वंध्यत्व आणि उपाय

सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान

सामान्य नैसर्गिक मार्गाने गरोदरपणा न ठरणाऱ्या जोडप्यांसाठी आधुनिक वैद्यकीय शास्त्रात विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान म्हणतात. यात स्त्रीबीज(Egg) व शुक्रपेशी (Sperm) यांचे संयोग शरीराच्या बाहेर किंवा शरीरात कृत्रिम पद्धतीने करून गर्भधारणा घडवून आणली जाते.

सहायीत शुक्रपेशी प्रवेश IUI (Intrauterine Insemination)

पतीचे किंवा दात्याकडून मिळालेले शुक्रपेशी प्रक्रिया करून थेट स्त्रीच्या गर्भाशयात ठेवले जातात.

कृत्रिम फलन तंत्र IVF (In Vitro Fertilization / Test Tube Baby)

स्त्रीकडून लॅप्रोस्कोपी तंत्राने घेतलेले स्त्रीबीज आणि पुरुष-शुक्रपेशी प्रयोगशाळेत एकत्र केले जातात. तयार झालेला भ्रूण (Embryo) नंतर गर्भाशयात ठेवला जातो. स्त्रीबीज परीक्षानळीत घेऊन शुक्रपेशी वापरून शरीराबाहेर फलन केले जाते. फलित स्त्रीबीज परत गर्भाशयात स्थापित केले जाते. यासाठीदेखील वारंवार तपासण्या कराव्या लागतात. वैद्यकीय क्षेत्रात हा शोध क्रांतिकारक ठरला आणि  शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळाले. अक्षरशः लाखो जोडप्यांना यामुळे स्वतःला  मूल होण्याचे वरदान लाभले. एवढेच नव्हे तर असे परिस्थिती अतिशीत तापमानात काही महिने व वर्षे राखून ठेवता येते आणि सोयीप्रमाणे नंतर वापरता येते ती देखील क्रांतिकारक प्रगती झालेली आहे. आज  हे तंत्र मोठ्या प्रमाणात वापरले जाते

थेट स्त्रीबीज-फलन -ICSI (Intracytoplasmic Sperm Injection)

एकच शुक्रपेशी निवडून थेट स्त्रीबीजात सोडला जातो. पुरुषामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असताना ही पद्धत वापरली जाते.

भ्रूण दान (Donor Egg / Sperm / Embryo)

स्त्रीबीज, शुक्रपेशी किंवा तयार भ्रूण दुसऱ्या दात्याकडून घेऊन गर्भधारणा केली जाते.

स्त्रीबीज दान

काही स्त्रियांना स्त्रीबीज निर्माणच होत नसल्याने अन्य स्त्री कडून स्त्रीबीज दान घेऊन गर्भधारणा करता येते. यासाठी कृत्रिम फलन करून गर्भाशयात रोपण करावे लागते.