Pregnancy Childbirth Icon बाळंतपण गर्भपात
बाळंतपणानंतर दीड महिन्यात होणारे बदल

Breast Feeding

  • गर्भाशय लहान होत जाते.
  • अंगावरचं रक्त-पाणी थांबते.
  • जखमा असतील तर त्या भरतात.
  • थोडं वजन कमी होते.
  • बाळाची शिस्त लागते.
  • अंगावरचं दूध वाढते.
  • ओल्या बाळंतिणीला 7/8 दिवस अंगावर जातं.
  • याचा रंग आधी लाल असतो.
  • मग तपकिरी – पिवळा होतो.
  • ८/10 दिवसांत पांढरा होतो.
  • दिवसातून 1/2 कपडे भिजतात.
  • वास विशेष नसतो.
  • पोटात दुखत नाही.
  • गर्भाशय लहान होत जातं.
  • 4/5 आठवडयानंतर गर्भाशयाचा गोळा हाताला लागत नाही.
बाळंतपणानंतरचे गंभीर, धोकादायक आजार
गर्भाशयाचा दाह – जंतुदोष

या आजारात गर्भाशयात सूक्ष्मजंतूंमुळे दाह होऊन ते रक्तात पसरतात व मातेची प्रकृती अचानक गंभीर होते. रक्तदाब कमी होतो, ताप खूप येतो किंवा शरीराचे तापमान नेहमीपेक्षा खाली येऊन शरीर ओलसर, थंड लागते. गर्भाशयावर दाबले असता वेदना होते. गर्भाशयातून येणा-या स्त्रावाला दुर्गंधी येते व योग्यवेळी इलाज न झाल्यास मृत्यू येण्याचा धोका असतो. या आजाराला बाळंतरोग म्हणता येईल. अशा वेळी ताबडतोब रुग्णालयात न्यावे.

स्तनांमध्ये गळू होणे

स्तनामध्ये पू होणे, गाठी होणे, असह्य वेदना होणे, गळू फुटून जखम राहणे, इत्यादी त्रास ब-याच स्त्रियांना होतो. स्तन वेळोवेळी रिकामे करून हे टाळता येईल. मात्र एकदा गळू झाल्यावर स्तन दाबून दूध बाहेर आणणे अवघड होते. शस्त्रक्रियेने गळू फोडून पू काढणे हाच यावर उपाय आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.