आपल्या देशात बालमृत्यूंचे प्रमाण हजारी 60 इतके जास्त आहे. यात निम्मे अर्भकमृत्यू असतात. जन्मताना पुरेशी काळजी न घेणे, बाळाची ऊब कमी होणे, जंतूदोष-पू, न्यूमोनिया हे अर्भकाचे प्रमुख आजार आहेत. याने अनेक बाळे दगावतात.
दात येण्यासंबंधी त्रास, तोंड येणे, उलटया, हगवण, अतिसार, पोटात कळ, कावीळ, जंत, विषमज्वर, माती खाणे, मळाचे खडे होणे, विषबाधा (रॉकेल, इ.)
सर्दी, ऍडेनोग्रंथी वाढ, टॉन्सिल्स-सूज, घसासूज, सायनससूज, श्वासनलिकादाह, न्यूमोनिया, क्षय, जंत-खोकला, बाळदमा, इत्यादी.
गळवे, दूषित जखमा, इसब, उवा, खरूज, गजकर्ण, नाळेत पू होणे, बेंबीतील हर्निया, इ.
डोळे येणे, बुबुळावर व्रण किंवा जखम, रातांधळेपणा, दीर्घदृष्टी, तिरळेपणा, रांजणवाडी, लासरू, इ.
बाह्यकर्णदाह, बुरशी, कानात मळ गच्च बसणे, अंतर्कर्णदाह, कान फुटणे, बहिरेपणा.
मेंदूआवरणदाह, मेंदूसूज, मेंदूज्वर, धनुर्वात, पोलिओ, मेंदूजलविकार, फेफरे, मतिमंदत्व, इ.
झडपांचे आजार, सांधेकाळीज ताप, इत्यादी.
पाऊल सदोष असणे, इतर हाडांची-सांध्यांची रचना सदोष असणे, मुडदूस, हाडसूज, इ.
कुपोषणामुळे अशक्तता, कमी वाढ असणे, स्नायू निकामी होणे, इ.
सदोष तांबडया पेशी, रक्तपांढरी, हिवताप, रक्ताचे कर्करोग, जंतुदोष, रक्तस्रावाची प्रवृत्ती, इ.
हत्त्तीरोग, कर्करोग, गंडमाळा, इ.
गलग्रंथी दोष, मधुमेह, इ.
मूत्रपिंडदाह, मूत्राशयदाह, मूत्रनलिकादाह, लघवी अडकणे, मुतखडे, इ.
पुरूष बीजांडे वृषणात न उतरणे, बीजांडांची अपुरी वाढ, हर्निया, इ.
बीजांडांची अपुरी वाढ.
गोवर, कांजिण्या, जर्मन गोवर, गालगुंड, कुपोषणाचा प्रकार, अपुरे दिवस, अपुरे वजन.
जखमा, भाजणे, साप-विंचू चावणे, बुडणे, शॉक, कानात, नाकात खडा किंवा बी जाणे.
या वर्गीकरणात लहान मुलांचे बहुतेक आजार तक्रारींची नोंद केलेली आहे. याच प्रकरणात शेवटी लहान मुलांच्या आजारांच्या काही प्रमुख लक्षणांसंबंधी तक्ते व मार्गदर्शन दिले आहे (ताप, खोकला, उलटी, खूप रडणे, इ.). याशिवाय बहुतेक आजारांची चर्चा संबंधित शरीरसंस्थेच्या प्रकरणात केली आहे. शरीरसंस्थेच्या विभागणीत न बसणारे काही आजार या भागात दिले आहेत.
या वर्गीकरणावरून असे दिसते की मुलांमध्ये पचनसंथा, श्वसनसंस्था व त्वचा यासंबंधीचे आजार व तक्रारी जास्तीत जास्त आढळतात. त्यातही जंतुदोष, जंत, इत्यादी कारणांमुळे होणारे आजार जास्त आढळतात. मोठया माणसांपेक्षा मुलांमध्ये आजारांचे प्रमाण तसे जास्त असते आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त आढळते. आपल्या देशात लहान मुलांच्या आजारांमध्ये सर्वप्रथम अतिसार आणि न्यूमोनिया गटांचे आजार येतात. या दोन्हीही आजारांवर परिणामकारक उपाययोजना होऊ शकते. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण घटू शकेल.
गालगुंड हा विषाणुजन्य आजार सहसा लहान मुलांमध्ये (पाच-सहा वर्षे) येतो. या वयात हा एक तसा निरुपद्रवी आजार असतो. हा आजार लहान वयात आला नाही तर मोठया वयात येण्याची शक्यता असते. असे झाले तर स्त्रीबीजांड- पुरुषबीजांडामध्ये हा आजार शिरून वंध्यत्व येण्याची दाट शक्यता असते हे त्याचे वैशिष्टय आहे. म्हणून गालगुंड टाळण्यासाठी लस दिली जाते.
हा आजार मुलांमध्ये श्वसनामार्फत पसरतो. थोडा ताप, लाळग्रंथी (गालातील) सुजणे, दुखणे ही त्यांपैकी मुख्य लक्षणे. पाच-सात दिवसांत हा आजार बरा होतो.
प्रौढ व्यक्तींना मात्र या ‘गालफुगी’ बरोबर वृषण (पुरुष) किंवा ओटीपोटात (स्त्रिया) दुखल्यास बीजांडापर्यंत आजार पोचल्याची ही खूण असते. यामुळे कायमचे वंध्यत्व येण्याची शक्यता असते. तरुण-मोठया माणसांमधील गालफुगी म्हणूनच गंभीर असते. लहान मुलांना नुसते पॅमाल औषध पुरते.
गालगुंडांसाठी प्रतिबंधक लस आहे, पण ती महाग असल्याने अजून तरी सार्वत्रिक वापरात नाही. गालगुंडाची प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते.