
‘दमा’ म्हणजे ‘दम लागणे’ किंवा ‘श्वास लागणे’. लहान मुलांच्या बाबतीत ‘पोट उडणे’, ‘पोटात येणे’ असेही शब्दप्रयोग वापरले जातात. दम लागण्याची कारणे अनेक आहेत-त्यात श्वसनसंस्था-विकार, हृदय-विकार किंवा रक्तात हेमोग्लोबिन कमी असणे यापैकी कारण असू शकते. दमा म्हणजे छातीत आवाज येऊन जास्त श्वास-प्रश्वास चालणे आणि त्यावेळी इतर काही काम न करता येणे, असा आजार यह.
‘दमा’ या आजारात श्वासनलिका आकुंचनाने अरुंद होऊन श्वासोच्छ्वासाला अडथळा येतो. तसेच नलिकांचे आतील आवरण जाड होऊन त्यात स्त्राव पाझरतो. हा स्त्राव कोरडा व घट्ट होत जातो. त्यामुळे हवेची आतबाहेर ये जा पुरेशा प्रमाणात होत नाही. तसेच फुप्फुसांमध्ये रक्तातल्या वायूंची देवाण घेवाणही होत नाही. त्यामुळे दम लागतो. दमा एक तर पाच वर्षाखालच्या लहान मुलांत येतो. नाही तर विशीनंतर, विशेषतः मध्यमवयात आढळतो. काही मुलांचा दमा तात्पुरता असतो व पाच वर्षानंतर तो बहुधा आपोआप थांबतो. मोठया माणसांचा दमा मात्र हळूहळू वाढत जातो . त्याचे हृदयावरही वाईट परिणाम होतात.
कारण कसलेही असले तरी दम्यातील मुख्य घटना म्हणजे श्वासनलिका व उपनलिका अरुंद होणे. यामुळे हवेचा पुरवठा कमी होऊन प्राणवायू कमी पडतो. त्यामुळे श्वसनाचे श्रम वाढत जातात आणि श्वसनाचा वेग वाढतो. हवा अरुंद नळयांतून जात असल्याने आवाज (घुंई-घुंई या प्रकारचा) येत राहतो. आवाजनळीने हा आवाज लगेच ओळखू येतो. दम्याचे रोगनिदान यावरच अवलंबून असते.
यातले स्नायूंचे आकुंचन औषधांनी सैल पडते. तरी इतर दोन कारणे लगेच दूर होऊ शकत नाहीत. म्हणून श्वसनाचा घुंई घुंई आवाज नंतरही तीन-चार दिवस राहतो.
दमा ओळखून उपचार करण्यासाठी दम्याची पायरी किंवा तीव्रता ओळखावी लागते. यासाठी खाली दिलेल्या काही सूचना उपयुक्त ठरतील.
तीव्र दमा ऍटॅक – व्यक्तीला एक वाक्य पूर्ण करायला देखील 2-3 श्वास घ्यावे लागतात. असा रुग्ण असल्यास श्वसनोपचार देऊन ताबडतोब डॉक्टरकडे पाठवावे. सामान्यपणे दम्याचे 5 टप्पे किंवा पाय-या आहेत.
सौम्य – दर आठवडयाला न येणारा दमा, काही तास-दिवस राहणारा दमा, मात्र यामध्ये रुग्ण पूर्णपणे ठीक असतो. IEF श्वसन 80% पेक्षा चांगले असते.
उपचार – त्यावेळेपुरते सालमाल फवारा/गोळी द्यावी.
दम्यात शरीराची श्वसनसंस्थेची एक प्रकारची कोंडी होते. बरीच हवा श्वसनसंस्थेत – फुप्फुसात अडकून राहते. त्यामुळे फुप्फुसे नीट रिकामी होऊ शकत नाहीत. यामुळे श्वास घेतांना थोडया जागेतच मावणारा श्वास घ्यावा लागतो. परिणामी श्वास व उच्छ्वास (हवा घेणे व टाकणे) खूपच मर्यादित मापाचे होते. या हवेची मोजमापे करण्यासाठी श्वासमापक यंत्रे मिळतात. ‘पीक-फ्लो-मीटर’ हे उपकरण यासाठी उपयुक्त असते.
आयुष्यात पहिल्यांदाच दमा आला असेल तर फवारा देऊन डॉक्टरकडे पाठवावे. एरवी रुग्णाची अवस्था फार गंभीर नसेल तर गोळयांचा उपचार सुरु करावा. अमिनो किंवा सालमेटॉरोल या औषधांनी बहुधा दमा कमी होतो. लहान मुलांसाठी याची पातळ औषधे मिळतात. काही औषधाचा श्वासातून घेण्याचा फवारा (स्प्रे) मिळतो. डोस त्यावर लिहिलेला असतो.

1) मिटर्ड डोस इनहेलर : स्टेरॉईड, सालमेटोरोल व इतर दमाविरोधी औषधांचे इनहेलर श्वासावाटे घ्यायचे फवारे मिळतात. एका पॅकमध्ये सुमारे 200 डोस असतात. फवा-याचे तोंड आपल्या तोंडात धरून डोस श्वासावाटे आत घ्यायचा असतो. बाटलीची कळ दाबणे व श्वास आत घेणे हे एकाच वेळी करावे लागते. हे थोडया सवयीने जमते.

