Exercise Icon व्यायाम आणि खेळ आरोग्यासाठी योगशास्त्र
व्यायामाआधी आणि नंतर

<कोठलाही कठोर व्यायाम करण्याआधी काही मिनिटे शरीर-सरावासाठी हलका व्यायाम करावा लागतो. त्यामुळे शरीर व हृदय पुढच्या कष्टांना सज्ज होते. एकदम जास्त व्यायाम सुरु केला तर हृदयावर त्याचा अचानक ताण येतो. हे टाळले पाहिजे. मैदानात मुख्य खेळाआधी खेळाडू मैदानाला चक्कर मारतात, उडया मारतात किंवा हात पाय ताणण्याचे प्रकार करतात ते यासाठीच. शिवाय यात स्नायू-सांध्यांना हलका ताण दिल्याने हालचाली सहज होतात हा देखील उपयोग आहे. इंग्रजीत याला वॉर्म-अप म्हणतात. यामुळे प्रत्यक्ष खेळातल्या स्नायूंच्या जखमा कमी होतात. जोरकस व्यायाम एकदम संपवणेही बरोबर नाही. असा व्यायाम हळूहळू कमी करत आणला पाहिजे. यामुळे हृदयाला कमी श्रमाशी व रक्तप्रवाहाशी जमवून घ्यायला सोपे पडते.

व्यायाम आणि उष्णता

व्यायामातून बरीच उष्णता निर्माण होते. ही उष्णता घामातून आणि इतर प्रकारे त्त्वचेतून आणि श्वासातून निघून जात असते. जास्त व्यायामाने जास्त उष्णता निर्माण झाल्यास व्यायामानंतर शरीर काही काळ गरम राहते.

पुरुषांची ऊर्जाप्रक्रिया जास्त उष्णता निर्माण करते. स्त्रियांना व्यायामात घाम कमी प्रमाणात येतो.

या उष्णतेमुळे भारतीय वातावरणात व्यायामासाठी ऋतू बरेवाईट असल्याची कल्पना आहे. उन्हाळयात ही सर्व उष्णता लवकर बाहेर घालवणे शक्य होत नसल्यास उष्माघात होऊ शकतो. थंडीत-पावसात मात्र ही अडचण नसते म्हणून शीतकाळात व्यायाम चांगला असे मानतात. मात्र उन्हाळयातही माफक का होईना व्यायाम पाहिजेच.

व्यायाम आणि आहार

आपल्याला प्रथिने लागतात मुख्यतः शरीराच्या वाढीसाठी आणि झीज भरून निघण्यासाठी. स्नायू भरदार होण्यासाठी प्रथिनांचीच गरज असते. मात्र व्यायामातील दम टिकण्याच्या दृष्टीने पिष्टमय पदार्थाची मुख्य गरज असते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.