पध्दतीसंबंधी सूचना
नवशिक्यांनी फार जोराने दाबू नये.
- तर्जनी किंवा अंगठयाने दाब द्या. जास्त दाब आवश्यक असल्यास बोटावर बोट ठेवून दबाव वाढवता येतो. एकाऐवजी दोन बोटे दाबूनही उपचार करता येतो. ढुंगण किंवा मांडी या मांसल भागावर हाताच्या कोप-याने दाब दिला तर चालतो.
- रुग्णाला सहन होईल इतकाच दाब द्या, जास्त नको. तसेच फार हलके दाबूनही चालणार नाही. योग्य दबाव वापरला तर किंचितशी पण सुसह्य वेदना होते ही खूण लक्षात ठेवा. दाबण्या- चोळण्यामुळे त्त्वचेची सालटी निघणार नाहीत याची दक्षता घ्या.
मर्मदबावाचे विविध प्रकार
चोळणे/गोल गोल फिरवणे, चिमटीत किंवा मुठीत पकडून ठेवणे/ दाबणे, अंगठयाच्या नखाने दाबणे, पुसण्याप्रमाणे, तिंबणे/टोकणे/चिमटणे/ तळव्यावर तळवा दाबून/ अंगठयावर अंगठा दाबून/गाईची धार काढल्याप्रमाणे दाबत आणणे.
किती वेळ – दाब 5-10 सेकंद ठेवा, काढा आणि परत करा, याप्रमाणे 10-15 वेळा करा. एकावेळी 2 मिनिटांपेक्षा जास्त कधीही दाबू नका.
किती वेळा – दिवसातून एक वेळ करा, रोज करा, (कमीतकमी 3/4 दिवसातून एकदा करा) दिवसातून 4/5 वेळा केले तरी चालते. तीव्र विकारांमध्ये 4/5 वेळा करावयास पाहिजे. साधारण आठवडाभर उपचार करावा.
मर्मबिंदूंचे वर्णन आणि उपयोग
मर्मबिंदूंचे वर्णन आणि उपयोग (तक्ता (Table) पहा)