सरकारी रुग्णालयांत खर्च तुलनेने कमी किंवा विनाशुल्क असतो. खासगी रुग्णालयांत प्रतिदिन साधारण ₹10,000 ते ₹1,00,000 किंवा त्याहून अधिक खर्च होऊ शकतो. व्हेंटिलेटर, डायलिसिस, महागडी प्रतिजैविके आणि विशेष प्रक्रिया यांमुळे खर्च वाढतो.
इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर, संबंधित तज्ज्ञ, निवासी डॉक्टर, प्रशिक्षित ICU परिचारिका, श्वसनतज्ज्ञ (Respiratory Therapist), फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ज्ञ, फार्मासिस्ट
रुग्णालयातील संसर्ग, व्हेंटिलेटर-संबंधित न्यूमोनिया, रक्ताच्या गुठळ्या, झोपून होणाऱ्या जखमा-व्रण, स्नायूंची दुर्बलता, संभ्रम (delirium) आणि मानसिक ताण या गुंतागुंती होऊ शकतात.
जीवनरक्षक उपचार किती काळ चालू ठेवावेत, रुग्णाची पूर्वी व्यक्त केलेली इच्छा, मेंदूमृत्यू, अवयवदान, उपचार मर्यादित करणे, DNR (Do Not Resuscitate) निर्णय आणि आर्थिक भार यांसंबंधी अनेक नैतिक प्रश्न निर्माण होतात. यासाठी रुग्णालयात समुपदेशक असल्यास त्यांना किंवा उपचार करणाऱ्या डॉक्टरना मोकळेपणे प्रश्न विचारावेत.
सर्व सेवकानी दर वेळी हात धुणे, निर्जंतुकीकरण, मास्कचा वापर, मर्यादित भेटी, कॅथेटर व ट्यूब्सची योग्य निगा आणि प्रतिजैविकांचा विवेकी वापर यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी होते.
रुग्ण स्थिर झाल्यावर श्वसन व्यायाम, हालचाली, पोषण आणि मानसिक आधार यांद्वारे पुनर्वसन केले जाते. यामुळे ICU नंतरचे आयुष्य अधिक सक्षम होते.
मृत्यू ओळखणे हे आरोग्य कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे कौशल्य आहे. खालील लक्षणे आढळल्यास व्यक्तीचा मृत्यू झाल्याची शक्यता अत्यंत जास्त असते. अंतिम प्रमाणपत्र देणे हे डॉक्टरांचे काम असले तरी प्राथमिक ओळख आरोग्य कार्यकर्ते करू शकतात.
छातीची हालचाल दिसत नाही, नाकाजवळ हवा जाणवत नाही आणि अनेक मिनिटे श्वास घेतला जात नाही.
मानेमध्ये कॅरोटिड नाडी जाणवत नाही. छातीवर कान लावल्यास किंवा उपकरणाने तपासल्यास हृदयाचे ठोके ऐकू येत नाहीत.
बेशुद्धावस्था आणि प्रतिसाद नसणे
हाक मारून, हलक्या वेदनादायक उत्तेजनाने किंवा स्पर्शाने कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या व प्रकाशास प्रतिसाद नसणे
दोन्ही बाहुल्या विस्तृत होतात आणि टॉर्चचा प्रकाश टाकल्यावर आकुंचन होत नाही.
कॉर्नियल रिफ्लेक्स नसणे
बुबुळाला हलका स्पर्श केल्यास पापणी मिटत नाही.
त्वचा थंड व फिकट होणे
शरीराचे तापमान कमी होते आणि त्वचा थंड पडते.
विलंबाने मृतदेहावर होणारे विशिष्ट बदल
कुजण्याची चिन्हे
दुर्गंधी, त्वचेचा रंग बदलणे आणि ऊतींचे विघटन ही बऱ्याच उशिराने दिसणारी निश्चित चिन्हे आहेत. तापमान जेवढे जास्त तेव्हढी हे बदल वेगाने होतात.
