मध्यकर्णाच्या आजाराने (सूज-पू- दाहाने) कधीकधी अंतर्कर्णात आजार शिरून ध्वनिशंखाला जंतुदोष होतो व सूज येते.
अंतर्कर्णाला सूज असेल तर चक्कर आणि मधूनमधून उलटया ही मुख्य लक्षणे दिसतात. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब कानाघ ( E N T ) तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.
अंतर्कर्णाच्या अनेक प्रकारच्या आजारांत चक्कर येणे, उलटया होणे, कानात सूक्ष्म गुणगुण होत राहणे, इत्यादी त्रास होतो. अशा आजारात बहिरेपणा असेलच असे नाही. ही लक्षणे दिसली तर रुग्णास तज्ज्ञाकडे पाठवून द्या.
बाह्यकर्णात ओल निर्माण झाल्यास कधीकधी त्यावरच बुरशीची बाधा होते. अशा वेळी कान दुखतो व घाण वासही येतो. तपासल्यानंतर कानामध्ये कागदाच्या लगद्यासारखा करडया रंगाचा थर आढळतो. ही बुरशी असते. फ्लुकोनाझोल थेंबाचे औषधकिंवा जेंशनचे औषध कानात बुरशीवर सोडावे. याने बुरशी आठ दिवसांत नष्ट होते. याबरोबर मूळ आजारावरही उपचार करणे आवश्यक आहे.

आपल्या त्वचेत तेलकट द्रव पाझरणा-या ग्रंथी असतात. त्यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते. अशाच ग्रंथी कानातही असतात. त्यातून पाझरणा-या स्निग्ध पदार्थाचाच मळ तयार होतो. (या स्निग्ध पदार्थामुळे) कानात गेलेली धूळ, कचरा, त्वचेतून जाणा-या पेशी, इत्यादी पदार्थ चिकटून एकत्र राहतात. त्यामुळे कान एकंदरीत स्वच्छ राहतो. काही जणांमध्ये मळ तयार होण्याचे प्रमाण जास्त असू शकते.
ब-याच व्यक्ती स्वत: अधूनमधून कानातला मळ काढून टाकतात. यासाठी पुढे गोल वाटीसारखा आकार असलेले ‘कान कोरणे’ वापरले जाते.. काण कोरणे,काडी किंवा पिन वापरणे मात्र धोक्याचे आहे. सुरक्षा पिनची ना उघडणारी बाजू वापरता येते. यात थोडी चूक किंवा अतिरेक झाल्यास पडदा फूटू शकतो.. कोरताना कान कोरणे किंवा काडी कानाच्या पडद्याला स्पर्श करताच कानात विशिष्ट संवेदना होते. परंतु कानातला मळ स्वत: काढून टाकताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना असे करू देणे निश्चितपणे धोक्याचे आहे.
आपल्या जबडयाच्या हालचालीमुळे कानातील मळ आपोआप बाहेर ढकलला जातो. पण काही जणांच्या बाबतीत मळ कानातच अडकून राहतो. अशा व्यक्तींना कानात मळ कडक होऊन कान दुखणे, मळामुळे कान भरून ऐकू न येणे, इत्यादी त्रास होतो. ऐकू न येणे – (विशेषत:लहान वयात) या तक्रारीमागे ब-याच वेळा कानातला मळ हे एक कारण असते. मळाचा रंग दाट तपकिरी किंवा काळा असतो. कानात प्रकाशझोत पाडून तो सहज ओळखता येतो.
मळ काढण्याचा एक सोपा उपाय करण्यासारखा आहे. आधी 7 दिवस कानात ग्लिसरीन किंवा लसूण घालून गरम केलेले खोबरेल तेल किंवा मळ मऊ करणारे कानाचे औषध 3 थेंब 3 वेळ टाकावे. मळ लगेच मऊ होतो व सुटतो. सुटलेला आणि मऊ झालेला मळ सहज निघेल तेवढा काळजीपूर्वक काढून टाकावा.