2 ) स्पेसर : वरीलप्रमाणे बाटलीची कळ दाबणे व श्वास आत घेणे हे जमले नाही तर फवारा-डोस वेगळया बाटलीत सोडून त्याची हवा आत घेता येते. (स्पेसर). फवारा डोसच्या पॅकची किंमत जास्त असते. पण त्वरित परिणाम व माफक डोस यामुळे फवारा सोयीचा पडतो.

3) ड्राय पावडर इनहलेर : यात कॅपपसुलमध्ये भरलेली कोरडी पावडर फवा-याच्या वेगळया यंत्रात वापरतात. त्याला रोटाहेलर म्हणतात. ज्यांना इनहेलर वापरण्यास अवघड वाटतो त्यांना रोटाहेलर वापरणे जमते.
या औषधांनी दमा कमी झाला नाही तर इंजेक्शन व इतर उपचारांची गरज लागते. अशा वेळी रुग्णालयात दाखल करणे चांगले.
दम्याचे कारण माहीत नसल्याने समूळ उपचार शक्य नसतो. म्हणून जेव्हाजेव्हा दम्याचा त्रास होतो तेव्हा औषधे पुन्हा पुन्हा द्यावी लागतात. शक्यतो कोणते औषध त्या रुग्णाला चालते हे ठरल्यानंतर रुग्णाने घरी त्या गोळयांचा 10-15 दिवसांचा साठा ठेवणे चांगले. फवारादेखील ठेवायला पाहिजे.
आपले डॉक्टर किंवा नर्सताई आपल्याला ही औषधे काशी वापरायची ते दाखवतील आणि समजावून सांगतील. एकदा सवय झाली की कोणताही प्रकार सोपं आहे.
फुगा फुगविण्याचा व्यायाम केल्यामुळे श्वासनलिका रुंदावतात.
दमा (Asthma) साठी श्वसनमार्गे दिली जाणारी औषधे
(Inhaled Drugs for Asthma – MDI, DPI, Nebuliser, Spacer)
उपचारात श्वसनमार्गे (inhaled) औषधांचा वापर सर्वात प्रभावी मानला जातो कारण औषध थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचते आणि दुष्परिणाम कमी होतात.
श्वसनमार्गे औषधे देण्याचे प्रमुख प्रकार
MDI (Metered Dose Inhaler) – मीटर्ड डोस इनहेलर
रचना: छोट्या कॅनिस्टरमध्ये औषध व प्रोपेलंट असतो. प्रत्येक दाबात ठराविक प्रमाणात औषध निघते.
1. इनहेलर चांगला हलवा.
2. श्वास बाहेर सोडा.
3. इनहेलरचा तोंडाचा भाग (mouthpiece) तोंडात धरून दाबा आणि त्याच वेळी खोल श्वास घ्या.
4. श्वास 8–10 सेकंद रोखा आणि मग हळूहळू सोडा.
स्पेसर हा एक प्लास्टिकचा नळीसारखा (chamber) भाग असतो जो MDI इनहेलरला जोडला जातो. औषध स्पेसरमध्ये आधी फवारले जाते आणि रुग्ण तेथून हळूहळू श्वास घेतो.
1. MDI इनहेलर स्पेसरच्या एका टोकाला जोडा.
2. दुसऱ्या टोकाचा मुखभाग तोंडात ठेवा किंवा मुलांसाठी मास्क लावा.
3. इनहेलर दाबून औषध स्पेसरमध्ये फवारावे.
4. 4–5 सेकंदात हळूहळू श्वास घ्यावा.
5. शक्य असल्यास 2–3 वेळा श्वास घ्या जेणेकरून पूर्ण डोस आत जाईल.
आर्सेनिकम, बेलाडोना, ब्रायोनिया, सीना, चामोमिला, ड्रॉसेरा, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला, -हस टॉक्स,सिलिशिया, स्ट्रॅमोनियम, सल्फर
हृदयाचे कामकाज मंदावल्यानंतर देखील ‘दम्यासारखा’ विकार अचानक उद्भवतो. हृदयविकाराचा झटका, झडपांचा आजार, गिरीशिखरावर किंवा 2500 मीटर उंचीवर सवय नसतांना जाणे या करणांनी हा दमा उद्भवतो. यात मुख्य म्हणजे फुप्फुसातल्या पेशींमध्ये द्रवपदार्थ तुंबतो. यामुळे हवेला अडथळा होतो. रुग्ण यामुळे अचानक अस्वस्थ, घाबरा होतो, दम लागतो, खूप घाम येतो, रुग्ण उठून बसतो, तोंडाला फेस येतो, नाडी वेगाने चालते, रक्तदाब वाढतो किंवा उतरतो, आवाजनळीने छाती तपासल्यावर सूक्ष्म बुडबुडयांचे आवाज येतात.
रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात हलवावे. अशावेळी इंजेक्शने, ऑक्सिजन, श्वसनोपचार, इ. मदत लागू शकते. प्रथमोपचार म्हणून (उपलब्ध असल्यास) अमिनोफायलिन, फ्रुसेमाईड, मॉर्फिन, इ. इंजेक्शने द्यावी लागतील. हिमालयात सहलीला जाणा-यांनी ही साधने सोबत ठेवावीतच. कोणालाही असा ऍटॅक येऊ शकतो.