महत्त्वाची सूचना
काही परिस्थितींमध्ये (उदा. अतिथंडी, औषधांचा प्रभाव, Coma) मृत्यूसारखी अवस्था दिसू शकते. त्यामुळे शंका असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मेंदूमृत्यू म्हणजे मेंदूचे, विशेषतः मूळमेंदूचे (Brain Stem) कार्य पूर्णपणे आणि कायमचे बंद पडणे. अशा अवस्थेत रुग्ण स्वतः श्वास घेऊ शकत नाही, शुद्धीवर येत नाही आणि कोणतेही मेंदूजन्य प्रतिक्षेप (reflexes) दिसत नाहीत. ही अवस्था अपरिवर्तनीय असते; म्हणजेच योग्य उपचार करूनही मेंदू पुन्हा कार्य करू शकत नाही. मेंदूमृत्यू हा वैद्यकीय आणि कायदेशीर दृष्ट्या मृत्यूच मानला जातो.
मेंदूमृत्यूची प्रमुख कारणे म्हणजे गंभीर डोक्याला मार लागणे, मेंदूत मोठा रक्तस्राव, मेंदूची सूज, ऑक्सिजनचा तीव्र अभाव, मेंदूज्वर किंवा काही विषबाधा. अशा रुग्णांमध्ये हृदय काही काळ कृत्रिम श्वसनयंत्राच्या (व्हेंटिलेटरच्या) मदतीने चालू राहू शकते. त्यामुळे बाहेरून रुग्ण जिवंत असल्याचा भास होतो; परंतु मेंदूचे सर्व कार्य कायमचे थांबलेले असते.
मेंदूमृत्यूचे निदान दोन प्रशिक्षित डॉक्टर निश्चित नियमांनुसार करतात. रुग्ण बेशुद्ध असतो, डोळ्यांच्या बाहुल्या प्रकाशाला प्रतिसाद देत नाहीत, खोकला किंवा गिळण्याचे प्रतिक्षेप/कार्य नसतात आणि व्हेंटिलेटर थोडावेळ बंद केल्यावरही स्वतः श्वास घेतला जात नाही.
मेंदूमृत्यू आणि कोमा यात फरक आहे. कोमामध्ये काही मेंदूचे कार्य शिल्लक असते आणि सुधारणा होण्याची शक्यता असते. मेंदूमृत्यूमध्ये मात्र पुनरुज्जीवन शक्य नसते.
मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीचे हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि इतर अवयव दान करून अनेक रुग्णांना नवीन जीवन देता येते. त्यामुळे मेंदूमृत्यूबद्दल योग्य माहिती असणे आणि अवयवदानाचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे
ORGAN TRANSPLANT:
मेंदूमृत (Brain Dead) रुग्णामधून अवयवदानासाठी मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे
मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान हे अनेक रुग्णांना नवीन जीवन देऊ शकते. भारतात अवयवदानाची प्रक्रिया कायदेशीर, नैतिक आणि वैद्यकीय नियमांनुसार केली जाते. मेंदूमृत रुग्णामधून अवयव काढण्यापूर्वी खालील मूलभूत बाबींचे पालन आवश्यक असते.
मेंदूमृत्यूची खात्री
कायदेशीर संमती
दाता रुग्णाचे व्यवस्थापन
अवयवांची कार्यक्षमता टिकवण्यासाठी रुग्णाचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
आवश्यक तपासण्या
अवयव काढण्याची प्रक्रिया
नैतिक तत्त्वे
लक्षात ठेवण्यासारखे
मेंदूमृत्यू ही कायदेशीर मृत्यूची अवस्था मानली जाते. योग्य प्रमाणन, कुटुंबाची संमती, दात्याचे स्थिरीकरण आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन ही यशस्वी व सुरक्षित अवयवदानाची मुख्य तत्त्वे आहेत. योग्य वेळी केलेले अवयवदान अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकते.
एआरडीएस (Acute Respiratory Distress Syndrome) म्हणजे फुफ्फुसांचा अचानक आणि गंभीर दाह होऊन त्यामध्ये पाणी व सूज साचण्याची अवस्था. त्यामुळे फुफ्फुसातील सूक्ष्म वायुकोष व्यवस्थित काम करू शकत नाहीत आणि रक्ताला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. ही अतिदक्षता विभागात (ICU) उपचार करण्याची अत्यंत गंभीर स्थिती आहे.