मळ आत कानाला किंवा पडद्याला घट्ट चिकटला असल्यास जोर लावू नये. त्यामुळे कानाला इजाच होईल. असा ‘खडा’ झालेला मळ कानाच्या डॉक्टरने काढलेला बरा.
खडा होऊ नये म्हणून झोपताना कानात तेल टाकण्याची घरगुती पध्दत अधूनमधून उपयुक्त आहे. लसूण घालून गरम केलेल्या खोबरेल तेलाचे एक-दोन थेंब कानात टाकण्याची पध्दतही चांगली आहे. पण रोज तेल टाकण्याची पध्दत अयोग्य आहे
कधीकधी झोपेत किंवा इतर वेळी कानात किडा जाण्याची शक्यता असते. आतल्या मळामुळे, अरुंद जागेमुळे आणि बाहेरून बोटाने प्रयत्न केल्यामुळे बहुधा किडा मरून जातो. पण किडा जिवंत असेल तर फडफडत राहतो. कधीकधी तो निसटून निघून जातो. किडा गेल्या ची शंका असल्यासतेलाचे 10 थेंब टाकून निष्क्रिय करावा. नंतर हा किडा काढता येतो कानाच्या डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे.
लहान मुले कानात बी, खडा, पेन्सिल, इत्यादी घालतात. टोकदार किंवा खरखरीत पदार्थ घातला असेल तर कानातील पडद्याला इजा होण्याचा संभव असतो. लहान मुले नीट माहिती सांगू शकत नाहीत. काही वेळा मूल घाबरल्यामुळे नीट माहिती कळत नाही. असे असले तरी आत गेलेला पदार्थ बी आहे की इतर पदार्थ हे ठरवणे आवश्यक आहे.
कानात पाणी घालू नये
मूल शांत रहात नसल्यास पदार्थ काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. नाही तर नाहक इजा होईल.
कानात गेलेल्या अशा वस्तू काढण्यासाठी दोन-तीन प्रकारची खास उपकरणे असतात. या उपकरणांना पदार्थाच्या मागे ओढण्याइतका बाक किंवा वाकडेपणा असतो.
अशी उपकरणे नसतील तर साध्या सेफ्टी पिनचा टोक नसलेला वाटोळा भाग वाकवून घ्या. टोकदार भाग हातात धरून याचा वापर करून आत गेलेल्या पदार्थाच्या मागे नेऊन हळूहळू बाहेर ओढा. याने बहुधा तो पदार्थ बाहेर येतो. मात्र इजा न करण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. लहान मुलाला ३ जनांनी घट्ट धरून ठेवल्यावरच हा प्रयोग करावा, नाहीतर जखम होण्याची शक्यता जास्त.शक्यतो अशा कामासाठी तज्ज्ञाकडे पाठवणे बरे. पदार्थ निघाल्यानंतर कान तपासून आत इजा झाली की काय हे पाहावे.
कानाच्या पाळीला अनेक प्रसंगात जखमा होतात. कापलेली जखम असेल तर ताबडतोब शिवणे आवश्यक असते. मात्र कान चेंगरणे, चावणे, इत्यादी जखमा ब-या व्हायला वेळ लागतो. अशावेळी जंतुदोष नसल्यास कानाच्या जखमा लवकर भरून येतात. कारण या भागातला रक्तपुरवठा चांगला असतो.
या वर्षापासून हा नवा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम सुरु झाला आहे.
भारतात दर हजार लोकसंख्येस सुमारे 3 जणांना गंभीर कर्णबधिरता असते. यातली बहुतेक मुलेच असतात. याचा त्यांच्या संपूर्ण जीवनावर दुष्परिणाम होतो. सौम्य कर्णबधिरता असणा-यांची संख्या यापेक्षा जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात सरासरी 6% लोकांना कमीजास्त कर्णबधिरता असते.
