skin iconत्वचाविकार
इतर सूक्ष्मजंतूंमुळे होणारा दाह

skin-disorders काही सूक्ष्मजंतूंमुळे कातडीचा दाह होतो, पुरळ उठतात आणि खाज सुटते. यावर वरीलप्रमाणे स्वच्छता करून जंतुनाशक मलम लावावे. पोटातून कोझाल किंवा डॉक्सीच्या गोळया घेतल्याने लवकर आराम पडतो.

कडुनिंबतेल हे ही उत्तम जंतुनाशक आहे.

जळवात (पायाला भेगा पडणे)

feet cracks पायाला भेगा पडणे (विशेषत: उतारवयात) हे उष्ण कोरडया हवामानात सर्रास आढळणारे दुखणे आहे. अनवाणी किंवा नुसत्या चपला घालून वावरल्याने पायावर घर्षणाचा, कोरडया वातावरणाचा व धुळीचा परिणाम होऊन भेगा पडू शकतात. बुटांच्या सतत वापराने भेगांचे प्रमाण आपोआप कमी होते.

भेगा पडल्यावर तात्पुरता आराम म्हणून रोज रात्री पाय गरम पाण्यात 5 मिनिटे बुडवून ठेवावेत. यानंतर स्वच्छ धुऊन खोबरेल तेल किंवा आमसूल तेल लावावे. भेगा होऊ नयेत म्हणून बूट वापरावेत. बुटांनी पायाचा कोरडेपणा कमी होतो व त्वचा चांगली राहते.

आयुर्वेद
  • राळेचे मलम (तेल, पाणी, व राळ यापासून करतात. हे मलम रात्री झोपताना व सकाळी उठल्यावर लावल्यास आराम पडतो.)
  • गाईम्हशींच्या प्रसूतीमध्ये पडलेली वार चरबीयुक्त असते. ही चरबी जळवातात उपयोगी पडते. यासाठी जळवातावर वार दोन-तीन तास बांधून ठेवणे किंवा निदान वार काही वेळ पायाखाली घ्यावी. या उपायाने निदान दोन-तीन महिने तरी जळवाताची वेदना होत नाही.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.