सोलापूरच्या श्रीमती वत्सला लिंबाळे यांनी साप्ताहिक साधनामधील एक लेख वाचून आमच्याशी संपर्क साधून देणगी देऊ केली. विशेष म्हणजे त्यांचे दिवंगत पती श्री. देवदास विरप्पा लिंबाळे (जन्म 09.03.1935- मृत्यू 18.06.2001) यांच्या फंडातील पूर्ण रक्कम रु. 25,000/- आग्रहाने भारतवैद्यक संस्थेस दिली. एका मध्यम वर्गीय व निवृत्त स्त्रीने पूर्ण बचत आपल्या दिवंगत पतीच्या इच्छेनुसार आमच्यासारख्या काहीशा अप्रसिध्द संस्थेला देणगी म्हणून द्यावी ही गोष्ट विशेष तर आहेच पण त्यामुळे आमची जणू जबाबदारीच वाढली असे मला वाटते. ही देणगी त्यांनी 2000 साली दिली. यावेळी ई-पुस्तकाचे काम अद्याप अस्पष्ट होते. यात किती वेळ जाणार होता हे अनिश्चित होते. शिवाय 2003 साली मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आरोग्यविद्याशाखा स्थापन करण्याची जबाबदारी स्वीकारल्याने पुस्तकाच्या कामास वेळ देणे अवघड झाले. भरीस भर म्हणून केंद्रसरकारतर्फे सुरू झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन मधील आशा कार्यकर्त्यांसाठी शैक्षणिक आराखडा तयार करणे आणि त्याची पाच पुस्तके तयार करण्याचे काम स्वीकारल्यामुळे भारतवैद्यक पुस्तकाच्या कामात मोठा खंड पडला. अशा देणगीचे एक उत्तरदायित्त्व असूनही वेळेअभावी काम पूर्ण होणे अवघड झाले होते. या काळात श्रीमती वत्सलाताई लिंबाळे यांनी देणगीचा कोणताही दबाव घेऊ नका असे अनेक वेळा फोनवर व पत्राने सांगितले. आता 2010 साली हे महत्त्वाचे ई-पुस्तक प्रकाशित होत आहे. यासाठी बरीच रक्कम लागत असली तरी श्रीमती लिंबाळे यांच्या सत्वशील निधीचा यात मोलाचा वाटा आहे. थोडया उशिरा का होईना मी हे काम या टप्प्यापर्यंत आणू शकलो ही आनंदाची गोष्ट आहे.
श्री. शरद जोशी. शेतकरी संघटना.
श्री. सुरेशचंद्र म्हात्रे, आंबेठाण. ता. राजगुरुनगर.
डॉ. अनंत फडके, पुणे.
श्री. निनाद माटे पुणे.
डॉ. शशीकांत अहंकारी. अणदूर
कै. डॉ. दीप्ती चिरमुले.
श्री. अनिल शिदोरे आणि ऑक्सफॅम इंडिया.
श्री. सुरेंद्रन, नागपूर.
श्री. वसंतराव गंगावणे, रत्नागिरी.
श्री. रत्नाकर पटवर्धन, नाशिक.
वैद्य भा.वि. साठये.
वैद्य विजय कुलकर्णी. नाशिक.
वैद्य एकनाथ कुलकर्णी आणि आयुर्वेद महाविद्यालय नाशिक.
डॉ. चित्रा आणि प्रसन्न दाभोळकर, सातारा.
श्री. किरण फाळके. डोंबिवली.
मेडिको फ्रेंड सर्कल.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक.
युनिसेफ मुंबई.
मॅकऑर्थर फौंडेशन, नवी दिल्ली.
डॉ. रवी बापट, माजी कुलगुरु महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक.
श्रीमती प्रीती कांबळे, नाशिक
श्री. पी.डी कुलकर्णी, नाशिक
श्री. ज्ञानेश बेलेकर, नाशिक.
श्री. दत्ता वेताळ, पुणे.
श्री. चंद्रशेखर जोशी. पुणे.
ओरिएन्ट लाँगमन, चेन्नई.
डॉ. दयानंद डोणगावकर (माजी कुलगुरू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ)
अभिव्यक्ती मेडिया फॉर डेव्हलपमेंट
डॉ. श्री. विनय कुलकर्णी आणि प्रयास पुणे.
श्री. निलमकुमार खैरे, (सर्पमित्र पुणे).
डॉ. श्री. गोपाल सावकार, नाशिक.
डॉ. श्रीमती. आरती पळसुले.
डॉ. धनंजय देशमुख, चिपळूण.
श्री उदय बापट.
श्रीमती मेधा कुलकर्णी, मुंबई.
प्रो. दत्ता पांगम, मुंबई.
श्री. अभिजित मुळे, नवी मुंबई.
डॉ. निखिल दातार, मुंबई.
योगविद्याधाम नाशिक.
ग्लॅक्सो इंडिया लि.
हॅलो मेडिकल फौंडेशन, अणदूर.
संजीवन हॉस्पिटल, दिंडोरी.
सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. दिल्ली.
श्री. श्रीकांत नावरेकर, निर्मलग्राम.
सायबर एज वेब सोल्युशन्स प्रा. लि. नाशिक
श्री. माधव शिरवळकर.
श्री. विश्वनाथ खांदारे.
श्री. सचिन सातपुते.