कारणे: एआरडीएसची प्रमुख कारणे म्हणजे गंभीर न्यूमोनिया, सेप्सिस (रक्तात सर्वत्र पसरलेला जीवाणू-घात), मोठे अपघात, भाजणे, स्वादुपिंडाचा तीव्र दाह (acute pancreatitis), विषबाधा, रक्त चढविल्यानंतरची प्रतिक्रिया आणि COVID-19.
लक्षणे: रुग्णाला तीव्र श्वास लागणे, जलद श्वसन, ओठ निळे पडणे, बेचैनी आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होणे अशी दिसतात.
निदानासाठी छातीचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅन, रक्तातील ऑक्सिजनचे मोजमाप आणि इतर तपासण्या केल्या जातात. उपचारांमध्ये ऑक्सिजन, बाहेरून किंवा आतून श्वसन सहाय्य, Mechanical Ventilator, मूळ कारणावर उपचार, द्रव संतुलन आणि अतिदक्षता निरीक्षण यांचा समावेश होतो.
एआरडीएस ही जीवघेणी अवस्था असली तरी वेळेवर योग्य उपचार मिळाल्यास अनेक रुग्ण बरे होऊ शकतात.
महत्वाची कारणे:
अतिसार व उलट्या
जास्त घाम येणे
निर्जलीकरण (Dehydration)-उष्माघात
मूत्रपिंडाचे आजार
मधुमेह (विशेषतः DKA)-किटोअसिडोसीस
अंतःस्रावी विकार (थायरॉईड, अॅड्रिनल, पॅराथायरॉईड)
लघवी वाढवणारी औषधे (Diuretics)
जुलाबाची औषधे (Laxatives)
स्टेरॉइड्स व इतर काही औषधे
कुपोषण किंवा अपुरा आहार
मद्यपानाचे व्यसन
हृदय, यकृत किंवा मूत्रपिंड निकामी होणे
गंभीर संसर्ग (Sepsis)
मोठ्या प्रमाणावर भाजणे (Burns)
मोठी शस्त्रक्रिया किंवा आघात (Trauma)
अयोग्य IV सलाईन किंवा द्रवोपचार
लक्षात ठेवण्यासाठी सूत्र
शरीरातील सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फेट यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण कमी (Hypo-) किंवा जास्त (Hyper-) झाल्यास अनेक गंभीर लक्षणे दिसू शकतात. अतिदक्षता विभागात ही स्थिती वारंवार आढळते.
याचे निदान रक्तातील ही द्रव्ये तपासूनच होऊ शकते. तातडीक उपचारात या तपासण्या मधून मधून केल्या जातात. अनेक आधुनिक Arterial Blood Gas (ABG) analyzers मध्ये रक्तातील काही महत्त्वाची electrolytes (क्षार) तपासण्याची सुविधा असते.
सोडियम (Sodium)
ायपोनेट्रेमिया (सोडियम कमी)
हायपरनेट्रेमिया (सोडियम जास्त)
पोटॅशियम (Potassium)
हायपोकॅलेमिया (पोटॅशियम कमी)
हायपरकॅलेमिया (पोटॅशियम जास्त)
कॅल्शियम (Calcium)
हायपोकॅल्सेमिया (कॅल्शियम कमी)
हायपरकॅल्सेमिया (कॅल्शियम जास्त)
मॅग्नेशियम (Magnesium)
हायपोमॅग्नेशेमिया
हायपरमॅग्नेशेमिया
फॉस्फेट (Phosphate)
हायपोफॉस्फेटेमिया
हायपरफॉस्फेटेमिया
लक्षात ठेवण्यासारखे
इलेक्ट्रोलाइट असंतुलनाची सामान्य लक्षणे म्हणजे अशक्तपणा, स्नायू आकडी, गोंधळ, फिट्स आणि हृदयाची अनियमित गती. अशी लक्षणे दिसल्यास तातडीने रक्त तपासणी करून योग्य उपचार करणे आवश्यक असते.