आयुर्वेदाचे पोषणशास्त्र हे आधुनिक शास्त्रापेक्षा बरेच वेगळे आहे. अन्नपदार्थांना अनेक गुणधर्म असतात व शरीरप्रकृतीप्रमाणे त्यांचा बरावाईट परिणाम होतो असे आयुर्वेद मानतो. फार तपशिलात न जाता त्यातल्या सोप्या तत्त्वांची आपण माहिती घेऊ या.
शरीर हे सात धातूंचे बनलेले आहे (रस, रक्त, मांस, मेद,अस्थि,मज्जा आणि शुक्र). विशिष्ट अन्नपदार्थ हे विशिष्ट धातू वाढवतात/पोसतात असे आयुर्वेद मानतो.