श्वसनसंस्थेचे आजार

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण योजना

कार्यक्रम उद्दिष्टे
  • नवीन टीबी लागण होण्यामध्ये 90% घट व्हावी
  • टीबी मृत्यूप्रमाण 80% प्रमाणात कमी व्हावे
  • कोणालाही टीबी साठी मोठा खर्च येऊ नये

या योजनेत खाकरा-बेडका घेण्याची पध्दत, औषधयोजना आणि देखरेखीसाठी काही सुधारणा केल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्य क्षयरोग केंद्र असते, त्या खाली तालुकावार क्षयरोग उपकेंद्रे व बेडका तपासण्याच्या सोयी आहेत. औषधयोजना सुटसुटीत झाली असून औषधे उपकेंद्रात समक्ष घ्यायची आहेत. काही त्रास झाला तर त्याबद्दल योग्यती मदत/मार्गदर्शन करण्यासाठी उपकेंद्रावर सोय आहे.

यातली औषधयोजना/गट ठरवण्याचे काम शासकीय आरोग्यकेंद्राचे डॉक्टर करतात. उपकेंद्रावर फक्त उपचार होतात. आवश्यक तर बेडक्याचा नमुना काचपट्टीवर घेतला जातो. सर्व गोळया प्लॅस्टिक पॅकमध्ये मिळतात. पहिले दोन महिने (गट व मध्ये तीन महिने) जास्त औषधे दिली जातात, त्यानंतर कमी, असे तत्त्व आहे. प्रत्येक रुग्णाचे पूर्ण खोके वेगळे ठेवले जाते. म्हणजे अपुरा औषधोपचार व्हायचे कारण नसते.

या योजनेत क्षयरोगाचे खालीलप्रकारे वर्गीकरण केलेले आहे.

प्रवर्ग 1 : बेडक्यात जंतू सापडलेले नवीन रुग्ण किंवा गंभीर/जास्त आजारी असलेले इतर क्षयरुग्ण. यांना दोन महिने HRZE आणि मग चार महिने HR ही औषधयोजना (लाल खोके) असते. यातली औषधे आठवडयातून (दिवसाआड) फक्त तीन दिवस घेतली जातात. पैकी पहिल्या दोन महिन्यांचे उपचार केंद्रावर आरोग्यकार्यकर्त्या समक्ष घ्यायचे आहेत.

प्रवर्ग 2 : एकदा उपचार झालेले पण आता परत आजारी झालेले रुग्ण या गटात येतात. यांना दोन महिने HRZES ही औषधे (निळे खोके) समक्ष व त्यानंतर पाच महिने HRE ही औषधयोजना ठरलेली आहे. सर्व उपचार आठवडयातून तीन दिवस (दिवसाआड) दिले जातात.

प्रवर्ग 3 : यात बेडक्याचे जंतू नसलेले क्षयाचे नवीन रुग्ण आणि इतर सर्व क्षयरुग्ण (जास्त आजारी नसलेले) येतात. यांना पहिले दोन महिने HRZ व त्यानंतर चार महिने HR ही औषधयोजना (हिरवे खोके) आहे. सर्व औषधे आठवडयातून तीन दिवस (म्हणजे दिवसाआड) याप्रमाणे घ्यायची असतात.

R (रिफामायसिन), H (आयसोनेक्स), Z (पायराझिनामाईड), E(इथांबुटाल), S(सेप्ट्रोमायसिन)

उपचार पाठपुरावा

ही सर्व उपाययोजना करण्याची मुख्य उद्दिष्टे म्हणजे

  • सर्वांनी नियमित व पूर्ण उपचार घ्यावेत.
  • संसर्गाला आळा बसावा आणि रुग्ण लवकर बरा व्हावा.
  • यासाठी दर दोन महिन्यांनी बेडक्याची पुनर्तपासणी केली जाते.

प्रवर्ग 1 : मधील रुग्णांच्या बेडक्यात जंतू सापडले तर दोन महिन्यांच्या उपचारामध्ये आणखी एक महिना वाढवला जातो.

प्रवर्ग 2 : मध्ये पहिली बेडका तपासणी तीन महिन्यांनी केली जाते. त्यात जंतू सापडले तर आणखी महिनाभर तीच उपाययोजना करून नंतर पुढची औषधयोजना केली जाते.

प्रवर्ग 3 : मधील रुग्णाची बेडका तपासणी दोन महिन्यांनी केली जाते, त्यात जंतू सापडले तर त्याला सरळ प्रवर्ग 2 प्रमाणे उपचार चालू केले जातात. जंतू नसतील तर ठरल्याप्रमाणे उपचार केले जातात.

औषधांचे काही त्रासदायक परिणामही होतात. अशा वेळी काय करायचे याची सूचना औषधे देणा-याला दिलेली असते. या सूचना व औषधांची माहिती सोबतच्या तक्त्यात आहे.

एड्सच्या प्रसाराबरोबर क्षयरोग होण्याची आणि वाढण्याची शक्यता मनात धरली पाहिजे. कमी प्रतिकारशक्तीमुळे एड्स रुग्णाला झालेला क्षयरोग लवकर बरा होत नाही. एड्सग्रस्त क्षयरोगाचे जंतू औषधांना दाद देईनासे होतात. असे घातक जंतू पसरण्याचा मोठा धोका आहे.

