अक्युपंक्चर (मर्मावर सुया टोचणे) किंवा अक्युप्रेशर (मर्मबिंदूवर दाबणे) ह्या चिनी उपचार पद्धती आहे. पण भारतीय वैद्यकशास्त्रात मर्मचिकित्सा पद्धत होती. त्यातून हे शास्त्र निघाले असावे. आशियाई उपचार पद्धतीत अक्यु पद्धत ही एक महत्त्वाची उपचार पद्धत आहे. ती शिकायला सोपी, करायला कमी खर्चिक (बिन-औषधी), आरामदायक आणि रुग्ण-वैद्य नाते घट्ट करणारी एक चांगली पद्धत आहे. निवडक असे ५० मर्मबिंदू आपण शिकूया.
मर्मबिंदू | बिंदूवर्णन | उपयोग |
---|---|---|
डिंगचुआन | मानेच्या खालचा भाग पाठीमागे ७ व्या मानमणक्याच्या अर्धा इंच बाजूला दोन्हीकडे | दमा खोकला मान आखडणे खांद्यात वेदना पाठदुखी |
पित्ताशय १४ जीबी | कपाळावर भुवईच्या १ इंच वर मधोमध | डोकेदुखी पुढचा भाग डोळ्याला अंधुक दिसणे |
जीबी २० | मानेचा वरचा भाग मान आणि डोके यांची जुळणी असते तिथे दोन्ही बाजूला खळग्यात | डोकेदुखी मान आखडणे गरगरणे डोळा दुखणे खांदे दुखी |
जीबी २१ | जीबी २० कडून खांद्यांच्या उंचवट्याकडे उतरताना मधोमध स्नायूरेषेवर | खांदेदुखी मान दुखणे मान आखडणे |
जीबी ३० | खुब्याच्या हाडाखाली पँटच्या बाजूच्या खिशात हात घालतो ती जागा | कंबरदुखी खुबा दुखणे |
जीबी ३४ | गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूस खालच्या टेंगळाच्या १‘ खाली | पाय बधिरणे पायाची शक्ती कमी होणे गुडघा सुजणे तोंड कडू होणे उलटी स्नायूंसाठी |
जीव्ही २६ | नाकाच्या खाली मिशीच्या मध्यभागी | बेशुद्धी व लहान मुले बाळे यांना झटके येणे |
जीव्ही १४ | मानेच्या तळाशी मध्यरेषेवर मानेचा सर्वात मोठा मणका त्याच्या खाली | थंडीताप सर्दी दमा खोकला मान आखडणे |
जीव्ही २० | डोक्याच्या वरच्या मध्यबिंदूवर कर्णरेषेच्या मधोमध | डोकेदुखी कानात गुणगुण डोळ्यांना अंधुक दिसणे मानसिक शांतता |
हृदय ९ | करंगळीच्या आतल्या बाजूस नखाच्या तळरेषेत | छातीत धडधड छातीत दुखणे |
हृदयरेषा | मनगटावर आतल्या बाजूस | छातीत धडधड अधीरता छातीत दुखणे निद्रानाश बेशुद्धी फिट भिरगी हाताचे टळवे गरम होणे |
मूत्रपिंड १ | पायाच्या तळव्यावर लहान बोटाच्या व अंगठ्याच्या फुगाराच्या मधे | घसासूज लघवीस वेदना बेशुद्धी अवघड बाळंतपण |
मूत्रपिंड २७ | गळपट्टीच्या हाडाखाली छातीच्या मध्यरेषेच्या २ इंच बाजूला | दमा खोकला |
मूत्रपिंड ३ | टाचेच्या आतल्या बाजूला मागल्या स्नायूबंधाच्या १५ इंच पुढे | घसासूज अनियमित पळी खालची पाठदुखी दमा |
मोठे आतडे ११ | हाताच्या कोपराच्या बाहेरची बाजू जेथे घडी रेषा संपते तिथे | हाताच्या कोपराचे दुखणे कोठेही खाज अतिरक्तदाब पोटदुखी ताप |
मोठे आतडे २० | नाकपुडीच्या बाजूला अर्धा इंच | नाक चोंदणे नाकातून पाणी घोळणा फुटणे |
मोठे आतडे ४ | मळहातावर अंगठा व तर्जनी एकमेकांजवळ आणल्यावर जो फुगवटा तयार होतो त्याच्या उंचवट्यावर | गर्भाशयातून रक्तस्त्राव हर्निया अंतर्गळ फिट भिरगी डोकेदुखी निद्रानाश |
यकृत ८ | गुडघा वाकवा खुर्चीवर बसल्यावर वाकतो तसा आतल्या बाजूला त्वचेची घडी संपते तो बिंदू | लघवीस वेदना ओटीपोट दुखणे गुडघ्यात वेदना मांडीच्या आतल्या बाजूस दुखणे |
फुप्फुस १ | गळपट्टीच्या मध्यबिंदूच्या १ इंच खाली | खोकला दमा घसासूज हात किंवा हाताचा कोपरा दुखणे |
फुप्फुस ६ | मनगट व हाताचा कोपरा यांच्या गोर्या बाजूला मधोमध किंचित बाहेरच्या बाजूला | खोकला दमा घसासूज हात किंवा हाताचा कोपरा दुखणे |
फुप्फुस ७ | मनगटाच्या सुमारे दीड इंच वर वरील रेषेवरच | दमा खोकला मान आखडणे घसासूज मनगट अधू होणे |
हृदयआवरण ६ | मनगटाच्या चेषेच्या वर मध्यरेषेवर गोर्या बाजूवर २ इंच वर | छातीत धडधड उलटी मलेरिया ताप फिट भिरगी हाताच्या कोपरा दुखणे |
लहान आतडे ३ | मूठ आवळल्यानंतर करंगळीच्या बाजूच्या पहिल्या हस्तरेषेची घडी संपते तो बिंदू | डोकेदुखी मान आखडणे कंबरदुखी |