बाळाला ऐकू येते की नाही हे 4 महिन्यांच्या आतच सहज ओळखता येते. असे असेल तर योग्य उपचार-प्रशिक्षण लवकरच सुरु करावे लागते.
कानाचे आजार (विशेषत: कान फुटल्यानंतर) लवकर बरे होतील यासाठी यासाठी योग्य उपचार करा, आवश्यक तेव्हा तज्ज्ञांकडे पाठवा.
आवाजाचे प्रदूषण कमी करणे. कारखाने, वाहतूक, लाऊडस्पीकर ही तीन कारणे महत्त्वाची आहेत.
वृध्द माणसांना जसा चष्मा लागतो, तसे कर्णयंत्र पण लागते. त्यांना स्वस्त व योग्य श्रवणयंत्रे उपलब्ध करणे.
मध्यकर्णाच्या आजाराने (सूज-पू- दाहाने) कधीकधी अंतर्कर्णात आजार शिरून ध्वनिशंखाला जंतुदोष होतो व सूज येते.
अंतर्कर्णाला सूज असेल तर चक्कर आणि मधूनमधून उलटया ही मुख्य लक्षणे दिसतात. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब कानाघ तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.

अंतर्कर्णाच्या अनेक प्रकारच्या आजारांत चक्कर येणे, उलटया होणे, कानात सूक्ष्म गुणगुण होत राहणे, इत्यादी त्रास होतो. अशा आजारात बहिरेपणा असेलच असे नाही. ही लक्षणे दिसली तर रुग्णास तज्ज्ञाकडे पाठवून द्या.
मध्यकर्णाचा मुख्य आजार म्हणजे कमीजास्त मुदतीची कानदुखी व कानसूज. हा आजार पुष्कळ आढळतो.
मध्यकर्णसूज हा आजार बहुतेकदा कान-नाक-घसा नळीतून (कानाघ नळी) येणा-या दूषित स्त्रावामुळे होतो. सर्दीपडसे किंवा घसादुखी यानंतर दोन-चार दिवसांनी कान दुखायला लागणे हे या आजाराचे नेहमीचे चित्र आहे. (मात्र दर वेळेस सर्दीपडशानंतर कान सुजतोच असे नाही). लहान वयात कानाघ नळी जास्त सरळ व कमी लांबीची असते. त्यामुळे मुलांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात येतात. मध्यकर्णाचा जंतुदोष बहुधा ‘पू’ निर्माण करणा-या जंतूंमुळे होतो. सुरुवातीस कान गच्च होणे, जड होणे, मंद दुखणे, त्यानंतर ठणकणे, पडदा फुटून पू येणे व ठणका बंद होणे या क्रमाने हा आजार चालतो.

काही वेळा ठणका लागून पडदा फुटण्याची पाळी न येता आपोआपही हा आजार थांबतो. कान फुटल्यावर चार-पाच दिवस पू वाहून कान कोरडा होतो. यानंतर कानाचा पडदा पूर्वीसारखा भरून येईपर्यंत 2-3 आठवडे त्या कानाने कमी ऐकू येते. लवकर बरा न झाल्यास कानात सूज व पू कायम राहतात. याने कान खराब होतो. लहान बालकांमध्ये या आजारात ताप, उलटया व कधीकधी जुलाब होतात. कान दुखल्याने मूल कानाकडे हात नेते.
उपचार
काही वेळा कानदुखी ही विषाणूंमुळे येते. पण ती वेगळी ओळखता येत नाही, म्हणून
आर्सेनिकम, बेलाडोना,चामोमिला, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

काही जणांच्या बाबतीत फुटलेला कान पूर्णपणे बरा न होता परत परत कानदुखी-सूज येत राहते. यामुळे कानाचा पडदा पूर्वीसारखा भरून येत नाही. पडद्याचे भोक कायम राहते. हा कान कायमचा अधू होतो. यातही एक वाईट प्रकार म्हणजे मध्यकर्णाच्या मागे वरच्या बाजूला हाडाच्या पोकळीत सूज-गाठ कायम राहते. यातून हळूहळू मेंदूपर्यंत जखम-सूज वाढत जाते. या प्रकारात कानाचा पडदा भिंगाने तपासल्यावर तो वरची कड सोडून इतर भागात अखंड असतो. वरच्या कडेच्या बाजूला उघडी फट दिसते व त्यातून पाणी व घाण वास येत राहतो. या प्रकारात मेंदूसूज होण्याचा मोठा धोका असतो.
म्हणूनच कान फुटल्यावर दोन आठवडयांत पूर्ण बरा झाला नाही तर तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. तसेच आकस्मिक कानसूज झाल्यावर जंतुविरोधी गोळयांची पुरेशी मात्रा सात-आठ दिवस देणे कानसुजेच्या बाबतीत आवश्यक असते. उपचार मध्येच सोडल्यास कानातला जंतुदोष टिकून जास्त नुकसान होण्याचा धोका असतो.
बाह्यकर्णाच्या त्वचेवर पुळी होणे आणि कान चिडणे
कानाच्या त्वचेवर ठिकठिकाणी पुळया होऊन पू येणे याला कान चिडणे असे म्हणतात. हे लहान वयात विशेषकरून आढळते. अस्वच्छ सुईने कान टोचल्यावर ब-याच मुलांना हा त्रास होतो.
कधीकधी पुळी बाह्यकर्णाच्या आतल्या अरुंद भागात होते. अशा वेळी ती बाहेरून सहज तपासणीत दिसत नाही. अशा वेळी कान दुखतो व पुळी फुटल्यावर पू येतो. असा पू आल्यावर कानात पुळी असण्याची शंका येणे साहजिक आहे. अशा वेळी कानातला पू स्वच्छ फडक्याने किंवा कापसाने टिपून घ्यावा. यानंतर कानाची तपासणी करावी. ब-याच वेळा पुळीचे तोंड स्पष्ट दिसते. लहान मुलांच्या कानाची दिशा प्रौढांपेक्षा सरळ असते. म्हणून मुलांच्या कानाची पाळी मागे ओढून प्रकाशझोत टाकल्यावर पडदा स्पष्ट दिसतो. फुटलेली पुळी नसल्यास ‘पू’ पडद्यामागून म्हणजे मध्यकर्णातून येत असला पाहिजे.
प्रौढांच्या बाबतीत एका साध्या दुर्बिणीने ही तपासणी करता येते. या तपासणीत कानाच्या पडद्याला भोक आहे किंवा नाही याची खात्री करता येईल. पू बाह्यकर्णातून येत असल्यास मध्यकर्ण सुरक्षित आहे असा अर्थ असतो.
बाह्यकर्णात पुळी असल्यास किंवा कान चिडला असल्यास कानात जंतुनाशक थेंब (दिवसातून तीन-चार वेळा) टाकावेत. याबरोबर पोटातून (1) कोझाल आणि(2) ऍस्पिरिन या गोळया दिल्यास चार-पाच दिवसांत आराम पडेल. लहान मूल असेल तर ऍस्पिरिन ऐवजी पॅमॉल द्यावे. कोझाल ऐवजी ऍमॉक्सी हे औषधही चांगले असते.
कान चिडलेला असल्यास वरील उपचाराबरोबरच रोज साबणाच्या कोमट पाण्याने धुऊन, कोरडा करून जंतुनाशक मलम लावावे.
कल्केरिया कार्ब, हेपार सल्फ, मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर
बाह्यकर्णात पू किंवा जखम झाली असल्यास कधीकधी त्यावरच बुरशीची बाधा होते. अशा वेळी कान दुखतो व घाण वासही येतो. तपासल्यानंतर कानामध्ये कागदाच्या लगद्यासारखा करडया रंगाचा थर आढळतो. ही बुरशी असते. निस्टॅटिन नावाची बुरशीनाशक पावडर किंवा जेंशनचे औषध कानात बुरशीवर सोडावे. याने बुरशी आठ दिवसांत नष्ट होते. याबरोबर मूळ आजारावरही उपचार करणे आवश्यक आहे.

