कांजिण्या हाही प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात आणि प्रौढावस्थेत ‘नागीण’ या रोगाद्वारे प्रकट होतात. एवढा अपवाद सोडल्यास कांजिण्या हा अगदी सौम्य आणि मर्यादित स्वरूपाचा आजार आहे. त्यासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकता नसते. दहा वर्षे वयापर्यंत बहुतेकांना कांजिण्या होऊन जातात. साधारणपणे जानेवारी ते जूनपर्यंतच्या काळात कांजिण्या येतात.
कांजिण्यांचे विषाणू निकट संपर्काने व श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात. सुमारे दोन आठवडयांनंतर रोगलक्षणे उमटतात. आजाराच्या सुरुवातीच्या काळात थंडीताप, पाठदुखी, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे, इत्यादी त्रास होतो. हा त्रास एखादा दिवसच असतो. पण प्रौढ वयात हा त्रास दोन-तीन दिवस टिकतो.
ताप सुरू झाल्यानंतर एक-दोन दिवसांत अंगावर पुरळ उठतात. पुरळ बहुधा छाती, पोट यांवर जास्त असतात. पुरळांची सुरुवात लालीने होते, नंतर त्यात पाणी भरते, मग पू होतो व नंतर खपली धरते. हे सर्व बदल पाच दिवसांतच होतात. पुरळ एकामागोमाग दोन-तीन वेळा उठतात, त्यामुळे शरीरावर निरनिराळया प्रकारचे पुरळ एकदमच दिसू शकतात. खपली धरायला सुरुवात झाली, की आजार संपलेला असतो.
कांजिण्यांसाठी वेगळे उपचार करावे लागत नाहीत. तापासाठी पॅमाल दिले की पुरते. आजार मर्यादित असल्याने लस देण्याचीही गरज नसते. (याची लस अद्याप उपलब्ध नाही.) आता देवीचा आजार नसल्याने कांजिण्या ओळखणे सोपे आहे. (पूर्वी हा आजार कांजिण्या की देवी असा विचार करावा लागे.)
हा एक गुंतागुंतीचा आजार समजला जातो. 150 मुलांमध्ये एक इतके प्रमाण/हजारात 6. ऑटो म्हणजे ‘आत्म’ मग्न असतात.
याबद्दल एक गैरसमज होता. – या आजाराचा सगळा दोष आई नीट वाढवत नाही म्हणून. पण मुळात हे एक brain damage असते. या मुलांचा मेंदू थोडा वेगळाच असतो.
ब-याच मुलांना हा आजार ‘जन्मजात’ असतो. काही जणांना नंतर दोन अडीच वर्षात होतो. पालकांना हे समजायला/स्वीकारायला थोडा उशीर लागतो. त्यावेळी त्यांना धक्का बसतो.
काही केसेस थोडया सौम्य असतात. त्यात थोडी सुधारणा होते.
या मुलांना एकास एक असा शिक्षक लागतो. व्यक्तिगत शिक्षक लागतो. पण आपल्या समाजात हे अवघडच असते.
ऑटिस्टिक मुले नेहमीप्रमाणेच दिसतात. मतिमंद दिसत नाही. मात्र एकदम काहीतरी विचित्र क्रिया करायला लागतात.