शिक्षण, मिळकत, आयुर्मान या तीन घटकांची मोजदाद केल्यावर मानवविकासाचे मोजमाप मिळते. हा मानवविकास निर्देशांक जास्तीत जास्त 1 इतका असतो. म्हणूनच तो दशांशात सांगितला जातो. सोबतच्या तक्त्यात महाराष्ट्रातल्या निरनिराळया जिल्ह्यांचा मानवविकास निर्देशांक दिला आहे. यात गडचिरोली जिल्हा सगळयात कमी विकासाचा तर मुंबई व ठाणे जिल्हा सर्वाधिक विकासाचा आहे.
मानवी विकास मोजण्याची ही एक ढोबळ पध्दत आहे. ती जिल्ह्याच्या पातळीवर काढता येते. मात्र व्यक्ती आणि कुटुंबाच्या जीवनाची गुणवत्ता मोजण्यासाठी शिक्षण-मिळकत-आयुर्मान या तीनाशिवाय खालील काही पैलू लक्षात घ्यावे लागतील.
या विविध किमान जीवनावश्यक बाबींचे मोजमाप केले तर मानवी विकासाचे खरे स्वरूप दिसते. केवळ मिळकत-शिक्षण-आयुर्मान या घटकात ‘सुखी जीवन’ पूर्णपणे समजत नाही.
आता इथून पुढे जगात ‘मानवी आनंद निर्देशांक’ मोजला जाईल. सध्या जगात आनंदी असणारे पहिले दहा देश म्हणजे – डेन्मार्क, स्विट्झरलंड, ऑस्ट्रिया, आईसलँड, बहामा, फिनलंड, स्वीडन, भूतान, ब्रुनेइ, कॅनडा, आयर्लंड आणि लक्झेंबुर्ग. यातील तीन देश सोडता सर्व पाश्चिमात्य देश आहेत. इंग्लंडचा क्रमांक 41 तर अमेरिकेचा 23वा. चीन 82वा तर भारत 125 वा आहे.
पण भारत इतका मोठा देश आहे की त्यातही आनंदी व दु:खी भाग असू शकतील. मुख्य मुद्दा असा आहे की, आपण सुखी व आनंदी आहोत का? सुख व आनंद हे प्रत्येक माणसाचे ध्येय असते. आपण आनंदी होण्यासाठी ‘आहे त्यात सुख’ मानायचे? की वर सांगितलेल्या पैलूंसाठी प्रयत्न करायचे?
निरनिराळया देशांत समाजाच्या आरोग्यमानात काय फरक पडतो हे आपण पाहिले. भारत इतर देशांच्या तुलनेत कोठे आहे ते यावरून दिसेल. निरनिराळया आरोग्यदर्शक कसोटया लावल्यानंतर एक-दोन देश सोडले तर भारताचा क्रम अगदी शेवटीशेवटी लागतो. भारतामध्येही प्रांताप्रांतात तुलना केली तर खूप वेगवेगळे चित्र दिसते. केरळ, पंजाब,हरियाणा या प्रांतातले आरोग्यमान महाराष्ट्र, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, बिहार इत्यादींपेक्षा बरे दिसते. महाराष्ट्रातही खेडयांमधील आरोग्यमान शहरांपेक्षा निकृष्ट दिसते. मुंबई व मोठी शहरे काढल्यास महाराष्ट्राचे आरोग्य मागास दिसते. हा फरक नेमका कशामुळे पडतो ते आता पाहू या.
राहणीमान-उत्पन्न, आहार, स्वच्छ पाण्याची उपलब्धता, निवारा, शिक्षण, आरोग्याशी संबंधित चालीरीती, उपभोगाची साधने, स्वच्छतेच्या सोयी इत्यादी.
या घटकांशिवाय वांशिक वारसा, भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती हे घटकही महत्त्वाचे आहेत. राहणीमानासाठी सध्या मानवविकास निर्देशांक वापरला जातो. याबद्दल आता आपण पाहू या.