कामगार आणि त्यांची कुटुंबे यांच्या आरोग्यरक्षणासाठी व औषधोपचारासाठी ही योजना चालवण्यात येते. यात कामगार, मालक, सरकार या तिघांची वर्गणी असते. ठरावीक वेतनपातळी असणा-या सर्व कारखान्यांत ही योजना सक्तीची आहे. काही कारखान्यांत वेतन जास्त असल्याने कामगारांसाठी स्वतंत्र योजना आहेत. राज्य कामगार विमा योजनेत कामगारास खालील फायदे मिळतात
या योजनेत वैद्यकीय सेवेची व्यवस्था दोन प्रकारे केलेली असते
काही कारखान्यांच्या स्वत:च्या आरोग्ययोजना आहेत. त्यात कारखान्याचा मोठा निधी असतो. कारखान्यात काही पगारी डॉक्टर असतात तसेच कारखान्याबाहेर खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना मान्यता दिलेली असते. यात कारखानाच बहुतेक बिल भरत असल्याने एकूणच वैद्यकीय सेवांचा खर्च चढा होत गेलेला आहे. अशा योजना हळूहळू महाग होत जातात हा सर्वत्र अनुभव आहे. इतर नागरिक वैद्यकीय सेवेच्या या चढत्या दरांमुळे हैराण होतात.