आपल्या त्वचेत तेलकट द्रव पाझरणा-या ग्रंथी असतात. त्यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते. अशाच ग्रंथी कानातही असतात. त्यातून पाझरणा-या स्निग्ध पदार्थाचाच मळ तयार होतो. (या स्निग्ध पदार्थामुळे) कानात गेलेली धूळ, कचरा, त्वचेतून जाणा-या पेशी, इत्यादी पदार्थ चिकटून एकत्र राहतात. त्यामुळे कान एकंदरीत स्वच्छ राहतो. काही जणांमध्ये मळ तयार होण्याचे प्रमाण जास्त असू शकते.
ब-याच व्यक्ती स्वत: अधूनमधून कानातला मळ काढून टाकतात. यासाठी पुढे गोल वाटीसारखा आकार असलेले ‘कान कोरणे’ वापरले जाते. गोलसर भाग असल्याने याने सहसा इजा होत नाही. काडी किंवा पिन वापरणे मात्र धोक्याचे आहे. यात थोडी चूक किंवा अतिरेक झाल्यास पडदा फूटू शकतो. काडीच्या टोकास कापूस गुंडाळल्यास इजा टळू शकते. कोरताना कान कोरणे किंवा काडी कानाच्या पडद्याला स्पर्श करताच कानात विशिष्ट संवेदना होते. परंतु कानातला मळ स्वत: काढून टाकताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुलांना असे करू देणे निश्चितपणे धोक्याचे आहे.
आपल्या जबडयाच्या हालचालीमुळे कानातील मळ आपोआप बाहेर ढकलला जातो. पण काही जणांच्या बाबतीत मळ कानातच अडकून राहतो. अशा व्यक्तींना कानात मळ कडक होऊन कान दुखणे, मळामुळे कान भरून ऐकू न येणे, इत्यादी त्रास होतो. ऐकू न येणे – (विशेषत:लहान वयात) या तक्रारीमागे ब-याच वेळा कानातला मळ हे एक कारण असते. मळाचा रंग दाट तपकिरी किंवा काळा असतो. कानात प्रकाशझोत पाडून तो सहज ओळखता येतो.
मळ काढण्याचा एक सोपा उपाय करण्यासारखा आहे. आधी एक-दोन दिवस कानात ग्लिसरीन किंवा लसूण घालून गरम केलेले खोबरेल तेल किंवा मळ मऊ करणारे कानाचे औषध 1-2 थेंब टाकावे. आपण जखमेवर वापरतो ते हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचे फसफसणारे औषध एक-दोन थेंब या कानात टाकले तर मळ लगेच मऊ होतो व सुटतो. सुटलेला आणि मऊ झालेला मळ सहज निघेल तेवढा काळजीपूर्वक काढून टाकावा.
मळ आत कानाला किंवा पडद्याला घट्ट चिकटला असल्यास जोर लावू नये. त्यामुळे कानाला इजाच होईल. असा ‘खडा’ झालेला मळ कानाच्या डॉक्टरने काढलेला बरा. यासाठी पाण्याच्या पिचकारीचा वापर केला जातो.
खडा होऊ नये म्हणून झोपताना कानात तेल टाकण्याची घरगुती पध्दत अधूनमधून उपयुक्त आहे. लसूण घालून गरम केलेल्या खोबरेल तेलाचे एक-दोन थेंब कानात टाकण्याची पध्दतही चांगली आहे. पण रोज तेल टाकण्याची पध्दत अयोग्य आहे. यामुळे कानात बुरशीची लागण होऊन खाज सुटण्याची शक्यता असते.