/tantrika tantra icon चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था) मानसिक आरोग्य आणि आजार
पार्किन्सनचा आजार- कंपवात (लकवा)

Paralysis हा वृध्दापकाळाचा आजार आहे. 60 वर्ष वयापुढच्या 7%व्यक्तींना हा आजार होतो. हा आजार लकवा म्हणूनही ओळखला जातो. वृध्दापकाळात येणारा हा आजार लगेच ओळखू येतो. हाताच्या मनगटाची आणि बोटांची न थांबणारी हालचाल (जपमाळ ओढल्यासारखी) ही याची खूण आहे. हाताने काही करायला गेले की तात्पुरती ही हालचाल थांबते, पण काम संपले की लगेचच हालचाल चालू होते. हाताबरोबरच मान, डोके यांचीही हालचाल असू शकते. थरकाप/कंप नसतो तेव्हा स्नायूंना ताठरपणा असतो.

या आजारात चेहरा भावहीन मुखवटयासारखा असतो. एकूण हालचाल मंद असते. कपडे घालणे, खाणे, चालणे व इतर दैनंदिन व्यवहार खूपच सावकाश होतात. हस्ताक्षर लहान लहान होत जाते आणि ओळखू येईनासे होते. हातांच्या हालचाली परत परत त्याच त्याच क्रमाने होत राहतात. आवाज घोगरा, एकसुरी, अडखळत होतो. मात्र बोलणे नेहमीपेक्षा वेगाने चालते. घाम थोडा जास्तच येतो. चेहरा जास्त तेलकट-मेणचट दिसतो. मान-चेहरा पुढे जास्त सुकलेले असतात आणि पाठीला कुबड असल्याप्रमाणे दिसते. हातांचे कोपरे आणि मनगट नेहमी वाकलेले दिसतात. बसल्या जागी उठताना जड जाते, यात बराच प्रयत्न करावा लागतो. चाल थोडी मंद आणि दुडकी असते आणि थोडी लंगडताना दिसते. पाय जमिनीवरून लवकर उचलत नाहीत.

उपचार

Medical Body Scanner या आजारासाठी औषधोचाराबरोबरच हलके व्यायामोपचार करावे लागतात. औषधांचे दुष्परिणामही होतात. रुग्णाला मानसिक/कौटुंबिक आधाराची गरज असते. या आजारावर चांगली औषधे उपलब्ध आहेत. गोळया आयुष्यभर घ्याव्या लागतात.

औषधोपचाराचा उपयोग नाही झाला तर मेंदूवर शस्त्रक्रियेचा विचार केला जातो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.