(1) सर्पदंश: काठी बांधून हालचाल होऊ न देणे, श्वसन थांबत असल्यास निओस्टिग्मीन + ऍट्रोपीन इंजेक्शन शिरेतून देणे.
(2) विंचूदंश: दंशाच्या जागी पोटॅशियम परमँगनेट दाबणे व लिंबू पिळणे. तुरटी भाजून लावणे, लिग्नोकेन इंजेक्शन देणे.
(3) जखमा: रक्तस्राव थांबवणे (दाब किंवा चिमटा), जखमा शिवणे, बांधणे.
(4) अस्थिभंग : अस्थिभंग बांधून स्थिर करणे.
(5) विद्युत धक्क्याने हृदयविकार झटका: कृत्रिम हृदयक्रिया (दाब देणे), कृत्रिम श्वसन (तोंडाने किंवा छातीवर दाब देऊन).
(6) बुडणे: छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढणे, घशातून द्राव काढणे (सक्शन), कृत्रिम श्वसन व हृदयक्रिया.
(7) पोटात विषारी पदार्थ जाणे: उलटी करवणे (मिठाचे पाणी पाजणे, घशात बोटे घालणे) कीटकनाशके असल्यास शिरेतून चार-पाच ऍट्रोपीन इंजेक्शने देणे.
(8) शोष: (अतिसार), भाजणे, उष्माघात: जलसंजीवनी देणे, शिरेतून सलाईन देणे.
(9) खूप ताप चढणे: कोमट पाण्याने अंग पुसून ताप उतरवणे.
(10) बाळंतपण: नाळ बांधणे व कापणे, बाळाचा श्वसनमार्ग साफ करणे, रक्तस्राव आपोआप थांबत नसल्यास गर्भाशयचोळून, दाबून व मेथर्जिन इंजेक्शन देणे, स्वच्छ कपडा व हाताची मूठ वापरून गर्भाशय दाबणे व रक्तस्राव थांबवणे.गुदद्वारात प्रोस्टाग्लॅडिनची गोळी बसवून द्यावी.
(11) कुत्रे चावणे: साबणाच्या पाण्याने जखमा धुऊन काढणे
ही प्रथमोपचाराची अंगे आत्मसात करणे तसे सोपे आहे. पण मुख्य म्हणजे प्राथमिक आरोग्यकेंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात ती प्रत्यक्ष पाहणे व शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे तपशीलवार वर्णन इथे दिलेले नाही.
विषबाधांचे निवडक प्रकार (तक्ता (Table) पहा)
प्रथमोपचाराची आवश्यक तंत्रे (तक्ता (Table) पहा)