दुसरी अडचण अशी की बरे न होणा-या रुग्णांची संख्या 33% इतकी जास्त असल्याने यांच्यामध्ये प्रतिकारकक्षम जंतूंची शक्यता असते. हे जंतू समक्ष उपचारातील औषधांना दाद देत नाहीत. अशा जंतूंचा प्रसार झाला तर हळूहळू सर्व कार्यक्रमालाच खीळ बसू शकते.

श्वसनसंस्थेची तपासणी

नाक

नाकाची तपासणी दोन -तीन बाबतींत करावी लागते.

  • नाकात काही गेले असल्यास
  • श्वासोच्छ्वासात नाकामुळे काही अडचण, अडथळा वाटत असल्यास
  • नाकाचा मधला पडदा एका बाजूला फारच फुगला असेल, (यालाच नाकातील हाड वाढणे असा चुकीचा शब्दप्रयोग करतात) वाकडा झाला असेल तर, किंवा नाकाच्या आतले आवरण सुजून हवेची वाट अरुंद होत असेल.
घसा

घसादुखी, कोरडा खोकला, आवाज बदलणे, गिळायला त्रास होणे, ताप, सर्दी या बाबतीत घशाची तपासणी अवश्य करावी.

लहान मुलांत प्रत्येक तापाच्या बाबतीत घसा तपासावा.

घशात तपासण्याच्या मुख्य गोष्टी म्हणजे टॉन्सिलच्या ग्रंथी आणि घशाची पाठभिंत.

टॉन्सिल

सर्वांना जन्मतः टॉन्सिल असतातच. टॉन्सिल हे संरक्षक द्वारपालाचे काम करीत असतात. व वयाच्या 10-12 वर्षांपर्यंत ते आकाराने मोठेच असतात. त्यानंतर ते हळूहळू कमी होऊन गावठी बोराच्या आकाराचे होतात व कायम तेवढेच राहतात. लहानपणी कधी कधी टॉन्सिलवर सूज येते. अचानक सूज, ताप, घसादुखी ,टॉन्सिल लालभडक व सुजलेले दिसतात. काही वेळा पू देखील येतो टॉन्सिलवर पांढरा भुरका पडदा बसला असेल तर घटसर्प असू शकेल.

वारंवार टॉन्सिल सुजत असतील तर गाठी सुजून मोठया होतात व त्यावर ठिपके दिसतात.

या टप्प्यातील सर्व उपचार समक्ष घ्यायचे आहेत.

या टप्प्यात दर आठवडयास/पंधरवडयास एकदा समक्ष, उरलेले उपचार घरी

*** शेवटची बेडका तपासणी जंतुयुक्त आल्यास प्रवर्ग 2 मध्ये घालून नव्याने उपचार करावे.

पहिली बेडका तपासणी 3 नमुन्यांची मिळून (लगोलग, रात्रभर जमा केलेली, त्यानंतर लगेच). नंतरच्या तपासण्या 2 नमुन्यांच्या मिळून

स्वरयंत्र

आवाज बदललेला असेल तर बहुतेक वेळा स्वरयंत्रावर सूज असते. स्वरयंत्र म्हणजे घशाच्या थोडया खाली असलेली एक पेटी असते. उतारवयात आवाज घोगरा होणे, बदलणे वगैरे आढळल्यास घशाच्या कर्करोगाची शक्यता असते. यासाठी खास लांब दांडा असलेल्या आरशाने स्वरयंत्राची तपासणी करावी लागेल. याला थोडा अनुभव लागतो. कानाघ तज्ञ ही तपासणी करू शकतात.

आवाजनळी (स्टेथोस्कोप)

स्टेथोस्कोप हे एक फार साधे यंत्र आहे. त्याच्या एका बाजूला आवाज पकडण्यासाठी एक ताणलेला पडदा असतो व त्या पडद्याची हालचाल (आवाजाने) नळीवाटे डॉक्टरांच्या दोन्ही कानात पोचवली जाते. या यंत्राची किंमत 50-100 रुपये असते. ‘डिग्री’ म्हणजे हे यंत्र नसून ‘तापनळी’ होय. स्टेथॉस्कोपला आपण आवाजनळी म्हणू या.

फुप्फुसे

आवाजनळी तुमच्याकडे असेल तर ती छातीवर टेकवून जागोजागी हवा नीट चालते की नाही, की अडथळा येतो हे पाहता येते. छातीच्या दोन्ही बाजूंना समप्रमाणात हवा चालत नसेल तर कोठल्या तरी बाजूला दोष असण्याची शक्यता असते. हवा कमी चालत असेल किंवा फार जास्त चालत असेल तर दोष असू शकतो.

फुप्फुसाची तपासणी म्हणजे हवा सगळीकडे कशी, किती जाते हेच तपासणे. आवाजनळीने दोन गोष्टी चांगल्या समजतात. एक म्हणजे ‘क्रेप’ किंवा ‘बुडबुडे’. आल्यामुळे फुप्फुसातून श्वासनलिकांमध्ये थोडेसे पाणी किंवा द्रव, हवा यातून जाताना बुडबुडयांचा आवाज येतो. हे बुडबुडे खूप सूक्ष्म असतात. त्यांचा आवाज कांद्याच्या वाळलेल्या पापुद्रयासारखा किंवा वाळलेल्या गवताचे एकमेकांवर घासल्यासारखा येतो. पाण्याचा किंवा द्रवाचा अडथळा सूक्ष्म श्वासनलिकांमध्ये असेल तर हा आवाज मोठा येतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवाजनळीने हृदयाच्या झडपांचे आवाज व त्यातील बिघाड कळतात. तसेच ती पोटावर ठेवून आतडयांतील हालचालींबद्दल माहिती मिळू शकते.