अ‍ॅक्युप्रेशर-मर्मचिकित्सा

अक्युपंक्चर (मर्मावर सुया टोचणे) किंवा अक्युप्रेशर (मर्मबिंदूवर दाबणे) ह्या चिनी उपचार पद्धती आहे. पण भारतीय वैद्यकशास्त्रात मर्मचिकित्सा पद्धत होती. त्यातून हे शास्त्र निघाले असावे. आशियाई उपचार पद्धतीत अक्यु पद्धत ही एक महत्त्वाची उपचार पद्धत आहे. ती शिकायला सोपी, करायला कमी खर्चिक (बिन-औषधी), आरामदायक आणि रुग्ण-वैद्य नाते घट्ट करणारी एक चांगली पद्धत आहे. निवडक असे ५० मर्मबिंदू आपण शिकूया.

मर्मबिंदूबिंदूवर्णनउपयोग
डिंगचुआनमानेच्या खालचा भाग पाठीमागे ७ व्या मानमणक्याच्या अर्धा इंच बाजूला दोन्हीकडेदमा खोकला मान आखडणे खांद्यात वेदना पाठदुखी
पित्ताशय १४ जीबीकपाळावर भुवईच्या १ इंच वर मधोमधडोकेदुखी पुढचा भाग डोळ्याला अंधुक दिसणे
जीबी २०मानेचा वरचा भाग मान आणि डोके यांची जुळणी असते तिथे दोन्ही बाजूला खळग्यातडोकेदुखी मान आखडणे गरगरणे डोळा दुखणे खांदे दुखी
जीबी २१जीबी २० कडून खांद्यांच्या उंचवट्याकडे उतरताना मधोमध स्नायूरेषेवरखांदेदुखी मान दुखणे मान आखडणे
जीबी ३०खुब्याच्या हाडाखाली पँटच्या बाजूच्या खिशात हात घालतो ती जागाकंबरदुखी खुबा दुखणे
जीबी ३४गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूस खालच्या टेंगळाच्या १‘ खालीपाय बधिरणे पायाची शक्ती कमी होणे गुडघा सुजणे तोंड कडू होणे उलटी स्नायूंसाठी
जीव्ही २६नाकाच्या खाली मिशीच्या मध्यभागीबेशुद्धी व लहान मुले बाळे यांना झटके येणे
जीव्ही १४मानेच्या तळाशी मध्यरेषेवर मानेचा सर्वात मोठा मणका त्याच्या खालीथंडीताप सर्दी दमा खोकला मान आखडणे
जीव्ही २०डोक्याच्या वरच्या मध्यबिंदूवर कर्णरेषेच्या मधोमधडोकेदुखी कानात गुणगुण डोळ्यांना अंधुक दिसणे मानसिक शांतता
हृदय ९करंगळीच्या आतल्या बाजूस नखाच्या तळरेषेतछातीत धडधड छातीत दुखणे
हृदयरेषामनगटावर आतल्या बाजूसछातीत धडधड अधीरता छातीत दुखणे निद्रानाश बेशुद्धी फिट मिरगी हाताचे टळवे गरम होणे
मूत्रपिंड १पायाच्या तळव्यावर लहान बोटाच्या व अंगठ्याच्या फुगाराच्या मधेघसासूज लघवीस वेदना बेशुद्धी अवघड बाळंतपण
मूत्रपिंड २७गळपट्टीच्या हाडाखाली छातीच्या मध्यरेषेच्या २ इंच बाजूलादमा खोकला
मूत्रपिंड ३टाचेच्या आतल्या बाजूला मागल्या स्नायूबंधाच्या १५ इंच पुढेघसासूज अनियमित पळी खालची पाठदुखी दमा
मोठे आतडे ११हाताच्या कोपराच्या बाहेरची बाजू जेथे घडी रेषा संपते तिथेहाताच्या कोपराचे दुखणे कोठेही खाज अतिरक्तदाब पोटदुखी ताप
मोठे आतडे २०नाकपुडीच्या बाजूला अर्धा इंचनाक चोंदणे नाकातून पाणी घोळणा फुटणे
मोठे आतडे ४मळहातावर अंगठा व तर्जनी एकमेकांजवळ आणल्यावर जो फुगवटा तयार होतो त्याच्या उंचवट्यावरगर्भाशयातून रक्तस्त्राव हर्निया अंतर्गळ फिट मिरगी डोकेदुखी निद्रानाश
यकृत ८गुडघा वाकवा खुर्चीवर बसल्यावर वाकतो तसा आतल्या बाजूला त्वचेची घडी संपते तो बिंदूलघवीस वेदना ओटीपोट दुखणे गुडघ्यात वेदना मांडीच्या आतल्या बाजूस दुखणे
फुप्फुस १गळपट्टीच्या मध्यबिंदूच्या १ इंच खालीखोकला दमा घसासूज हात किंवा हाताचा कोपरा दुखणे
फुप्फुस ६मनगट व हाताचा कोपरा यांच्या गोर्‍या बाजूला मधोमध किंचित बाहेरच्या बाजूलाखोकला दमा घसासूज हात किंवा हाताचा कोपरा दुखणे
फुप्फुस ७मनगटाच्या सुमारे दीड इंच वर वरील रेषेवरचदमा खोकला मान आखडणे घसासूज मनगट अधू होणे
हृदयआवरण ६मनगटाच्या चेषेच्या वर मध्यरेषेवर गोर्‍या बाजूवर २ इंच वरछातीत धडधड उलटी मलेरिया ताप फिट मिरगी हाताच्या कोपरा दुखणे
लहान आतडे ३मूठ आवळल्यानंतर करंगळीच्या बाजूच्या पहिल्या हस्तरेषेची घडी संपते तो बिंदूडोकेदुखी मान आखडणे कंबरदुखी