण्याची शक्यता असते.
मूळव्याधीचे मोड दिसत असल्यास इतर तपासणीची आवश्यकता नसते. पण काही वेळा हे मोड आतच राहतात. यासाठी गुदद्वाराची एका लहान नळीमधून तपासणी करावी लागते. (proctoscopy ) कधी कधी मोडाच्या मागे आत गुदद्वारव्रण किंवा कर्करोग गाठ असण्याची शक्यता असते. बाहेर फक्त रक्तस्राव दिसतो.
मुळव्याधीची गुंतागुंत होऊ शकते: रक्तस्त्रावामुळे रक्तपांढरी( anemia), गुदभाग बाहेर पडणे, त्यावर जखमा होणे उत्यादी.
आधी बध्दकोष्ठ असल्यास त्याचा उपचार सुरु करावा. मूळव्याध हा चिवट आजार आहे.
मूळव्याध दुखत असताना वेदनाशामक मलम लावल्यास तात्पुरता आराम मिळतो. गरम पाण्यात बसून शेक घेतल्याचाही फायदा होतो.
जखमा झालेले किंवा जन्तूदोष झालेले मोड असतील तर जन्तुविरोधी औषधे जरुरी असतात.त्यामुळे मूळव्याधीची तज्ज्ञांकडून तपासणी करून उपचाराबद्दल /शस्त्रक्रियेबद्दल सल्ला घ्यावा. दोरा किंवा रबरबँडने मोड बांधणे, मोड शस्त्रक्रियेने काढून टाकणे किंवा सुजलेल्या वाहिन्यांमध्ये इंजेक्शन देणे, इत्यादी उपाय केले जातात. स्टेपलर शस्त्रक्रिया ही सोपी आणि भूल न देता करता येते. यात आतल्या आवरणाचा सुजेलेला भाग सोप्या पद्धतीने काढून टाकता येतो.
आयुर्वेद
होमिओपथी निवड
नायट्रिक ऍसिड, आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, सीना, हेपार सल्फ, लॅकेसिस, लायकोपोडियम, मर्क्युरी कॉर, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, पोडोफायलम, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर, थूजा.