Cancer Icon कर्करोग
कर्करोगाची लक्षणे

Cancer Symptoms कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाले तर उपचार जास्त यशस्वी होतात. यासाठी कर्करोगाची शक्यता मनात बाळगून रुग्णांच्या तक्रारीकडे लक्ष दिले तरच कर्करोगाचे निदान लवकर होऊ शकते. यासाठी खालील घटना कर्करोग सूचक मानून पुढे तपासणीसाठी पाठवले पाहिजे.

  • वजन एकदम कमी होणे (विशेषतः उतारवयात)
  • अचानक रक्तपांढरी होणे.
  • भूक मरणे.
  • शरीरात कोठेही अचानक गाठ किंवा बरा न होणारा व्रण तयार होणे.
  • उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर अचानक जास्त रक्तस्राव (गर्भाशयाचा कर्करोग).
  • स्तनांमध्ये गाठ, व्रण होणे (स्तनांचा कर्करोग)
  • आवाज बदलणे, बसणे (स्वरयंत्राचा कर्करोग)
  • खोकल्यातून/बेडक्यातून रक्त पडणे (फुप्फुसाचा किंवा श्वासनलिकेचा कर्करोग)
  • अन्न गिळताना आत अडकल्यासारखे वाटत राहणे (अन्ननलिकेचा कर्करोग)
  • अन्न खाल्ल्यावर बराच काळ पोट जड वाटणे, करपट ढेकरा निघणे, न पचलेले अन्न उलटणे, इ. (जठराचा कर्करोग)
  • तोंडात कोठेही बरा न होणारा, न दुखणारा चट्टा, व्रण अथवा गाठ तयार होणे (तोंडाचा कर्करोग)
  • लघवीतून किंवा शौचातून कारणाशिवाय अचानक रक्तस्राव (मूत्राशय, किंवा गुदाशय यांचा कर्करोग)
  • शौचविसर्जनाच्या सवयी अचानक बदलणे, बध्दकोष्ठतेची तक्रार (मोठया आतडयाचा कर्करोग)
  • कोठूनही (नाक, हिरडया, लघवी, शौच, गर्भाशय) अचानक कारणाशिवाय रक्तस्राव (रक्तपेशींचा कर्करोग)
  • काखेत, जांघेत, गळयात, दगडासारख्या कडक गाठींचे अवधाण येणे (अर्थात या अवस्थेत रोग निदानाला उशीर झालेला असतो)

कर्करोगाची जागा, लक्षणे व चिन्हे (तक्ता (Table) पहा)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.